agriculture news in marathi, eggs prodution center start soon for sericulture, aurangabad,maharashtra | Agrowon

औरंगाबाद येथे होणार अंडीपुंज निर्मिती केंद्र
टीम अॅग्रोवन
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

राज्यात रेशीम उद्योग विस्तारत आहे. रेशीम उद्योगातील अंडीपुंज निर्मितीचा विषय अंडीपुंज निर्मिती केंद्रामुळे मार्गी लागणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून जागा मिळाली असून केंद्र निर्मितीसाठी आवश्‍यक खर्चाचा प्रस्ताव विभागीय आयुक्‍तालयाकडून शासनास पाठविण्यात आला आहे.
- दिलीप हाके, सहायक संचालक (रेशीम), औरंगाबाद.

औरंगाबाद : राज्यात रेशीम उद्योग विस्तारत आहे. या उद्योगासाठी आवश्यक अंडीपुंज निर्मितीत राज्य स्वयंपूर्ण होण्यासाठी औरंगाबाद येथे अंडीपुंज निर्मिती केंद्र उभारले जाणार आहे. आजघडीला अंडीपुंजसाठी कर्नाटक राज्यावर अवलंबून राहवे लागते. ही स्थिती संपुष्टात आणण्यासाठी रेशीम विभागाने प्रयत्न चालविले आहेत. अंडीपुंज निर्मिती केंद्राबरोबरच आवश्‍यक असलेले शीतगृहदेखील उभारले जाणार आहे.

जालन्यात प्रायोगिक तत्त्वावरील कोष खरेदी बाजारपेठ, स्वयंचलित रेलींग युनिट, औरंगाबाद जिल्ह्यात चॉकी सेंटर, रोपवाटिकेद्वारे तुती रोपाची निर्मिती यानंतर आता अंडीपुंज निर्मिती केंद्र उभारणीच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल राज्यात विस्तारत असलेल्या रेशीम उद्योगासाठी पूरक ठरणार आहे. राज्याला गतवर्षापर्यंत ४० लाख अंडीपुंजाची गरज होती. त्यापैकी जवळपास १६ लाख अंडीपुंजाची निर्मिती गडहिंग्लज येथील अंडीपुंज निर्मिती केंद्रात होत होती.

यंदा विस्तारलेल्या तुती क्षेत्रामुळे अंडीपुंजाची गरज जवळपास ८० लाखांवर पोचली आहे. गडहिंग्लजच्या अंडीपुंज निर्मिती केंद्राने क्षमतेच्या पुढे जाऊनही कामगिरी केल्यास अंडीपुंज निर्मिती २५ लाखांपेक्षा अधिक होण्याची शक्‍यता नाही. शिवाय तेवढी अंडीपुजी उपलब्ध झाली तरी राज्याची गरज भागविण्यासाठी किमान ५५ लाख अंडीपुंजाची गरज लागणारच आहे. त्यासाठी कर्नाटकवर अवलंबून राहण्याशिवाय पर्याय नाही. रेशीम उद्योगातील महतत्त्वपूर्ण अंडीपुज निर्मितीसाठी लागणारे कोट्यवधी रुपये वाचविण्यासाठी महाराष्ट्रात अंडीपुंज निर्मिती केंद्र उभारण्याची नितांत गरज आहे; तसेच महाराष्ट्रातच अंडीपुज निर्मिती झाल्यास निर्माण झालेल्या अंडीपुंज येथील वातावरणाशी समरस असतील. त्यामुळे रेशीम उत्पादन वाढविण्यासह त्याचा मोठा हातभार लागण्याची आशा आहे.

विभागीय आयुक्‍त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या विशेष पुढाकारातून अंडीपुंज निर्मितीसाठीचा जवळपास ४० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव पावसाळी अधिवेशनातच शासनाला पाठविण्यात आला आहे. शिवाय औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी चिकलठाणा एमआयडीसीमध्ये गट क्रमांक २१८ मधील जवळपास २५ एकर जागा या केंद्रासाठी दिली आहे.  
 

इतर ताज्या घडामोडी
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...
शेतकऱ्यांच्‍या थकवलेल्या पैशांची...पुणे ः शेतीमालाचा लिलाव झाल्यानंतर २४ तासांत पैसे...
नगर जिल्हा परिषदेचा यंदा ४४ कोटी...नगर : जिल्हा परिषदेत सोमवारी झालेल्या सर्वसाधारण...
नांदेड परिमंडळात सौर कृषिपंप योजनेसाठी...नांदेड ः मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत...
शेतीमाल तारण योजनेत ४०६ शेतकऱ्यांनी...औरंगाबाद : मराठवाड्यातील जालना, परभणी व हिंगोली...
ऊस उत्पादक शेतकरी देणार शहिदांच्या...कोल्हापूर : पुलवामा जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यात...
तूर खरेदीतील अनागोंदीविरुद्ध आंदोलनअकोला  ः जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात...
'पुलवामा'चा सूत्रधार काश्‍मीरमध्येच?नवी दिल्ली : पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याचा...
उन्हाळी पिकातील खतांचे व्यवस्थापनउन्हाळी हंगामात प्रामुख्याने भुईमूग, सूर्यफूल,...
केम प्रकल्पाला लागली भ्रष्टाचाराची वाळवीअमरावती : अंमलबजावणीपेक्षा गैरव्यवहार व...
‘पेंच’ लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १३...नागपूर : मध्य प्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच...
‘एसटी’साठी जागा आठ हजार अन्‌ अर्ज ४१...सोलापूर : राज्य परिवहन महामंडळात चालक व...
दररोजचा दोनशे टन द्राक्षपुरवठा ठप्पपिंपळगाव बसवंत, जि. नाशिक : जम्मू-काश्‍...
'देशात आयात होणाऱ्या सोयाबीनवर बंदी...पुणे : देशांतर्गत दर वाढत असल्याने...
बांबू उत्पादन, गुंतवणूक संधीसाठी...मुंबई : देशातील बांबू लागवडीला चालना देण्याबरोबरच...