agriculture news in marathi, effect of fog on crops,kolhapur,maharashtra | Agrowon

धुक्‍यामुळे उगवणीच्या अवस्थेतील ऊस, ज्वारीवर परिणाम शक्‍य
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 6 मार्च 2018
जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात धुके आहे. राज्याच्या काही भागांत धुके, गारपिटीची शक्‍यता वर्तविली आहे. यामुळे आणखी दोन ते तीन दिवस तरी धुक्‍याचे प्रमाण कायम राहण्याची शक्‍यता आहे. शेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून तज्ज्ञांच्या सल्ल्याने शिफारशीनुसार पिकांवर फवारणी करावी. 
- डॉ. अशोक पिसाळ, कृषी विद्यावेत्ता, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर
कोल्हापूर : जिल्ह्यात सातत्याने धुके पडत असल्याने याचा परिणाम बहुतांशी करून नवीन लागवड झालेल्या उसाबरोबरच ज्वारीसारख्या रब्बी पिकावरही होणार आहे. धुक्‍याचे प्रमाण वाढल्यास कीड - रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्‍यता आहे. 
 
शहरासह जिल्ह्यात सोमवारी (ता. ५) सकाळपासून धुक्‍याचे साम्राज्य राहिले. दुपारी बारापर्यंत सूर्यप्रकाश नव्हता. सकाळी पाच ते सात वाजेदरम्यान सलग धुके राहिल्याने याचा परिणाम पिकांवरही होण्याची शक्‍यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली.
 
सध्या जिल्ह्यात उस तोडणी व उसाची नवी लागवड वेगात सुरू आहे. धुके वाढल्यास उगवून आलेल्या उसाच्या पाल्यावर तपकिरी ठिपके पडण्याची शक्‍यता आहे. याचबरोबर ऊस तुटून गेलेल्या खोडव्याच्या उगवणीचेही नुकसान होण्याची शक्‍यता आहे. खोडक्‍यावर बुरशी तयार होऊन उसाच्या उगवणीत घट येऊ शकते. याचबरोबर रब्बी पिकांमध्ये जी ज्वारी पोटरीच्या अवस्थेत आहे त्या ज्वारीवर धुक्‍यातून निर्माण होणारे बारीक थेंब साचून कणसाच्या दर्जावरही परिणाम होण्याची भीती आहे.
 
जिल्ह्यात गहू व हरभरा ही रब्बीची मुख्य पिके आहेत. परंतु, या पिकांच्या पक्वतेचा कालावधी पूर्ण होत आहे. काही भागात हरभरा काढणीलाही आला असल्याने या पिकांना धुक्‍याची झळ फारशी पोचणार नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...