agriculture news in marathi, eight dams ful in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यातील गंगापूरसह आठ धरणे भरली
टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 सप्टेंबर 2018

नाशिक : गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दमदार पावसामुळे यंदा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच गंगापूर धरण १०१ टक्के भरले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्यांदाच गंगापूर धरण समूहात शंभर टक्के पाणी साठल्याने शहराचा पाणीप्रश्न मिटला अाहे. भविष्यात पावसाचा भरवसा देता येत नसल्याने पाटबंधारे खात्याने धरणातून सुटणारे पाणी रोखले आहे.

नाशिक : गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दमदार पावसामुळे यंदा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातच गंगापूर धरण १०१ टक्के भरले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्यांदाच गंगापूर धरण समूहात शंभर टक्के पाणी साठल्याने शहराचा पाणीप्रश्न मिटला अाहे. भविष्यात पावसाचा भरवसा देता येत नसल्याने पाटबंधारे खात्याने धरणातून सुटणारे पाणी रोखले आहे.

जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुफान झालेल्या पावसामुळे धरणात ७० टक्के जलसाठा झाल्यावर पाटबंधारे खाते व जिल्हा प्रशासनाने गंगापूर धरणातून पाणी सोडले. परिणामी गोदावरी नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली. असाच प्रकार दारणा धरणाच्याबाबत घडल्यामुळे तेथूनही मोठा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे एकट्या नाशिक जिल्ह्यातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणासाठी २२ टीएमसी पाणी पोहोचले. परंतु त्यानंतर जवळपास तीन आठवडे पावसाने दडी मारल्यामुळे चिंताग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यातील अन्य धरणांमध्येही जेमतेम साठा असल्यामुळे गंगापूर धरणातील उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याचे नियोजन करण्यात आले होते.

अाॅगस्टच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचे दमदार आगमन झाले. त्यामुळे गंगापूर धरण पाणलोट क्षेत्राचा लाभ धरण समूहाला झाला. त्र्यंबकेश्वर, आंबोली या भागात कमी अधिक पाऊस असल्याने गंगापूर धरण १०१ टक्के भरले. या धरण समूहातील कश्यपी ९९, गौतमी गोदावरी ९८ व आळंदी धरण १०० टक्के भरले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात गंगापूर धरणात ९४ टक्के, तर समूहात ९६ टक्के जलसाठा होता. गौतमी गोदावरी, आळंदी, करंजवण, वाघाड, दारणा, भावली, वालदेवी, चणकापूर या धरणांतून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्ह्यातील धरणे ८५ टक्के भरली होती.

इतर अॅग्रो विशेष
कृषी विकास दराची मोठी बुडीमुंबई  ः देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर...
कर्नाटकी बेंदराच्या निमित्ताने आज ...कोल्हापूर  : राज्यातील कर्नाटक सीमेलगतच्या...
उत्कृष्ट संत्रा व्यवस्थापनाचा युवा...वयाच्या विसाव्या वर्षीच शेतीत उतरलेल्या ऋषीकेश...
मॉन्सूनचे प्रवाह अजूनही मंदचपुणे  : अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर...
ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाजपुणे  : ‘वायू’ चक्रीवादळ निवळल्यानंतर...
एफआरपी द्या, काटामारी रोखा : बच्चू...पुणे :  राज्यातील ऊस उत्पादक...
‘जीएम’चा तिढामहिनाभरापूर्वी हरियाना राज्यात एका शेतकऱ्याच्या...
राज्यातील दूध संघांपूढे ‘अमूल’चे कडवे...पुणे: राज्याच्या दूध उद्योगात ‘अमूल’चा होत असलेला...
विदर्भ, मराठवाड्यात उष्ण लाटेचा इशारापुणे : वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने...
करारावरील अश्‍वगंधा लागवड ठरली डोकेदुखीगडचिरोली ः अश्‍वगंधा लागवड आणि खरेदीचा करार करीत...
शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी बँक...वर्धा : पात्र असतानाही कर्जमाफीचा लाभ न...
‘कृषी’तील सुधारणेस कृतिगट : निती आयोगनवी दिल्ली : कृषी क्षेत्रातील अमूलाग्र...
खातेवाटप जाहीर : अनिल बोंडे कृषिमंत्री...मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७००...नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक...
खास पोह्यासाठी भाताची ‘कर्जत शताब्दी’...रत्नागिरी ः दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण...
महिला गटाची प्रक्रिया उद्योगातून ‘...बार्शीटाकळी (जि. अकोला) गावातील दहा महिलांनी...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथमहिलांसाठी बचत गट चळवळ फायद्याची ठरली आहे. बचत...
कृषी, संलग्न विद्याशाखांसाठी ‘खासगी’कडे...पुणे : राज्यातील कृषी व संलग्न विद्याशाखांच्या...
गायी आणि म्हशींच्या गुणसूत्रांची बॅंक...पुणे ः  गायी, म्हशींच्या आनुवंशिक सुधारणा...
मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थितीपुणे   : अरबी समुद्रात गुजरातच्या...