agriculture news in marathi, effect of rain on grapes, sangli, maharahtra | Agrowon

ढगाळ हवामानामुळे सांगलीतील द्राक्ष उत्पादक धास्तावले
टीम अॅग्रोवन
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017
सांगली :  द्राक्ष हंगामाच्या तोंडावर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. काढणीला आलेल्या द्राक्षबागांना याचा फटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे. बदलत्या वातावरणामुळे भुरी, डाउनी रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.
 
सांगली :  द्राक्ष हंगामाच्या तोंडावर गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. काढणीला आलेल्या द्राक्षबागांना याचा फटका बसण्याची भीती निर्माण झाली आहे. बदलत्या वातावरणामुळे भुरी, डाउनी रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.
 
जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम जवळ आला आहे. मणेराजुरी, सोनी, बेडग, खंडेराजुरीतील द्राक्षे पुढील पंधरा दिवसांत बाजारपेठेत येतील. त्यातच आगाप छाटण्यानंतर बहुतांशी बागा ३० ते ६० दिवसांच्या असताना महिन्यापूर्वी झालेल्या पावसाने डाउनीचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बागा सोडाव्या लागल्या आहेत. त्यातच सातत्याने बदलत असलेल्या वातावरणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत सापडले आहेत.
 
गेल्या काही दिवसांपासून थंडी कमी होऊन तापमानात वाढ झाली आहे; तर गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता आहे. उशिरा छाटणी केलेल्या द्राक्षबागा अडचणीत सापडल्या आहेत. रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून फवारण्या सुरू आहेत.
 
सध्या बागांमध्ये द्राक्षमणी तयार होत आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला जातो की काय, अशी भीती द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांतून व्यक्त होते आहे. रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये रात्रंदिवस द्राक्षबागेत फवारणी सुरू असून पंपांची घरघर वाढली आहे. शेतकरी रात्रंदिवस बागेत तळ ठोकून आहेत. गेल्या वर्षी पूर्ण हंगाम हवामान चांगले असल्याने खर्च कमी उत्पादन जास्त अशी स्थिती होती.
 
या वर्षी छाटण्यांपासून हवामानातील फेरबदलाने द्राक्षबागायतदार त्रस्त झालेत. बुरशीनाशकाचा एक स्प्रे घेण्यासाठी ३ ते ५ हजार रुपयांपर्यंत खर्च वाढतो. तीन आठवड्यांत डाउनीची भीती, भुरीचा प्रादुर्भाव झाल्याने फवारण्या वाढणार आहेत. 

इतर ताज्या घडामोडी
शिवकुमार स्वामी यांचे १११व्या वर्षी...बंगळूर : तुमकुरू येथील सिद्धगंगा मठाचे प्रमुख,...
आयटीसीचे ‘ई चौपाल’ आता येणार मोबाईलवरग्रामीण भागाला डिजिटल करण्याच्या उद्देशाने दोन...
पुण्यात भाजीपाल्याची आवक कमी; दर स्थिरपुणेः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
...तर भविष्यात निवडणुका होणारच नाहीत :...कासेगाव, जि. सांगली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र...
नाशिक जिल्ह्यात पाण्यासाठी गावे पाहतात...येवला, जि. नाशिक : यंदा दुष्काळाच्या माहेरघरांसह...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक टाळण्यासाठी...सांगली ः  दादा... द्राक्षांची विक्री करताना...
पंजाब गारठलेले; काश्‍मीरला दिलासाश्रीनगर/चंडीगड : पंजाब आणि हरियानातील...
शेवगाव, वैजू बाभूळगाव येथे लोकसहभागातून...नगर   ः दुष्काळाने होरपळ सुरू असताना...
पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांनी आपले ज्ञान...बारामती, जि. पुणे  ः ज्याप्रमाणे...
पुणे विभागात ४२६२ शेततळ्यांची कामे पूर्णपुणे  ः दुष्काळी स्थितीत फळबागा, पिकांसाठी...
फसव्या भाजप सरकारला हद्दपार करा ः धनंजय...वरवट बकाल, जि. बुलडाणा   ः भाजप सरकारने...
कृषिक प्रदर्शनाला दिली दोन लाखांवर...बारामती, जि. पुणे  ः गेल्या चार दिवसांत दोन...
सरकारचे अपयश लोकांसमोर प्रभावीपणे...नगर   ः सरकार कामे करण्यापेक्षा घोषणा...
रस्ते विकासासाठी ३० हजार कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यात रस्ते विकासाचा भरीव...
प्रकाश संश्लेषणातून जीएम भात उत्पादनात...भात पिकामध्ये होणारी प्रकाश संश्लेषणाची क्रिया...
मराठवाड्यातील पाणीसाठे तळालाऔरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळाचं संकट...
अकोल्यात आंतरविद्यापीठ कर्मचारी क्रीडा...अकोला ः सुवर्ण जयंती क्रीडा महोत्सवातंर्गत येथे...
‘कर्जाची वरात मुख्यमंत्र्यांच्या दारात...नागपूर  ः शेतकऱ्यांचा सात-बारा उतारा सरसकट...
`सेवाकर प्रश्न मिटेपर्यंत सांगलीत...सांगली   : मुंबईत भाजप कार्यालयातील...
पुणे जिल्ह्यात गव्हाचे क्षेत्र ४१ हजार...पुणे  ः जमिनीत ओल नसल्याने यंदा रब्बी...