ऑनलाइन सातबारा उपक्रमात अकोला जिल्हा आघाडीवर

ऑनलाइन सातबारा उपक्रमात अकोला जिल्हा आघाडीवर
ऑनलाइन सातबारा उपक्रमात अकोला जिल्हा आघाडीवर
अकोला ः शेतकऱ्यांना सातबारा सहज उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने ऑनलाइन स्वरूपात सातबारा उपलब्ध करून दिला आहे. जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व सातबाराचे संगणकीकरण करणारा अकोला जिल्हा राज्यात आघाडीवर ठरला आहे.
 
या यशाबद्दल पुणे येथील यशदामध्ये झालेल्या एका कार्यक्रमात महसूल विभागाचे प्रधान सचिव मनूकुमार श्रीवास्तव यांनी उपजिल्हाधिकारी (महसूल) राजेश खवले यांच्याकडे प्रमाणपत्र सुपूर्त करून अकोला जिल्ह्याचा गौरव केला.
 
ऑनलाइन सातबाराच्या यशस्वितेबद्दल यशदा येथे पार पडलेल्या गौरव कार्यक्रमाप्रसंगी जमाबंदी आयुक्त श्री. चोक्कलिंगम यांच्यासह अमरावती विभागाचे महसूल आयुक्त पीयूष सिंह तसेच इतर विभागांचे आयुक्त आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
 
दैनंदिन कार्यपद्धतीत सुलभता व पारदर्शकता आणण्याकरिता प्रशासनाकडून विविध संगणकीय प्रणालीचा अवलंब करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये तीन लाख ५३ हजार ७९३ सातबारांचे संगणकीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात पूर्णपणे ऑनलाइन संगणकीकृत सातबारा वितरित करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना वर्षभर ३६५ दिवस ऑनलाइन सातबारा उपलब्ध झाला आहे.
 
स्वत: जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी अकोला तालुक्यातील चांदुर येथे शेतकऱ्याच्या वेशभूषेत ऑनलाइन सातबाराबाबत जनजागृती केली. महाराष्ट्रात अकोलाबरोबरच उस्मानाबाद आणि वाशीम या तीन जिल्ह्यांत ऑनलाइन सातबाराचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com