agriculture news in Marathi, effective solutions important for jagery rate down, Maharashtra | Agrowon

गूळ दर घसरणीवर ठोस उपायांची गरज
राजकुमार चौगुले
बुधवार, 3 जानेवारी 2018

मी तीन महिन्यांपूर्वी गुऱ्हाळ सुरू केले. सुरवातीला साडेतीन ते चार हजारांच्या आसपास दर मिळाला. पण नंतर गूळ दरात कमालीची घसरण झाली. आता गूळ उत्पादन काढणेच अशक्‍य होत आहे. अर्थकारण बिघडत असल्याने यंदाच्या हंगामात आम्ही नुकसानीतच जाण्याची शक्‍यता वाढली आहे. 
- शिवाजी पाटील, गूळ उत्पादक, गांधीनगर

कोल्हापूर : यंदाच्या हंगामात गुळाला दर मिळण्याचे सर्व अंदाज फोल ठरवित गेल्या महिन्यापासून गूळ दर पुन्हा घसरले आहेत. हंगामाच्या प्रारंभी चार हजार रुपये क्विंटलच्या आसपास असणारे दर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सरासरी तीन हजार रुपयांवर आले आहेत. तीन महिन्यांत तब्बल एक हजार रुपयांची घसरण झाल्याने गूळ उत्पादकांचा पुरता अपेक्षाभंग झाला आहे. 

गुजरातमधील बाजारपेठांत बाहेरचा गूळ येत असल्याने पूर्ण क्षमतेने गूळ खरेदी करण्यात व्यापारी कचरत आहेत. व्यापाऱ्या व्यापाऱ्यांत गूळ खरेदी करण्यासाठी स्पर्धा नसल्याने त्याचा विपरीत परिणाम दर घसरणीवर होत आहे. बाजार समितीत चार जानेवारीस याबाबत बैठक घेत आहे. पण केवळ बैठक न घेता दर घसरणीवर काही तरी ठोस उपाय होण्याची गरज आहे.

साधारणत: साखरेचे दर जितके असतील त्याच दरम्यान गुळाचेही दर असतात. जशी साखरेच्या दरात घसरण झाली. तशीच घसरण गुळाच्या बाबतीतही झाली. फक्त साखर घसरणीची कारणे वेगळी होती. गुळाच्या दरात घसरणीची कारणे वेगळी दिली. पण या खेळात गूळ उत्पादक भरडला जात आहे. 

जिल्ह्यात सुमारे एक हजार गुऱ्हाळांची नोंदणी असली तरी उत्पादकांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ तीनशे ते चारशे गुऱ्हाळेच सुरू आहेत. सध्या बाजार समितीत दहा ते पंधरा हजार गूळ रव्यांची आवक होत आहे. पण दर पडलेला असल्याचे उत्पादन वाढूनही तोट्याचाच सामना गूळ उत्पादकांना करावा लागत आहे.

इतर ताज्या घडामोडी
विधान परिषदेत शिवसेनेला 'लॉटरी'; कोकणात...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या...
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कृषी सल्ला : भात, भुईमुग, आंबा,...भात ः सध्या रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू...
द्राक्ष बागेत रोगांच्या प्रादुर्भावाची... सर्व द्राक्ष विभागांमध्ये...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...