agriculture news in marathi, effect on sugarcane plantation due to lack of rain, nagar, maharashtra | Agrowon

पाऊस नसल्याने नगर जिल्ह्यात ऊस लागवडीवर परिणाम
टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 सप्टेंबर 2018

नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३ हेक्‍टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे. पाऊस नसल्याचा परिणाम ऊस लागवडीवरही झाला आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या लागवडीवरही हा परिणाम होण्याची शक्‍यता आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यात खरिपात आणि दिवाळीच्या काळात उसाची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. गेल्या दोन वर्षात चांगल्या पावसाच्या आधारावर लागवड क्षेत्र वाढले असल्याने साखर कारखान्यांना अतिरिक्त ऊस उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात होते.

नगर   ः जिल्ह्यात यंदा आतापर्यंत ३३ हजार १२३ हेक्‍टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे. पाऊस नसल्याचा परिणाम ऊस लागवडीवरही झाला आहे. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या लागवडीवरही हा परिणाम होण्याची शक्‍यता आहे, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

जिल्ह्यात खरिपात आणि दिवाळीच्या काळात उसाची मोठ्या प्रमाणात लागवड होत असते. गेल्या दोन वर्षात चांगल्या पावसाच्या आधारावर लागवड क्षेत्र वाढले असल्याने साखर कारखान्यांना अतिरिक्त ऊस उपलब्ध होणार असल्याचे सांगितले जात होते.

उसाचे दरवर्षीच्या लागवडीचे सरासरी क्षेत्र एक लाख चार हजार ३६३ हेक्‍टर आहे. मात्र यंदा आतापर्यंत ३३ हजार ४३१ हेक्‍टर क्षेत्रावर उसाची लागवड झाली आहे. मे-जून महिन्यात उसाची चांगली लागवड होत असते. त्यानंतर जसा पाऊस होईल तशी लागवड केली जाते. यंदा मात्र अजूनही पाऊस नाही. त्यामुळे पाणीपातळीतही वाढ झालेली नाही. त्याचा परिणाम ऊस लागवडीवर झाला आहे.

यंदा आतापर्यंत सरासरीच्या तीस टक्केच लागवड झाली आहे. मात्र अजूनही पाऊस नसल्याने यंदा सरासरीएवढी लागवड होण्याचीदेखील शक्‍यता नाही. हुमणीचा साधारणतः तीस टक्‍के क्षेत्रावर प्रादुर्भाव झाल्याने खोडवा ऊसासह नव्याने ऊस लागवड केलेले शेतकरी धास्तावले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
अळिंबी, स्पॉन्सच्या नावीन्यपूर्ण...सर्व वयोगटातील लोंकासाठी अळिंबी हे अत्यंत पोषक...
शेतीमाल विक्रीसाठी १२ शेतकऱ्यांची नोंदणीसांगली ः सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उडीद, मूग...
नांदेड, परभणी, हिंगोलीत मूग, उडदाला कमी...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोलीतील कृषी उत्पन्न...
पीक संरक्षण क्षेत्रात ‘महिंद्रा’ची...मुंबई : कृषी अवजारे आणि शेती उत्पादनात देशात...
गिरणारे बाजारातील बेहिशेबी वसुलीला चापनाशिक : गिरणारे (ता. जि. नाशिक) येथील टोमॅटो...
'योग्य आर्थिक व्यवस्थापन हा शेती...नाशिक : ‘‘योग्य आर्थिक व्यवस्थापन हाच शेती...
कपाशीवरील पांढरी माशी, कोळी नियंत्रण...सध्या कोरडवाहू कपाशीवर पांढऱ्या माशी व कोळी या...
जळगावात केळीदरात १०० रुपयांनी वाढजळगाव ः केळी दरात गत आठवड्याच्या अखेरीस...
नागपुरात नव्या सोयाबीनची बाजारात आवक...नागपूर ः बाजारात नव्या सोयाबीनची आवक वाढती असली...
नगरमध्ये कांद्याला सोळाशेचा दरनगर ः जिल्ह्यातील एका उपबाजार समितीसह सात बाजार...
तासगाव बाजार समितीत बेदाण्याची आवक,...सांगली  ः दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमीवर...
विसावी सिंचन परिषद अकोला येथे होणारसोयगाव, जि. औरंगाबाद   : येथे रविवारी (ता....
वऱ्हाडात मूग, उडदाला मिळतोय...अकोला  ः या हंगामात लागवड झालेल्या मूग,...
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन घटलेनगर  ः जिल्ह्यात यंदा सुरवातीपासून पाऊस...
‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दाखवले...नगर  : शेतकऱ्यांना दुधाला पाच रुपये अनुदान...
पीक कापणी प्रयोग अहवालानंतर...बुलडाणा   ः कमी पाऊस तसेच पावसातील खंडामुळे...
इंदापूर तालुक्यात तातडीने दुष्काळ जाहीर...भवानीनगर, जि. पुणे  : सरकारने आता तांत्रिक...
पुण्यात आवक कमी झाल्याने भाजीपाल्यांची...पुणे ः राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या...
दुष्काळी तालुक्यांतून अकोले, कोपरगावला...नगर : अकोले तालुक्‍यात पाऊस पडण्याच्या प्रमाणात...
सोयाबीनने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडेअमरावती  ः दिवाळीच्या मोसमात दोन पैसे...