एकनाथ डवलेंकडे कृषी सचिवपदाचा पूर्णवेळ पदभार

एकनाथ डवले यांच्याकडे कृषी विभागाच्या सचिवपदाचा पूर्णवेळ पदभार
एकनाथ डवले यांच्याकडे कृषी विभागाच्या सचिवपदाचा पूर्णवेळ पदभार

मुंबई : मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्याकडे कृषी विभागाच्या सचिव पदाचा पूर्णवेळ पदभार देण्यात आला आहे. त्यांच्याकडे मृद व जलसंधारण विभागाचीही तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे.

 श्री. डवले १९९७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांच्याकडे मृद व जलसंधारण आणि रोजगार हमी योजना विभागाचाही पूर्णवेळ कार्यभार होता. आता त्यांच्याकडील हा पूर्णवेळ पदभार काढुन कृषी विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच,  मृद व जलसंधारण विभागाचा त्यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपविण्यात आला आहे.  श्री. डवले यांचा कृषी क्षेत्रातील अभ्यास आणि कार्यशैली यामुळे त्यांच्याकडे कृषी विभागाच्या सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी नाशिकचे विभागीय आयुक्त म्हणूनही उत्कृष्ट काम पाहिले आहे. शासनाच्या ‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठीही त्यांचा मोठा वाटा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com