agriculture news in marathi, electricity production in ntpc,solapur, maharashtra | Agrowon

सोलापुरातील ‘एनटीपीसी’मधून ४५० मेगावॉट वीजनिर्मिती
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 1 मार्च 2018

सोलापूर ः दक्षिण सोलापुरातील राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून (एनटीपीसी) गेल्या सहा महिन्यांत सुमारे ४५० मेगावॉट वीजनिर्मिती झाली असून, त्याची विक्रीही सुरू झाली आहे.

प्रकल्पाच्या कामाला आता गती येत आहे. आतापर्यंत या प्रकल्पात ६६० मेगावॉटच्या दोन युनिटची उभारणी झाली आहे. त्यापैकी एका युनिटमधून ४५० मेगावॉट वीजनिर्मिती झाली आहे. आता दुसऱ्या प्रकल्पातूनही लवकरच वीजनिर्मिती सुरू होईल. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा या राज्यांना यातून वीजपुरवठा होणार आहे. 

सोलापूर ः दक्षिण सोलापुरातील राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा प्रकल्पातून (एनटीपीसी) गेल्या सहा महिन्यांत सुमारे ४५० मेगावॉट वीजनिर्मिती झाली असून, त्याची विक्रीही सुरू झाली आहे.

प्रकल्पाच्या कामाला आता गती येत आहे. आतापर्यंत या प्रकल्पात ६६० मेगावॉटच्या दोन युनिटची उभारणी झाली आहे. त्यापैकी एका युनिटमधून ४५० मेगावॉट वीजनिर्मिती झाली आहे. आता दुसऱ्या प्रकल्पातूनही लवकरच वीजनिर्मिती सुरू होईल. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा या राज्यांना यातून वीजपुरवठा होणार आहे. 

खासदार शरद बनसोडे यांनी या प्रकल्पाला नुकतीच भेट देऊन पाहणी केली. त्या वेळी एनटीपीसीचे मुख्य व्यवस्थापक नवकुमार सिन्हा यांनी ही माहिती दिली. आहेरवाडी येथे उभारलेल्या या प्रकल्पासाठी ९९९५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी ८२९२ कोटी रुपये खर्च झाले आहेत.
 
या प्रकल्पामुळे वातावरणातील तापमान वाढणार नसून, पुरेशी वृक्षलागवड केली आहे. त्याशिवाय या प्रकल्पाच्या प्रदूषणाच्या अनुषंगाने योग्य ती तांत्रिक काळजी घेतली आहे. त्यामुळे उलट तापमान दोन अंशाने घटेल, असा दावाही श्री. सिन्हा यांनी केला.
 
एनटीपीसीसाठी आतापर्यंत १९९ रेल्वे रॅक कोळशाची आवक झाली आहे. ७ लाख ७१ हजार २८ टन कोळसा आला. त्यापैकी ३६ हजार ७२५ टन कोळसा शिल्लक आहे. रोज चार रेल्वेने हजार टन कोळशाची गरज आहे, असेही ते म्हणाले.  

तत्कालीन केंद्रीय ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रयत्न करून एनटीपीसी प्रकल्प मंजूर केला. त्याचे काम सुरू झाले; पण भाजप सरकारच्या काळात निधीची तरतूद करून एनटीपीसीचे काम अंतिम टप्प्यात आले.

आता या प्रकल्पाची पूर्ण उभारणी आता झाली आहे. शिवाय वीजनिर्मितीही सुरू झाली आहे. लवकरच या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
भाजीपाला पिकांची रोपवाटिका तयार करतानाभाजीपाला पिकांची रोपवाटिका करताना योग्य ती काळजी...
परभणीत फ्लाॅवर प्रतिक्विंटल २००० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे भाजीपाला...
पुण्यात फुलांची ७ काेटींची उलाढालपुणे ः फूल उत्पादक शेतकऱ्यांची भिस्त असणाऱ्या...
योग्य प्रमाणातच वापरा युरियानत्र पानांच्या पेशीमध्ये हरित लवकाची निर्मिती...
वनस्पतीतील संजीवकांमुळे अवकाशातही...पोषक घटकांची कमतरता आणि गुरुत्वाकर्षण कमी असणे या...
राज्यातील काही भागात अंशतः ढगाळ वातावरणमहाराष्ट्राच्या पश्‍चिम किनारपट्टीवर म्हणजेच कोकण...
सांगली जिल्हा बॅंकेला कर्जमाफीसाठी...सांगली ः राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज...
गूळ, बेदाणा, काजू महोत्सवास पुणे येथे...पुणे : दिवाळीच्या निमित्ताने ग्राहकांना रास्त...
'सरकारला दुष्काळाची दाहकता लक्षात येईना'पुणे  : यंदा ऑक्टोबर महिन्यातच धरणांमधील...
कर्नाटकात दुष्काळ जाहीर, मग...मुंबई  : ग्रामीण महाराष्ट्र दुष्काळात...
ऊसतोड मजूर महामंडळाला शंभर कोटींचा निधी...बीड   : याआधीच्या सरकारने दहा वर्षांत अडीच...
हिवरेबाजारमध्ये मांडला पाण्याचा ताळेबंदनगर  ः आदर्श गाव हिवरेबाजारमध्ये...
माण, खटाव तालुक्यांत पाणीटंचाई वाढलीसातारा   ः रब्बी हंगामाच्या तोंडावर पाऊस...
पुणे जिल्ह्यात खरिपात ६९ टक्के पीक...पुणे ः यंदा पाऊस वेळेवर न झाल्याने शेतकऱ्यांकडून...
बुलडाणा जिल्ह्यात १ लाख ६५ हजार...बुलडाणा  ः या रब्बी हंगामात जिल्ह्यात एक लाख...
यवतमाळ जिल्ह्यात जिल्हा प्रशासन उभारणार...यवतमाळ  ः शेतीला पूरक व्यवसायाची जोड देत...
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...