agriculture news in marathi, Eggplant, Gird up and Chopped Chops rate groth in Nashik | Agrowon

नाशिकला वांगी, घेवडा, ढोबळी मिरची तेजीत
ज्ञानेश उगले
मंगळवार, 26 जून 2018

नाशिक : येथील बाजार समितीत गत सप्ताहात वांगी, घेवडा, ढोबळी मिरची या शेतमालास तेजीचे दर मिळाले. वांग्याची आवक दिवसाला सरासरी 250 क्विंटल या प्रमाणात झाली. वांग्याला प्रतिक्विंटलला ३  ते ५ हजार व सरासरी ४ हजार रुपये दर मिळाले. या वेळी प्रति १० किलोला ३०० ते ५०० व सरासरी ४०० रुपये दर मिळाले. मागील दोन महिन्यांतील हे सर्वाधिक दर असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

नाशिक : येथील बाजार समितीत गत सप्ताहात वांगी, घेवडा, ढोबळी मिरची या शेतमालास तेजीचे दर मिळाले. वांग्याची आवक दिवसाला सरासरी 250 क्विंटल या प्रमाणात झाली. वांग्याला प्रतिक्विंटलला ३  ते ५ हजार व सरासरी ४ हजार रुपये दर मिळाले. या वेळी प्रति १० किलोला ३०० ते ५०० व सरासरी ४०० रुपये दर मिळाले. मागील दोन महिन्यांतील हे सर्वाधिक दर असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

नाशिक बाजारात मागील पंधरवड्यापासून घेवड्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. गत सप्ताहात ती नेहमीच्या तुलनेत अवघी १० टक्के होती. या वेळी घेवड्याला प्रतिक्विंटलला अडीच ते साडेतीन सरासरी ३ हजार रुपये दर मिळाले.

गत सप्ताहात ढोबळी मिरचीची आवक वाढली. तरीही देशभरातील बाजारपेठेतून ढोबळीला मागणी वाढली असल्याने दरातही चांगली वाढ होती. गत सप्ताहात नाशिक बाजार समितीच्या पंचवटी बाृजारात ढोबळीची आवक ३०० ते ४०० क्विंटल या दरम्यान होती. या वेळी ढोबळीला ४ ते ५ हजार ८००  व सरासरी ४ हजार ५०० रुपये दर मिळाले.

नाशिक जिल्ह्यात बहुतांश तालुक्‍यांत टंचाईची स्थिती आहे. या स्थितीत इगतपुरी, त्र्यंबकेश्‍वर यासह दिंडोरी, पेठ या तालुक्‍यांतून फळभाज्या व पालेभाज्यांची आवक सुरू आहे. उन्हाळा संपण्याच्या तर पावसाळा सुरू होण्याच्या टप्प्यात असताना धरणक्षेत्रातील जमिनीत भाजीपाला पिके घेतली जातात. या काळात बाजारात भाज्यांची आवक घटते. बाजारात मागणी वाढते. हे नियोजन ठेवून हा कालावधी समोर ठेवून भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. 

खरिपाची तयारी सुरू झाली असताना बाजारात बहुतांश फळभाज्यांची आवक घटल्याने त्यांचे दर स्थिर होते. वांगी, घेवडा, ढोबळी मिरचीला चांगले दर मिळाले. येत्या सप्ताहात या भाज्यांची आवक व दर टिकून राहतील, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

इतर बातम्या
खानदेशात टॅंकरचा आकडा शंभरी पारजळगाव  : खानदेशात पाणीटंचाई तीव्र होत आहे....
जंगलातून होणाऱ्या नत्र प्रदूषणाचे...अमेरिकन वनसेवेतील शास्त्रज्ञांनी जंगलातून...
वनस्पती अवशेषापासून स्वस्त, शाश्वत हवाई...पिकांचे अवशेष आणि झाडांची लाकडे यांच्यापासून...
नागपुरात लघुसिंचनचे बारा तलाव कोरडेहिंगणा, नागपूर : जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाच्या...
खानदेशात बाजरी मळणीवरजळगाव : खानदेशात बाजरी पीक मळणीवर आले आहे. आगामी...
गिरणाच्या पाण्यासाठी आज रास्ता रोकोजळगाव : दुष्काळी परिस्थितीमुळे गिरणा पट्ट्यातील...
थकीत चुकाऱ्यांसाठी स्वाभिमानी आक्रमकबुलडाणा : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी तूर, मूग, उडदाची...
सोलापूरसाठी उजनीतून पाणी सोडलेसोलापूर : उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोलापूर...
सोलापूर जिल्ह्यात टँकरचा आकडा सव्वाशेवरसोलापूर  : जिल्ह्यात उन्हाच्या वाढत्या...
लासुर्णेमध्ये जिल्हा बॅंकेसमाेर...वालचंदनगर, जि. पुणे ः लासुर्णे (ता. इंदापूर)...
अकोला, बुलडाण्यात अर्ज दाखल करण्यासाठी...अकोला : लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल...
सांगली जिल्ह्यात ऊस गाळप हंगाम अंतिम...सांगली ः साखर कारखान्यांच्या गळीत हंगामातील...
देहूगाव-लोहगाव गटातून शिवसेनेच्या शैला...पुणे : सदस्याचे जातपडताळणी प्रमाणपत्र फेटाळल्याने...
परभणी जिल्ह्यात मनरेगाअंतर्गत १४६...परभणी ः महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार...
जळगाव, धुळे, नंदुरबारमध्ये रंगणार...जळगाव ः खानदेशात रावेर वगळता नंदुरबार, धुळे व...
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती : '...मुंबई ः शेतीच्या शाश्वत सुधारणेला गती देण्यासाठी...
शेतकरी कंपन्यांमार्फत रेशीम धागा...परभणी ः ‘‘शेतकरी उत्‍पादक कंपन्‍या स्‍थापन करून...
गरिबांना वार्षिक ७२ हजारांच्या हमीचे...नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने...
नांदेड जिल्ह्यात तूर उत्पादकता...नांदेड  ः नांदेड जिल्ह्यात २०१८-१९ मधील खरीप...
सांगली : कडब्याचे दर पोचले साडेचार हजार...सांगली  ः यंदा दुष्काळी स्थिती तीव्र आहे....