agriculture news in marathi, election cost of the market committees | Agrowon

बाजार समित्यांच्या खर्चाचा लागेना ताळमेळ
टीम अॅग्रोवन
शनिवार, 1 सप्टेंबर 2018

बाजार समित्यांच्या निवडणुकीत आता शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. त्यानुसार प्रतिमतदार ५० रुपये खर्च करणे अपेक्षित आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत खर्चाचा हिशेब प्राप्त झाल्यानंतर त्याला मंजुरी दिली जाईल.
- यशवंत गिरी, सचिव, सहकार निवडणूक प्राधिकरण

सोलापूर : सोलापूर आणि बार्शी बाजार समितीच्या निवडणुका होऊन आता दीड महिन्याचा कालावधी संपला. परंतु, या निवडणुकीसाठी नेमका किती खर्च झाला, याचा ताळमेळ अद्यापही लागलेला नाही. संबंधित बाजार समित्यांकडून याबाबत सातत्याने विचारणा होत असतानाही निवडणुकीचा खर्च जाहीर झालेला नाही.

सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या सूचनांनुसार बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रति मतदार ५० रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. निवडणुकीपूर्वी   सोलापूर व बार्शी या दोन्ही बाजार समित्यांकडून निवडणूक निधी घेण्यात आला आहे. सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या सूचनांनुसार या बाजार समित्यांकडून घेतलेल्या निधीतील निम्मी रक्‍कम त्यांना परत करावी लागणार आहे. परंतु, त्याबाबतची कार्यवाही संथगतीने सुरू असल्याने बाजार समित्यांची मोठी रक्‍कम निवडणूक शाखेकडे अडकून पडल्याचे दिसून येते. मतदार याद्या बनविणे व प्रसिद्ध करणे, मतदार याद्यांच्या  छायांकित प्रती काढणे, मतदान साहित्यांची वाहतूक, नियुक्‍त कर्मचाऱ्यांचा भत्ता, चहा-पाणी, जेवण याचाही खर्च बाजार समितीच्या निवडणूक निधीतून कपात करण्यात येणार आहे.

आकडे बोलतात...

सोलापूर बाजार समिती
मतदान केलेले मतदार : ५९,३५०
अपेक्षित खर्च : २९,६७,५०० रुपये
बाजार समितीने दिलेला निधी : ८६.२० लाख

बार्शी बाजार समिती
मतदान केलेले मतदार : ६१,१७२
अपेक्षित खर्च : ३०,५८,६०० रुपये
बाजार समितीने दिलेला निधी : ७४.५० लाख

 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...