नाशिक जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायतींची २६ सप्टेंबरला निवडणूक

नाशिक जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायतींची २६ सप्टेंबरला निवडणूक
नाशिक जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायतींची २६ सप्टेंबरला निवडणूक
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, २६ सप्टेंबरला मतदान, तर २७ ला मतमोजणी केली जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींमध्ये रिक्त असलेल्या सरपंचपदासाठीही या निवडणुका होणार आहेत. ग्रामस्थ त्यांच्या मतदानातून थेट भावी सरपंचाची निवड करतील.
राज्यातील ऑक्टोबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ या काळात मुदत संपणाऱ्या व नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी (दि. २३) जाहीर केला. यामध्ये १०४१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक, तर ६९ ठिकाणी थेट सरपंचपदासाठी पोटनिवडणुका होत आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
उमेदवारांना ५ ते ११ सप्टेंबर या काळात रविवार सुटीचा दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत अर्ज दाखल करायचा आहे. बुधवारी (ता. १२) दाखल अर्जांची सकाळी ११ वाजता छाननी केली जाईल. शनिवारी (ता. १५) दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत देण्यात आली आहे. त्याचदिवशी दुपारी अंतिम उमेदवारांची यादी तसेच चिन्हवाटप केले जाईल. दरम्यान, २९ सप्टेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक निकालाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करायची आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
या ग्रामपंचायतीत मतदान (तालुकानिहाय) :  इगतपुरी : धारगाव, शिरसाटे, नागोसली, ओंडली, आडवण, लक्ष्मीनगर, कृष्णनगर, दौंडत, उंबरकोन, सोमज, मोगरे, मोडाळे, कुशेगाव, बोरटेंभे, नांदगाव सदो.   त्र्यंबकेश्‍वर : महादेवनगर, सापगाव, हरसुल, होलदारनगर, वायघोळपाडा.   निफाड : पालखेड.   येवला : शिरसगाव लौकी.   बागलाण : जामोटी.     देवळा : वरवंडी.   नाशिक : पिंपळगाव गुरूडेश्‍वर.  सरपंच निवड :
पिंपळगाव (नाशिक), टाकेघोटी, (इगतपुरी), वनारवाडी, गवळवाडी, ननाशी (दिंडोरी), भवाडे (बागलाण), तारूखेडले (निफाड), निवाणे (कळवण).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com