वाशीम जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतींचे २४ मार्चला होणार मतदान

वाशीम जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतींचे २४ मार्चला होणार मतदान
वाशीम जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतींचे २४ मार्चला होणार मतदान

वाशीम : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील ३२ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक , ६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या रिक्त जागांसाठी पोट निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यामुळे सार्वत्रिक व पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे . 

सार्वत्रिक निवडणूक व पोटनिवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र ५ ते ९ मार्च या कालावधीत भरता येईल. नामनिर्देशनपत्रांची छाननी ११ मार्च रोजी केली जाईल. १३ मार्च रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. त्याचदिवशी दुपारी ३ वाजेनंतर निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. २४ मार्च रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान मतदान घेण्यात येईल. मतमोजणी २५ मार्चला होईल. 

थेट सरपंच निवडीसाठी पोटनिवडणूक   जिल्ह्यातील ६ ग्रामपंचातींच्या सरपंचपदाच्या रिक्त जागांसाठी वाशीम तालुक्यातील गोंडेगाव, रिसोड तालुक्यातील घोन्सर, मोरगव्हाण, मंगरूळपीर तालुक्यातील वसंतवाडी, मानोरा तालुक्यातील खांबाळा, कारंजा तालुक्यातील झोडगा बुद्रुक या ग्रामपंचायतींत निवडणूक होईल.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायती (तालुकानिहाय)

वाशीम एकांबा, अडगाव खुर्द, देवठाणा बुद्रुक, जांभरुण नावजी, वांगी, सोयता
रिसोड भरजहाँगीर
मालेगाव पांगरी नवघरे, खडकी इजारा, कुत्तरडोह, मुसळवाडी, अमाना
मंगरूळपीर मंगळसा, लाठी, चिखली, तपोवन, बिटोडा, इचोरी
मानोरा बोरव्हा, चौसाळा, दापुरा बुद्रूक, दापुरा खुर्द, ढोणी, फुलउमरी, गिरोली, जामदरा घोटी, काली, कोलार, पाळोदी, सोमेश्वरनगर, उमरी बुद्रुक, उमरी खुर्द 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com