Agriculture News in Marathi, eggs rate down, India | Agrowon

अंडी दरातील घसरणीचा पोल्ट्रीधारकांना फटका
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 21 डिसेंबर 2017

विटा, जि. सांगली ः मार्गशीर्ष महिना सुरू होण्यापूर्वी प्रतिअंडे दर पाच रुपये २० पैसे असा उच्चांकी पातळीवर पोचला होता. परंतु, आठ दिवसांतच प्रतिअंडे साडेतीन रुपये दर झाला. त्यामुळे पोल्ट्रीधारकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

अंडी व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे व ‘नेक’च्या (अंडी समन्वय समिती) चुकीच्या धोरणामुळे अंड्यांच्या दरात सतत चढ-उतार सुरू आहेत. मार्गशीर्ष महिना सुरू होण्यापूर्वी ५.२० पैसे प्रतिअंडे दर मिळू लागला. परंतु, पुन्हा दर घसरू लागले. ७३ पैसे कमिशन वजा जाता सध्या प्रतिअंडे ३.५० रुपये दर पोल्ट्रीधारकांच्या हातात मिळू लागला आहे.

विटा, जि. सांगली ः मार्गशीर्ष महिना सुरू होण्यापूर्वी प्रतिअंडे दर पाच रुपये २० पैसे असा उच्चांकी पातळीवर पोचला होता. परंतु, आठ दिवसांतच प्रतिअंडे साडेतीन रुपये दर झाला. त्यामुळे पोल्ट्रीधारकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

अंडी व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे व ‘नेक’च्या (अंडी समन्वय समिती) चुकीच्या धोरणामुळे अंड्यांच्या दरात सतत चढ-उतार सुरू आहेत. मार्गशीर्ष महिना सुरू होण्यापूर्वी ५.२० पैसे प्रतिअंडे दर मिळू लागला. परंतु, पुन्हा दर घसरू लागले. ७३ पैसे कमिशन वजा जाता सध्या प्रतिअंडे ३.५० रुपये दर पोल्ट्रीधारकांच्या हातात मिळू लागला आहे.

सध्या थंडीचे दिवस असल्याने अंड्याला मागणी आहे. मोठ्या प्रमाणात अंडी विक्री होत आहे. सध्या खानापूर तालुका व विटा शहरांत अकरा लाख अंड्यांवरील कोंबड्या आहेत. रोज आठ ते नऊ लाख अंडी उत्पादन होत आहे. चांगला दर मिळत असल्याने पोल्ट्रीधारकांनी अंड्यांचा साठा करून ठेवला होता. परंतु, व्यापाऱ्यांनी कमी दराने अंडी खरेदी सुरू केली आहे.

अंडी नाशवंत असल्याने त्याचा किती दिवस साठा करून ठेवणार, असे पोल्ट्रीधारक सांगत आहेत. अंडी व्यापारी साडेतीन रुपये दराने अंडी खरेदी करतात. त्याच अंड्याची किरकोळ विक्री सहा रुपयांनी केली जाते. त्यामुळे पोल्ट्रीधारकांचा ना नफा-ना तोटा असा व्यवसाय सुरू आहे.

देशी अंड्याला दहा रुपये दर
संसाराला आर्थिक हातभार लागण्यासाठी सर्वसामान्यांनी देशी कोंबड्यापालन सुरू केले आहे. देशी अंड्यांना मागणी आहे. प्रतिअंडे पाच रुपये असलेला दर आता दहा रुपये झाला आहे.

‘नेक' अंड्याचे दर ठरवत असते. अंड्याचे दर कमी केले, की समितीशी संबंधित असलेले लोक करोडो रुपयांची गुंतवणूक करून मोठ्या प्रमाणात अंडी खरेदी करतात. त्याचा साठा करून पुन्हा १५ ते २० दिवसांनी समितीने दर वाढविला, की ती अंडी विक्री करून पैसे कमवायचे, असा उद्योग सुरू आहे. शासनाने या समितीवर नियंत्रण ठेवून शेतीपूरक व्यवसाय असणाऱ्या पोल्ट्री व्यवसायिकांना न्याय द्यावा.
- शत्रुघ्न जाधव, पोल्ट्री व्यवसायिक, विटा

 

इतर ताज्या घडामोडी
स्मार्ट अचिव्हर्स योजनेचे विदर्भातील...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
स्मार्ट अचिव्हर्स योजनेचे वऱ्हाडमधील...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
वरुड येथे दूध दरप्रश्नी `स्वाभिमानी`चे...अमरावती   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध...
स्मार्ट अचिव्हर्स योजनेतील सहावे बक्षिस...पुणे ः राज्यातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास...
नाबार्ड पाच हजार `एफपीओं`चे उद्दिष्ट...``नाबार्डने शेतकरी उत्पादक संघ (एफपीओ) स्थापन...
अन्य सस्तनापेक्षा उंदराची विचार...दृष्टी किंवा दृश्यावर आधारीत समस्या सोडविण्यासाठी...
आंदोलन होणार असेल तर, आमचेही कार्यकर्ते...नाशिक : दुधाला दरवाढ दिली असून दूध संघांनी...
पशुखाद्याद्वारेही विषारी घटक शिरताहेत...पर्यावरणामध्ये वाढत असलेल्या सेंद्रिय प्रदूषक...
कोय, भेट पद्धतीने फळझाडांचे कलमीकरणआंब्याची अभिवृद्धी कोय कलम, पाचर कलमांद्वारे केली...
सातत्याने हेडर्स ठरू शकतात मेंदूसाठी...सध्या विश्वचषकामुळे फुटबॉलचा ज्वर सर्वत्र पसरलेला...
शेतकऱ्यांना अनुदान तत्त्वावर कामगंध...जळगाव : बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी...
दारणा धरण ५०, तर पुनंद १०० टक्के भरलेइगतपुरी, जि. नाशिक  :  इगतपुरी...
मुंबईला एक थेंबही दूध जाऊ देणार नाहीनाशिक : दुधाला ठरवून दिलेला दर मिळत नसल्याने...
सोलापूर बाजार समिती पदाधिकारी निवड...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
वीज वितरण यंत्रणा दुरुस्तीसाठी ७५००...नागपूर   : राज्यातील वीज वितरण करणाऱ्या...
परभणीतील पीकविमा परतावाप्रश्नी ठोस...परभणी : पीकविमा परतावाप्रश्नी ठोस तोडगा निघत...
किसान सभा,शेतकरी संघर्ष समितीचा दूध...नाशिक  : दुधाला किमान २७ रुपये भाव द्यावा,...
मंत्री जानकर यांची दूध दरवाढीत एजंटशिप...कऱ्हाड, जि. सातारा : दुग्ध विकास व...
पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची...पुणे  : पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रांमध्ये...
कपाशी नुकसानीपोटी मराठवाड्यासाठी ४०७...औरंगाबाद  : गुलाबी बोंड अळीच्या...