agriculture news in marathi, The electricity connection of Zilla Parishad water scheme broke | Agrowon

जळगाव जिल्हा परिषद पाणी योजनांचे वीज कनेक्‍शन तोडले
टीम अॅग्रोवन
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने थकीत बिलाची रक्‍कम वाढली. जास्त थकबाकी असलेल्या योजनांचे कनेक्‍शन कापण्याची कारवाई ‘महावितरण''कडून करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या उच्चदाब सामूहिक पाणीपुरवठा योजनांवरील पाच कोटी २१ लाख ८४ हजार रुपयांच्या थकबाकीपोटी पाच योजनांवरील वीजपुरवठा खंडित केला आहे. बोदवड तालुक्‍यासाठी महत्त्वाची असलेल्या ८० गावे पाणीपुरवठा योजनेचे कनेक्‍शन चार कोटी २० लाख रुपये थकबाकीपोटी कापले आहेत. ऐन दुष्काळात वीज कनेक्‍शन महावितरण कापत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

जळगाव : पाणी योजनांचे बिल भरण्यात आले नसल्याने थकीत बिलाची रक्‍कम वाढली. जास्त थकबाकी असलेल्या योजनांचे कनेक्‍शन कापण्याची कारवाई ‘महावितरण''कडून करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या उच्चदाब सामूहिक पाणीपुरवठा योजनांवरील पाच कोटी २१ लाख ८४ हजार रुपयांच्या थकबाकीपोटी पाच योजनांवरील वीजपुरवठा खंडित केला आहे. बोदवड तालुक्‍यासाठी महत्त्वाची असलेल्या ८० गावे पाणीपुरवठा योजनेचे कनेक्‍शन चार कोटी २० लाख रुपये थकबाकीपोटी कापले आहेत. ऐन दुष्काळात वीज कनेक्‍शन महावितरण कापत असल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

पाणी योजनांसाठी वीज वापरल्यानंतरही ग्रामपंचायतींकडून थकबाकी भरणा केला जात नाही. यामुळे दिवसेंदिवस वाढत जात जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडील थकबाकी १६९ कोटी ९१ लाखांवर पोचली आहे. जळगावमधील शेळगाव बॅरेज, जामनेर तालुक्‍यांतील तोंडापूर, चाळीसगाव तालुक्‍यांतील कळमडू एरंडोलातील अंतुर्ली, दहिगाव या योजनांचा वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.

 जिल्ह्यात एक हजार १५१ ग्रामपंचायती असून, यामध्ये पाणीपुरवठा योजनांसाठी दोन हजार २५० वीज कनेक्‍शन घेण्यात आले आहेत. गावांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांसाठी दिलेल्या विजेचे बिल ग्रामपंचायतींनी करवसुलीच्या रकमेतून भरावयाचे असते; परंतु ग्रामपंचायतींकडून वसुली होत नसल्याने बिल भरणादेखील करण्यात येत नसल्याने सर्व कनेक्‍शनचे मिळून जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे थकबाकी वाढली आहे.

जिल्ह्यातील पाणी योजनांवर गतवर्षी असलेली थकबाकी १४३ कोटी रुपयांवर होती. या वेळीही थकीत रक्‍कम वसुलीसाठी ''महावितरण''कडून मोहीम राबवत पाणी योजनांचे कनेक्‍शन कापण्यात आले होते. यानंतर जिल्हा परिषदेकडून पाण्याचे संकट टाळण्यासाठी काही थकबाकीची रक्‍कम भरली होती.

इतर ताज्या घडामोडी
लोकसभेच्या निकालावर ठरेल विधानसभेची...नगर ः लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघातून...
उष्णतावाढीमुळे यावर्षीही साताऱ्यात आले...सातारा  ः मागील तीन ते चार वर्षांपासून मे...
नांदेड जिल्ह्यात १२१ टॅंकरने पाणीपुरवठानांदेड  ः नांदेड जिल्ह्यातील पाणीटंचाईचे...
जलसंधारण कामांसाठी पुणे जिल्ह्याला ११...शेटफळगढे, जि. पुणे  : जिल्ह्यातील जलयुक्त...
पाणीप्रश्नी किनगाव ग्रामपंचायतीवर...रोहिलागड, जि. जालना  : किनगाव येथील महिलांनी...
अठराशेवर गावांमध्ये घेतल्या जाणार २६५२...औरंगाबाद   : येत्या खरीप हंगामात...
खानदेशात बाजरी मळणीचा हंगाम आटोपलाजळगाव  ः खानदेशात बाजरीचा मळणी हंगाम आटोपला...
धुळे, नंदुरबारमध्ये राष्ट्रीयीकृत...धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा बॅंकेने १२ हजारांवर...
कोल्हापुरात ‘पाणीबाणी’ची शक्यताकोल्हापूर : जिल्ह्यात वेळेवर पाऊस सुरू न झाल्यास...
आरग येथे नागिलीच्या पानांचे सौदे सुरूसांगली  ः कधीकाळी खाण्यासाठी वापरण्यात...
अकोला जिल्ह्यात २० टक्क्यांपर्यंत...अकोला :  आगामी खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यातील १२४ गावांचे पाणी दूषितनगर  : जिल्ह्यातील २६४५ गावांचे पाणीनमुने...
बुलडाणा जिल्हा कृषी विक्रेता संघटनेच्या...बुलडाणा ः जिल्हा कृषी विक्रेता संघटनेची १४...
निफाड तालुक्यात द्राक्षबागांच्या...नाशिक  : निफाड तालुक्यातील द्राक्षबागांमध्ये...
सोलापूर जिल्हा परिषद करणार ‘रोहयो’ची...सोलापूर ः जिल्हा परिषदेच्या वतीने यंदाच्या...
भूगर्भात पाणीसाठा टिकविण्यासाठी भूमिगत...भूमिगत बंधारा बांधण्याचे काम जमिनीखाली असल्याने...
सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांत टाकली...नागपूर ः दुष्काळी मदत नाही, कर्जमाफीच्या...
वडगाव येथील पाटबंधारे कार्यालयासमोर...वडगाव निंबाळकर, जि. पुणे  ः नीरा डावा...
पुणे बाजार समितीवर पुन्हा प्रशासकीय...पुणे : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पुणे बाजार...
अळिंबी उत्पादनातून केली संकटांवर मातलोणी (जि. जळगाव) येथील अनिल माळी यांच्याकडे कृषी...