पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांना वीज, नळजोडणी

पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांना वीज, नळजोडणी
पुणे जिल्ह्यातील अंगणवाड्यांना वीज, नळजोडणी

पुणे  : स्वतंत्र इमारत असलेल्या जिल्ह्यातील ३ हजार ३९१ अंगणवाड्यांना वीज आणि नळजोडणी देण्यात येत आहे. महिनाभरामध्ये एक हजार अंगणवाड्यांना नव्याने वीज आणि नळजोडणी देण्यात आली असून, उर्वरित अंगणवाड्यांमध्ये ३१ ऑक्टोबरपर्यंत जोडणीचे काम पूर्ण करण्यात यईल, अशी माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती राणी शेळके यांनी दिली.

‘एकूण ४ हजार ६२३ अंगणवाड्यांपैकी ३ हजार ३९१ अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारती आहेत. अंगणवाडी अर्धा दिवस भरत असल्याने तेथे विजेची विशेष अावश्‍यकता भासत नव्हती. ५६० अंगणवाड्यांमध्ये पूर्वीपासून वीजजोडणी होती. स्वतंत्र इमारती असणाऱ्या अंगणवाड्यांना वीज आणि नळजोडणी देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर महिनाभरामध्ये नव्याने १ हजार वीजजोडणी, तर १ हजार ८९६ अंगणवाड्यांना नळजोडणी देण्यात आली आहे. उर्वरित १ हजार ८३१ अंगणवाड्यांना वीज आणि १ हजार ४९१ अंगणवाड्यांना महिनाअखेरपर्यंत नळजोडणी देण्यात येणार असून, पाणीपट्टी आणि वीजबील ग्रामपंचायतीमार्फत अदा करण्यात येणार आहे.

ग्रामीण भागात शालेय शिक्षणाचे प्रवेशद्वार असलेल्या अंगणवाड्या आता ‘हायटेक’ होत असून, विविध सुविधा देण्यात येत आहे. अनेक अंगणवाड्यांमध्ये लोकसहभागातून विविध वस्तू भेट दिल्या आहेत. वीजजोडणी उपलब्ध झाल्याने विजेवर चालणाऱ्या वस्तू भेट देता येणार आहेत. बालकांसाठी अंगणवाडीतील शिक्षण आणखी अल्हाददायक आणि आनंदी होण्यास मदत होईल, तसेच लहान मुले अनुकरणाने अनेक गोष्टी शिकत असल्याने बडबडगीते ऐकविणे, व्हिडिओ दाखविणे, तसेच इतर डिजिटल शालेय साहित्याच्या वापर वाढवून शिक्षणातील गोडी वाढविणे शक्य होणार आहे. स्वतंत्र नळजोडणी मिळल्याने पिण्याबरोबरच, इतर वापरासाठीही पुरेसे पाणी मिळून, स्वच्छतेची सवयही लावता येणार आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी अंगणवाड्यांमध्ये वीज व नळजोडणी देण्याची सूचना मांडली होती. त्यानुसार स्वत:ची इमारत असलेल्या अंगणवाड्यांमध्ये जोडण्या देण्यात येत आहेत. वीज उपलब्ध झाल्याने फॅन, टीव्ही, रेडिओ, म्युझिक सिस्टिम, डिजिटल शालेय साहित्य आदींचा वापर करता येणार आहे. अंगणवाडीमध्ये येणाऱ्या लहानग्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढणार आहे. - दीपक चाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बालकल्याण विभाग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com