agriculture news in marathi, electricity precautionary measures | Agrowon

पावसाळ्यात वीजयंत्रणा, उपकरणांपासून सावधान
विज महावितरण
गुरुवार, 28 जून 2018

पाण्यामुळे ओली झालेली कोणतीही वस्तू ही वीजवाहक आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी असलेली वीजयंत्रणा किंवा घरगुती उपकरणे तसेच शेतीपंप, स्वीचबोर्ड, पत्र्याची घरे, जनावरांचे गोठे आदींपासून वीजअपघात टाळण्यासाठी सदैव सावध राहावे.

पाण्यामुळे ओली झालेली कोणतीही वस्तू ही वीजवाहक आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी असलेली वीजयंत्रणा किंवा घरगुती उपकरणे तसेच शेतीपंप, स्वीचबोर्ड, पत्र्याची घरे, जनावरांचे गोठे आदींपासून वीजअपघात टाळण्यासाठी सदैव सावध राहावे.

 • पावसाला सुरवात झाली आहे; परंतु जाणते अजाणतेमुळे प्राणांतिक वीज अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात वीजयंत्रणेच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक वस्तूंपासून सावध राहावे. 
 • पावसाचे प्रमाण वाढल्याने विहिरीतून किंवा नदीपात्रातून शेतीपंप बाहेर काढणे, स्वीचबोर्ड व वायर्स हाताळणे, घराबाहेरील पत्र्याच्या शेडमध्ये साध्या वायर्समधून वीजपुरवठा घेणे; तसेच मुसळधार पावसामुळे तुटलेल्या वीजतारा, खाली पडलेले वीजखांब आदींना हटविण्याचा प्रयत्न करणे, ओल्या लाकडी काठ्या किंवा लोखंडी वस्तूंच्या साह्याने वीजयंत्रणेच्या संपर्कात येणे अशा अनेक प्रकारांमुळे वीजअपघातांचा धोका वाढतो.
 • पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची संपूर्णपणे खबरदारी घ्यावी.
 • घरातील विशेषतः पत्र्याच्या शेडमध्ये आणि जनावरांच्या गोठ्यामध्ये असलेल्या वीजयंत्रणेचे आवश्यक अर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी. 
 • घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेन स्वीच तत्काळ बंद करावा. घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ँटेना वीजतारांपासून दूर ठेवावा. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारे सर्व उपकरणे स्वीचबोर्डापासून बंद करावीत.
 • टिनपत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात दक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. 
 • विजेच्या खाबांना जनावरे बांधू नयेत. खांबास दुचाकी टेकवून ठेऊ नयेत. विद्युत खाबांना लोखंडी तार बांधून कपडे वाळत घालू नयेत. 
 • सार्वजनिक वीजयंत्रणेपासून दूर राहावे.अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पिलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. 
 • मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने झाडाच्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. मोठी झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये. 
 • ग्रामीण भागात शेतात किंवा रस्त्याने जाताना विशेषतः पहाटे किंवा सायंकाळी चांगल्या दर्जाच्या टॉर्चचा वापर करावा. शेतामधून किंवा रस्त्यामध्ये तुटून खाली पडलेल्या विजेची तार कुठल्याही परिस्थितीत हटविण्याचा किंवा तारेजवळ जाण्याचा प्रयत्न करू नये. 
 • वीजयंत्रणेपासून धोका निर्माण झाल्याची शक्यता वाटल्यास किंवा शंका आल्यास नागरिकांनी ताबडतोब महावितरणच्या नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

 

इतर बातम्या
कौशल्य विकास कार्यक्रमातून मिळतोय एकीचा...राज्यात गेल्या दीड दशकामध्ये गटशेतीचे मूळ...
कौशल्य विकासातून गटशेतीसाठी शेतकरी...मुंबई ः शेतीतून उत्पन्न वाढवायचे असेल तर...
खानदेशातील पपई पीक अंतिम टप्प्यातनंदुरबार : पपई दरांमध्ये दर आठवड्याला...
खानापूर घाटमाथ्यावरील तेरा हजार लोकांना...विटा, जि. सांगली : खानापूर घाटमाथ्यावर पिण्याच्या...
जालन्यात कृषिमाल निर्यात केंद्र सुरू जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पोषणमूल्यावर आधारित कृषी प्रकल्पास...पुणे : राज्यातील कृषी विज्ञान केंद्रांच्या मदतीने...
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रॅक्‍टर, पॉवर...कोल्हापूर/गडहिंग्लज : वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर...
वाशीम जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतींचे २४...वाशीम : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील चार...
राष्ट्राला समृद्ध बनवण्याची ताकद...सोलापूर : जागतिक पातळीवर सहकार चळवळीचे महत्त्व...
हमीभाव न देणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने...सोलापूर : हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी...
खानदेशात कापूस लागवड वाढण्याचा अंदाजजळगाव : खानदेशात आगामी खरिपात कापूस लागवड किंचित...
अाॅनलाइन नोंदणी न झाल्यास शेतकरीच...अकोला ः शासनाच्या आधारभूत किमतीने तूर खरेदीसाठी...
संपूर्ण शेतीमाल नियमनमुक्त करावापुणे ः राज्य सरकारने संपूर्ण शेतीमाल...
विद्यापीठांपेक्षा शेतकरी संशोधनात...सांगली : सध्या विद्यापीठाच्या तंत्रज्ञानापेक्षा...
कोरडवाहू फळ संशोधन कार्याला गती...परभणी: पोषण मूल्यांच्या सुरक्षिततेसाठी...
राज्यातील सत्तावीस कृषी महाविद्यालयांचे...पुणे : भारतीय कृषी संशोधन परिषदेची आदर्श...
दुष्काळग्रस्त १५१ तालुक्यांसाठी दोन...मुंबई : राज्यातील खरीप हंगाम २०१८ मध्ये...
विदर्भात उद्यापर्यंत पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या कमाल तापमानात सातत्याने वाढ होत...
परागकणांचा मागोवा घेण्याची कार्यक्षम...दक्षिण आफ्रिकेतील स्टेल्लेनबाऊच विद्यापीठातील...
अकोट, पातूर तालुक्यांत दुष्काळ जाहीरअकोला : कमी पावसामुळे या हंगामात अकोट, पातूर...