agriculture news in Marathi, electricity continue again in rural areas after swabhimani Shetkari sanghatna agitation, Maharashtra | Agrowon

‘स्वाभिमानी’च्या आंदोलनामुळे गावांचा विद्युत पुरवठा सुरू
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 9 जानेवारी 2018

बुलडाणा ः देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या अांदोलनामुळे वीज कंपनीला खंडित पुरवठा सुरळीत करावा लागला. दहा ते बारा गावांची वीज पूर्ववत सुरू करण्यात अाली.

बुलडाणा ः देऊळगावराजा तालुक्यातील देऊळगाव मही येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या अांदोलनामुळे वीज कंपनीला खंडित पुरवठा सुरळीत करावा लागला. दहा ते बारा गावांची वीज पूर्ववत सुरू करण्यात अाली.

कुठलीही सूचना न देता वीज कंपनीने देऊळगाव मही परिसरातील गावांचा वीजपुरवठा अचानक बंद केला. यामुळे शेतकरी त्रस्त झाले. शेतकऱ्यांनी या संदर्भात स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांच्याकडे तक्रार केली. याची दखल घेत तुपकर यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी वीज कंपनीचे विभागीय अभियंता श्री. कायंदे यांना घेराव टाकला. वीज कंपनीच्या कार्यालयाचा शेतकऱ्यांनी ताबा घेतला. बराच काळ ठिय्या आंदोलन केल्यानंतर तुपकर यांनी कार्यालय पेटवण्याचा इशारा दिला.

त्यानंतर अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा केली. खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात अाला. या आंदोलनात स्वाभिमानी संघटनेचे मराठवाडा कार्याध्यक्ष गजानन बंगाळे, बबनराव चेके, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे ,वाशीमचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले, जितेंद्र खंडारे, शेख जुल्फेकार, विष्णू देशमुख, कुंडलिक शिंगणे, गजानन मुंढे, मधुकर शिंगणे, मधुकर वाघ, पंढरीनाथ म्हस्के यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
 

इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांसाठी संसदेचे विशेष अधिवेशन...कोल्हापूर  : शेतीमालाला दीडपट हमीभाव आणि...
सांगलीत मजूर टंचाईचा गुऱ्हाळघरांना फटकासांगली  ः शिराळा तालुक्‍यात गुळाची निर्मिती...
औरंगाबाद जिल्ह्यात ३०० टॅंकरद्वारे... औरंगाबाद  : जिल्ह्यातील २४५ गावे व २९...
नगर जिल्ह्यात ४८१ शेतकरी मित्रांची निवड नगर  ः कृषी विभागाच्या विविध योजना...
धुळे, जळगावमध्ये मक्‍याचा कडबा २००... जळगाव  ः दूध उत्पादकांना अपेक्षित दर मिळत...
सातारा जिल्ह्यात पाच टॅंकरव्दारे...सातारा  : जिल्ह्यातील माण, खटाव भागात...
साताऱ्यातील दहा कारखान्यांचा गाळप हंगाम... सातारा  : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम अंतिम...
साखर कारखानदारांच्या मागण्या निरर्थक :...कोल्हापूर : देशात अतिरिक्त साखरेचा प्रश्‍न गंभीर...
जालन्यातील रेशीमकोष बाजारपेठेचे आज उद्‌...औरंगाबाद : जालना बाजार समितीच्या आवारात शनिवारी (...
तंत्र हळद लागवडीचे...आंगठे आणि हळकुंड बियाण्यापेक्षा जेठे गड्डे...
ग्रामीण भागात समिश्र चलन तुटवडा अकोला  : गेल्या काही दिवसांपासून चलन तुटवडा...
जमीन सुपीकतेसाठी प्रो-साॅईल प्रकल्पपरभणी  ः नाबार्ड आणि जर्मनीतील जीआयझेड या...
नाशिकमधील ड्रायपोर्टचा मार्ग मोकळानाशिक  : नाशिक जिल्हा बँकेकडे तारण असलेली...
मोहफुलावरील बंदी उठलीनागपूर (सकाळ वृत्तसेवा) : आदिवासींसाठी मोहफुलाचे...
संत्रा पिकाचे ४० टक्‍के नुकसान जलालखेडा, जि. नागपूर : जगप्रसिद्ध असलेल्या...
पावसाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणारमुंबई : येत्या ४ जुलैपासून सुरू होणारे...
पुणे जिल्ह्यात भाताचे क्षेत्र वाढण्याचा... पुणे: जिल्ह्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाची...
साताऱ्यातील दोन हजार सत्तावीस... सातारा : कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात...
साखर जप्त करता येणार नाही ः मुश्रीफ कोल्हापूर  : एफआरपीची थकीत रक्कम ऊस...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची ३७१ कामे पूर्ण नगर : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानातून मागील...