agriculture news in marathi, effect of rain on crops, jalgaon, maharashtra | Agrowon

जळगाव जिल्ह्यातील केळी, कापूस, तूर उत्पादक चिंतेत
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017
सध्या केळीवर करप्याचा प्रादुर्भाव अधिक दिसून येत आहे. अशा वातावरणातही शेतकऱ्यांना कीडरोग निर्मूलनासाठी धावपळ करावी लागत आहे. 
- संदीप पाटील, शेतकरी, किनगाव, जि. जळगाव
जळगाव  ः जिल्ह्यात आठवडाभरापासून असलेले ढगाळ हवामान आणि हलक्‍या सरी कोसळल्यानंतर निर्माण झालेली पावसाची शक्‍यता यामुळे केळी, कापूस व तूर उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. आधीच खरिपात फटका बसला, आता रब्बी जेमतेम उभा राहत असतानाच ढगाळ हवामान निर्माण झाल्याने त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. 
 
जिल्ह्यात जळगाव, भुसावळ, यावल भागांत सोमवारी सकाळी (ता. २०) हलक्‍या सरी कोसळल्या. तसेच धुळ्यातही शिंदखेडा, शिरपूर, धुळे भागांत हलका पाऊस झाला. पाऊस अधिक नव्हता, परंतु ढगाळ वातावरण कायम आहे. त्याचा धसका शेतकऱ्यांनी घेतला आहे. ढगाळ वातावरणामुळे केळीवर करप्याचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. केळीची पाने पिवळी पडल्याने ती नष्ट करण्यासाठी शेतकऱ्यांना श्रम घ्यावे लागत आहेत. लहान केळीच्या पिकात ही समस्या अधिक आहे. रावेर, यावल, चोपडा, भडगाव भागांतील मिळून जवळपास १९ हजार हेक्‍टरवरील लहान किंवा चार पाच महिन्यांच्या केळी पिकामध्ये करप्याची समस्या अधिक आहे. त्यातच केळी कापणीही रखडली आहे. 
 
तुरीमध्ये फुलगळ सुरू असून, तयार शेंगांवर किडींचा प्रादुर्भाव झाला आहे. शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव सध्याचा प्रतिकूल हवामानामुळे वाढू लागल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसेच थंडी गायब झाल्याने पानांवर चिकटाची समस्याही निर्माण होऊ शकते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कपाशीची बोंडे काहीशी ओली झाली. त्यात आर्द्रता वाढल्याने त्यांचा दर्जा घसरू लागला आहे. तसेच कपाशीची पाने काळी, लालसर पडू लागली आहेत. स्वच्छ सूर्यप्रकाशित वातावरण नसल्याने बोंडे उमलत नसल्याचे चित्र आहे. तसेच कापसावर रसशोषक किडींचाही प्रादुर्भाव होत असल्याची माहिती मिळाली.
 
कपाशीमध्ये आणखी आठ ते १० टक्के नुकसानीची भीती आहे. ढगाळ वातावरणामुळे मका, ज्वारीची काढणी सुरू असून, नासाडी होऊ नये म्हणून काढणीअभावी पडून असलेले कणसे झाकून ठेवण्यासाठी रोज सायंकाळी शेतकऱ्यांना धावपळ करावी लागते. पण काही ठिकाणी केळीची काढणी किंवा कापणी मात्र सध्या व्यापाऱ्यांनी बंद ठेवली आहे. 

इतर ताज्या घडामोडी
मार्चअखेरपर्यंत टप्प्याटप्याने... मंदीतील ब्रॉयलर्सचा बाजार मार्चअखेरपर्यंत...
पुण्यात लसूण, फ्लॉवर, मटार वधारलापुणे ः वाढता उन्हाळ्यामुळे शेतीमालाचे उत्पादन...
चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये...चीनमध्ये डेअरी उत्पादनांच्या मागणीमध्ये प्रति...
राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍...पुणे : सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी...
पूर्णधान्य आहाराचा आरोग्यासाठी होतो...आरोग्यासाठी साध्या धान्यांच्या तुलनेमध्ये...
सत्तावीस कारखान्यांकडून १ कोटी २१ लाख... नगर  ः नगर, नाशिक जिल्ह्यांत सुरू असलेल्या...
पुणे जिल्ह्यातील १०० मंडळांमध्ये... पुणे  ः हवामान अंदाजाबाबत अचूक माहिती...
लाचखोर तालुका कृषी अधिकारी 'लाचलुचपत'...अकोला : जलसंधारणाच्या केलेल्या कामांची देयके...
परभणी जिल्ह्यातील चार लघू तलाव कोरडे परभणी ः पाणीसाठा संपुष्टात आल्यामुळे...
स्वखर्चाने शेततळे करणाऱ्यांना मिळेना...औरंगाबाद : शेतीला पाण्याची सोय व्हावी म्हणून...
कोल्हापुरात गुळाचे पाडव्यानिमित्त सौदे कोल्हापूर : येथील बाजार समितीत पाडव्यानिमित्त...
साखरेप्रमाणे कापसासाठी धाेरण ठरवावे :...पुणे : साखरेप्रमाणेच कापसासाठी दरावर लक्ष कें....
राज्यात आज अन्नत्याग आंदोलनमाळकोळी, नांदेड ः आजवर आत्महत्या केलेल्या...
'ईव्हीएम'ऐवजी आता मतपत्रिकांचा वापर...नवी दिल्ली : आगामी निवडणुकांमध्ये इलेक्‍...
राज-पवार भेटीने चर्चेला उधाणमुंबई : दिल्ली येथे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी...
परभणीत ढोबळी मिरची १२०० ते १८०० रुपये... परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
औरंगाबाद येथे मोसंबी २००० ते ४५०० रुपये औरंगाबाद  : येथील बाजार समितीमध्ये शनिवारी...
कृषी सल्लामार्च महिन्यात उन्हाळी भुईमूग पिकाची पेरणी करू...
पशू सल्लागोठ्यातील अस्वच्छतेमुळे बऱ्याचदा दुधाळ जनावरांना...
सांगलीतील द्राक्ष, बेदाणा उत्पादक ढगाळ... सांगली : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ...