agriculture news in marathi, Electricity connection cut reverse in agitaion, akola, Maharashtra | Agrowon

कृषिपंपांची वीज जोडणी तोडल्याने अांदोलनाची ठिणगी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 4 नोव्हेंबर 2017

अकोला ः अाधीच पिकांच्या उत्पादकतेत अालेली घट, बाजारात शेतमालाला नसलेल्या भावामुळे शेतकरी अडचणीत सापडला अाहे.  त्यातच अाता वीज कंपनीने वसुलीसाठी कृषिपंपांची जोडणी तोडण्याची माेहीम सुरू केली अाहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाल असून, ठिकठिकाणी वीज कार्यालयात अांदोलने वाढली अाहेत. बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उग्र अांदोलने केली.   

अकोला ः अाधीच पिकांच्या उत्पादकतेत अालेली घट, बाजारात शेतमालाला नसलेल्या भावामुळे शेतकरी अडचणीत सापडला अाहे.  त्यातच अाता वीज कंपनीने वसुलीसाठी कृषिपंपांची जोडणी तोडण्याची माेहीम सुरू केली अाहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाल असून, ठिकठिकाणी वीज कार्यालयात अांदोलने वाढली अाहेत. बुलडाणा, वाशीम जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उग्र अांदोलने केली.   

वाशीम जिल्ह्यात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मालेगावमध्ये वीज अभियंत्याला मारहाण केल्याची घटना समोर अाली. शिरपूर येथे शेतकऱ्यांनी शेकडोच्या संख्येत धडक दिली. बुलडाण्यात स्वाभिमानीच्या नेत्यांनी वीज कंपनीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात ठिय्या अांदोलन केले. या संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात अांदोलन झाले. 

ऐन रब्बी हंगामात महावितरणने विज बील भरल्याशिवाय शेतकऱ्यांचे कनेक्शन जोडून दिले जाणार नाही, अशी भूमिका घेतल्याने आणि अनेक गावांमधील वीज रोहित्र जळाल्याने शेतकऱ्यांचा हंगाम धोक्यात आला आहे. या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता कडाळे यांना घेराव घातला. याचा धसका घेत महावितरणने तातडीने १५ गावांना वीज रोहित्र देण्याची कार्यवाही सुरू केली.

सोयाबीनवर भीस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या हातावर सरकारने कवडीमोल भाव दिल्याने खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेला. त्यामुळे खरिपाची कसर रब्बीमध्ये काढून दोन पैसे हातात पडावे म्हणून बळिराजाने रात्रंदिवस मेहनत करून गहू, हरभरा, भाजीपाल्याची पिके लावली; मात्र सरकारने शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचे कनेक्शन तोडण्याचा सपाटा सुरू केला होता. विज बील भरा तरच विद्युत कनेक्शन जोडले जाईल, अशी भूमिका महावितरणने घेतली.  

दुसरीकडे अनेक गावांमधील वीज रोहित्र जळाल्यामुळे तेथील विद्युत पुरवठा बंद आहे. त्यामुळे शेतकरी पिकांना पाणी देऊ शकत नाही. या गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी श्री. तुपकर यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी वीज कंपनीचे कार्यालय गाठून अधीक्षक अभियंता कडाळे यांना घेराव घातला. याची दखल घेत तातडीने बुलडाणा तालुक्यातील भादोला, वाडी, रायपुर, साखळी बुद्रुक आणि सव, तर चिखली तालुक्यातील कारखेड, गोदरी, सोमठाणा, मगरध्वज, खंडाळा, मिसाळवाडी, अंचरवाडी आणि केळवद अशा एकूण १५ गावांत रोहित्र बसविण्याचे काम महावितरण लगेच हाती घेतले. 

इतर ताज्या घडामोडी
पुण्यात पालेभाज्यांची आवक घटली; दर तेजीतपुणे  ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
उन्हाळ्यातील उत्पादनघटीवर बाजाराची भिस्तयेत्या दिवसांत उन्हाळ्याची तीव्रता वाढून...
...कृत्रिम पावसाचीही तयारी !सोलापूर  : यंदाच्या वर्षी राज्यात समाधानकारक...
आरोग्यपूर्ण मातीतून वाढते जनावरांचे वजनचराईच्या योग्य पद्धतीतून मातीचे व्यवस्थापन...
राज्यस्तरीय खरीप आढाव्याची २ मे रोजी...मुंबई  : राज्य सरकारने खरीप हंगामाच्या...
शेतकरी, कारखानदार मिळून सरकारला धडा...कोल्हापूर  : साखरेचे दर कोसळत असताना केंद्र...
अंडी उत्पादनात दररोज एक लाखाने घटविटा, जि. सांगली  : वाढती उष्णतेची झळ...
व्यापाऱ्यांकडे थकलेले पैसे ३०...येवला, जि. नाशिक  : अंदरसूल येथील कांदा...
'शेतकरी आत्महत्येला सरकारचे धोरण...नगर  ः देशात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या...
दुग्ध विकासाला हवी वैज्ञानिक क्रांतीची...नागपूर  : दुग्ध व्यवसायाचा विकास करायचा असेल...
चंदगडमध्ये काजू उत्पादन घटले चंदगड, जि. कोल्हापूर  ः काजूच्या...
पुणे विभागातील धरणांत २११.४० टीएमसी... पुणे  ः उन्हाचा ताप वाढू लागताच पुणे...
नांदेड जिल्ह्यात ८ लाख हेक्टरवर खरीप... नांदेड :  नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप...
नगर जिल्ह्यात ३८ हजार क्विंटल हरभरा... नगर : जिल्ह्यामध्ये आतापर्यंत आठ हरभरा खरेदी...
बोंड अळीमुळे झालेल्या नुकसानीची मदत... नागपूर  : बोंड अळीसंदर्भातील आदेश चुकीचा...
उभी पिके जळू लागल्याने बॅंक संचालकाची...वालचंदनगर, जि. पुणे : इंदापूर अर्बन बॅंकेचे...
‘कृषिसेवक’साठी किमान पदवीची पात्रता हवीअकोला : कृषी सहायक, कृषिसेवक या पदावर...
हिंगोलीत हळद ६६०० ते ७५०० रुपये क्विंटल हिंगोली  : हिंगोली कृषी उत्पन्न बाजार...
राष्ट्रीय धोरणात हवे मक्याला स्थानदेशातील एकूण मक्याच्या खपामध्ये पोल्ट्री...
भाजीपाला सल्ला : वाल, भेंडी, गवारवाल : या पिकावर मावा, करपा व पानावरील ठिपके या...