वाशीम जिल्ह्यात आज ३२ ग्रामपंचायतींची निवडणूक

वाशीम जिल्ह्यात आज ३२ ग्रामपंचायतींची निवडणूक
वाशीम जिल्ह्यात आज ३२ ग्रामपंचायतींची निवडणूक

वाशीम : राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील चार तालुक्यांत ३२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक, तर ६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी पोट निवडणूक होत आहे. रविवारी (ता. २४) यासाठी मतदान घेतले जाणार आहे.  सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत हे मतदान होणार आहे. मतदान होत असलेल्या सर्व ग्रामपंचायत निवडणूक मतदान केंद्रावर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.  

वाशीम तालुक्यातील एकांबा, अडगाव खुर्द, देवठाणा बुद्रुक, जांभरुण नावजी, वांगी, सोयता, रिसोड तालुक्यातील भरजहाँगीर, मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे, खडकी इजारा, कुत्तरडोह, मुसळवाडी, अमाना, मंगरूळपीर तालुक्यातील मंगळसा, लाठी, चिखली, तपोवन, बिटोडा, इचोरी, मानोरा तालुक्यातील  बोरव्हा, चौसाळा, दापुरा बुद्रुक, दापुरा खुर्द, ढोणी, फुलउमरी, गिरोली, जामदरा घोटी, काली, कोलार, पाळोदी, सोमेश्वरनगर, उमरी बुद्रुक, उमरी खुर्द या ३२ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. 

जिल्ह्यातील ६ ग्रामपंचातींच्या सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये वाशीम तालुक्यातील गोंडेगाव, रिसोड तालुक्यातील घोन्सर, मोरगव्हाण, मंगरूळपीर तालुक्यातील वसंतवाडी, मानोरा तालुक्यातील खांबाळा, कारंजा तालुक्यातील झोडगा बुद्रुक या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीमुळे गेल्या काही दिवसांपासून प्रचार शिगेला पोचला होता. येत्या १८ एप्रिलला जिल्ह्यात लोकसभेसाठी मतदान होणार आहे. त्यापूर्वीच ग्रामपंचायत निवडणुकीमुळे या गावांमधील वातावरण तापले होते. आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात झाले. शनिवारी (ता. २३) ही मुदत संपल्याने सर्व प्रचार साहित्य काढून घेण्यात आले. सकाळी मतदान सुरू होईल. त्यानंतर होणाऱ्या मतमोजणीकडे या गावातील नागरिकांचे लक्ष आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com