agriculture news in Marathi, efforts for Cary forward cotton bales, Maharashtra | Agrowon

कापूस गाठींच्या साठ्यासाठी होतोय आटापिटा
चंद्रकांत जाधव
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

कापूस दरवाढ पुढे अपेक्षित आहे. सध्या न्यूयॉर्क वायदा फ्युचर बाजारात थोडी सुधारणा कापसासंबंधी दिसत आहे. आयातीबाबतचा कल मोठ्या उद्योगांमध्ये सध्या दिसत नाही. कारण डॉलर मजबूत होत आहे. 
- अरविंद जैन, माजी अध्यक्ष, खानदेश जीन प्रेस कारखानदार असोसिएशन, जळगाव

जळगाव ः गुलाबी बोंड अळीने कापूस उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळविले, तशी भीती कापूस उद्योगातही वाढली असून, पुढील हंगामाची चिंता निर्यातदार, खरेदीदार व उद्योगात सुरू झाली आहे. कापूस गाठींचा साठा (कॅरी फॉरवर्ड) करून घेण्याचा आटापिटा सुरू असून आंतरराष्ट्रीय कापूस बाजार मागील दोन दिवसांत तीन टक्के वधारला आहे. यातच येणाऱ्या एप्रिल महिन्यात कापूस दरामध्ये वाढ होईल, असा अंदाज बाजारपेठ विश्‍लेषकांनी व्यक्त केला आहे. 

आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात महत्त्वाच्या असलेल्या न्यूयॉर्क वायदा या फ्युचर मार्केटसंबंधीच्या संकेतस्थळावर बाजार तीन दिवसांत 75 सेंटवरून 78 सेंटवर पोचला आहे. कापसाची आवक कमी झाली असून, डॉलरही रुपयाच्या तुलनेत मजबूत होत असल्याने कापूस आयातीला काहीसा ब्रेक लागला आहे. अर्थातच अमेरिका व ऑस्ट्रेलियाची खंडी (356 किलो रुई) भारतीय खरेदीदारांना 45 हजारांत पडू लागली आहे. आपला कापूस दर्जेदार असल्याने परदेशातील निर्यातदार सौद्यांमध्ये कुठलीही तडजोड करायला तयार नाहीत.

मोठ्या कापड उद्योगांनी परदेशातून आयातीचा लावलेला धडाका थांबविला आहे. भारतीय रुईची खंडी देशांतर्गत उद्योगांना 40 हजार रुपयांत मिळत आहे. एक डॉलर महिनाभरापूर्वी 63 रुपयांपर्यंत होता. आजघडीला डॉलरची किंमत 65 रुपये दोन पैशांपर्यंत गेली आहे. परिणामी रुईची आयात आणखी महाग झाल्याची माहिती मिळाली. 
देशातील कापूस प्रक्रिया उद्योगाला दरवर्षी 315 लाख गाठी कापसाची किमान गरज असते. यातील कमाल गरज ही देशांतर्गत कापसाद्वारे भागविली जाते. काही प्रमाणातच आयात होते. गाठींची गरज भागविण्यासाठी पुढे ओढाताण होऊ शकते, असे संकेतही मिळत आहेत. 

साठवणुकीला सुरवात
देशात गुलाबी बोंड अळीवर कोणताही ठोस   उपाय शासकीय यंत्रणा व इतर संस्थांना अद्याप सापडलेला नाही. प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये म्हणजेच महाराष्ट्र, तेलंगण, सीमांध्र, कर्नाटकात कापूस उत्पादक संभ्रमात असून, ज्यांच्याकडे मुबलक पाणी आहे व ज्यांना खरिपासह रब्बीत मिळून दोन, तीन पिके घेणे शक्‍य आहे, ते शेतकरी कापसाची लागवड टाळतील, असे कापूस निर्यातदार, जिनर्स, व्यापारी यांनी गृहीत धरले असून, कापूस उत्पादन पुढील हंगामात मोठ्या प्रमाणात घटेल म्हणून आतापासून गाठींची साठवणूक (कॅरी फॉरवर्ड) सुरू झाली आहे.

देशात यंदा 40 लाख गाठी शिल्लक राहतील, असा अंदाज होता. परंतु गुलाबी  बोंड अळीने सर्व भाकितांवर, नियोजनावर पाणी फिरविले आहे. कॅरी फॉरवर्डसंदर्भात अंतिम भाकीत येत्या बुधवारी (ता. 28) मुंबईत होणाऱ्या कॉटन असोसिएशनच्या राष्ट्रीय बैठकीत केले जाणार आहे. यानंतर कापूस बाजाराची दिशा आणखी स्पष्ट होईल, असे या असोसिएशनचे सदस्य अनिल सोमाणी म्हणाले. 

प्रतिक्रिया
एप्रिलमध्ये कापसाची आवक आणखी कमी होईल. पुढे काहीशी दरवाढ अपेक्षित आहे. परंतु आंतरराष्ट्रीय बाजार अनिश्‍चितच आहे. कापसाची गरज आयातीवर अवलंबून भागविणे शक्‍य नाही. आयात आता मोठ्या उद्योगांना महाग पडू लागली आहे. पुढील हंगामासाठी निर्यातदार, जिनर्स, व्यापारी यांना गाठींची गरज आहे. ४० लाख गाठी शिल्लक राहतील, असा अंदाज होता. 
- अनिल सोमाणी, सदस्य, कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया

 

इतर अॅग्रो विशेष
फेरवाटपातून वाढतोय जलसंघर्षमहाराष्ट्र देशी जलसंघर्षांच्या संख्येत व तीव्रतेत...
शेतकरी सक्षमतेचा ‘करार’भारतीय शेतकऱ्यांसमोर आजची सर्वांत मोठी अडचण कोणती...
शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी...दापोली, जि. रत्नागिरी : शेतकऱ्यांच्या...
‘त्या’ कृषी पर्यवेक्षकांना ‘मॅट’चा...अकोला ः अमरावती विभागीय कृषी सहसंचालकाकडून सन...
भुईमुगालाही हमीभाव मिळेनाअकोला ः या हंगामात लागवड झालेल्या भुईमुगाची काढणी...
जैन इरिगेशनला विदर्भातील सूक्ष्म सिंचन...जळगाव : जगातील अग्रगण्य सिंचन कंपनी जैन इरिगेशन...
कडधान्याचा पेरा वाढण्याची शक्यतानवी दिल्ली ः भारतीय हवामान खत्याने यंदा मॉन्सून...
माॅन्सून उद्या अंदमानातपुणे : माॅन्सूनसाठी अंदमानाच्या दक्षिण भागात...
ढगाळ हवामानामुळे पारा घसरला पुणे : मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात व परिसरात...
‘राष्ट्रीय गोकूळ मिशन’मध्ये पश्चिम...मुंबई :  केंद्र पुरस्कृत‘राष्ट्रीय...
राज्यात कांदा १०० ते ९०० रुपये...नाशिकला ३०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल नाशिक...
धुळे जिल्ह्यात तृणधान्यासह कापूस...धुळे : जिल्ह्यात सुमारे चार लाख ४० हजार हेक्‍टरवर...
पीक लागवडीची अचूक वेळ साधणे महत्त्वाचेअशोक बारहाते यांची ९ एकर शेती. मात्र खरीपात...
तूर, उडीद लागवडीवर सर्वाधिक भरआमच्या भागात खरिपात सहसा पिके घेत नाहीत, रब्बी हा...
बियाणे, लागवड तंत्रात केला बदलसातारा जिल्ह्यातील उडतरे (ता. वाई) येथील सुनील...
‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅग्री...पुणे ः ॲग्रिकल्चर सेक्टरमधील खते, बी - बियाणे,...
उत्पादकांना मिळावा उत्पादनवाढीचा लाभदेशातील काही भागांत विशेषत: कर्नाटक, तमिळनाडू व...
सेसवसुली नव्हे; सर्रास लूटजळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीद्वारे आवाराबाहेर...
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामी...बंगळूर : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी...
पाणलोट गैरव्यवहार; चौघांचे निलंबन शक्यपुणे : पाणलोट खात्यातील भ्रष्टाचारप्रकरणी कृषी...