agriculture news in marathi, Effect of the implementation of schemes of vacant posts | Agrowon

रिक्त पदांचा योजनांच्या अंमलबजावणीवर परिणाम
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 जून 2018

अकोला ः जिल्ह्यात कृषी विभागातील अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने त्याचा थेट परिणाम योजनांच्या अंमलबजावणीवर होत अाहे. काही योजनांचा पैसा खर्च न झाल्याने परत जात अाहे. वर्षानुवर्षे कृषी विभागात रिक्त असणारी पदे भरण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याची दुर्दैवी स्थिती अाहे.

अकोला ः जिल्ह्यात कृषी विभागातील अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याने त्याचा थेट परिणाम योजनांच्या अंमलबजावणीवर होत अाहे. काही योजनांचा पैसा खर्च न झाल्याने परत जात अाहे. वर्षानुवर्षे कृषी विभागात रिक्त असणारी पदे भरण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याची दुर्दैवी स्थिती अाहे.

जिल्ह्यात कृषी सहायकापासून तर तालुका कृषी अधिकाऱ्यांपर्यंत ही पदे ठिकठिकाणी रिक्त अाहेत. रिक्त पदांमुळे प्रशासनाची झालेली अडचण गेल्या काळात अकोट तालुक्यामुळे राज्यभर पसरली अाहे. तेथे तालुका कृषी अधिकारी पदाचा प्रभार चक्क कृषी सहायकाकडे देण्याची नामुष्की झाली होती. त्यानंतरही हे पद भरलेले नाही. पातूर तालुका कृषी अधिकारी अकोटचा कारभार पाहत अाहेत. या तालुक्यात मंडळ अधिकारीपदेही रिक्त अाहेत. परिणामी बहुतांश कामे कृषी सहायकांना पुढे न्यावी लागत अाहेत. तेल्हारा तालुक्यातही कर्मचाऱ्यांची कमतरता अाहे. या ठिकाणी प्रभारी तालुका कृषी अधिकारी कामकाज सांभाळत अाहेत. बाळापूर तालुक्याची ‘प्रभारी’ तालुका म्हणून अमरावती विभागात अोळख निर्माण झाली अाहे.

या ठिकाणी गेली सात ते अाठ वर्षे तालुका कृषी अधिकारी पदाची जबाबदारी मंडळ अधिकारी सांभाळत अाहेत. दरवर्षी अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात. पण बाळापूरला पूर्णवेळ तालुका कृषी अधिकारी का दिला जात नाही, हे एक कोडेच अाहे. मंडळ कृषी अधिकाऱ्यांचीही पदे जिल्ह्यात रिक्त अाहेत. अाता खरीप हंगाम सुरू झाला असून विविध योजनांची अंमलबजावणी केली जात अाहे. रिक्त पदांचा परिणाम योजनांच्या अंमलबजावणीवर होत अाहे. प्रामुख्याने दुप्पट उत्पन्न करण्यासाठीच्या प्रयत्नांना खीळ बसत अाहे.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात १८९ मंडळात जोरदार पाउस औरंगाबाद : मराठवाड्यातील 421 महसुल मंडळांपैकी तब्...
हिंगोली जिल्ह्यात सोळा मंडळात अतिवृष्टीहिंगोली : जिल्ह्यात मागील चोवीस तासांमध्ये दोन...
परभणीतील २४ मंडळात अतिवृष्टी नदी, नाले...परभणी : जिल्ह्यात बुधवार पासून पावसाचे...
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीनादेड : जिल्ह्यातील माहूर, किनवट, भोकर, हिमायतनगर...
कोयनेत पूरस्थिती शक्‍यपाटण, जि. सातारा : कोयना धरण पाणलोट...
कर्जमाफीसाठी मीपण आत्महत्या करू का ?सातारा - ‘‘सोसायटीचे एक लाख ३० हजार रुपयांचे...
यवतमाळ जिल्ह्यात पूर परिस्थिती यवतमाळ  : जिल्हयात सुरु असलेल्या संततधार...
राज्यात भेंडी ५०० ते ३००० रुपये...सांगलीत दहा किलोस २५० ते ३०० रुपये  सांगली...
राज्याचा पुरोगामित्वाचा वारसा जपूया :...मुंबई: शेती, पाणी, गुंतवणूक, गृहनिर्माण अशा विविध...
विदर्भात पावसाचे जोरदार कमबॅकनागपूर ः गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या...
शिराळ्यात नागप्रतिमेची पूजाशिराळा, जि. सांगली ः  अनेक वर्षे जिवंत...
अकोल्यात पावसाचे आगमनअकोला : या भागात गेल्या २० पेक्षा अधिक...
एकात्मिक कीड नियंत्रणात फेरोमोन...कामगंध सापळ्यांचा वापर केल्यास कमी खर्चात कीड...
उत्पादनवाढीसाठी एअरोसोल्सद्वारे...पृथ्वीच्या वातावरणामध्ये कृत्रिमरीत्या सल्फेट...
राजकीय सभ्यता व सुसंस्कृतपणा जपणारा एक...पुणे : राजकिय विरोध कितीही असला तरी राजकारणातील...
अटलजी : एका उत्तुंग नेतृत्वाचा अस्तभारताचे माजी पंतप्रधान, देशाचे लोकप्रिय नेते...
देशाने महान पुत्र गमावला : राहुल गांधी नवी दिल्ली : ''आज भारताने महान पुत्र गमावला...
वाजपेयींच्या निधनाने एका युगाचा अंत :...नवी दिल्ली : ''अटलजींच्या निधनाने एका युगाचा...
अजातशत्रू, मुरब्बी राजकारणी : अटल...शालीन, सभ्य राजकारणाने विरोधकांना जिंकणारे,...
...या आजारांनी वाजपेयींना ग्रासले होतेनवी दिल्लीः माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी...