agriculture news in marathi, Electricity supply to 18000 farmers through high speed distribution system | Agrowon

उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे १८ हजार कृषिपंपांना वीजपुरवठा
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडलात ३१ मार्च २०१८ पर्यंत कोटेशन भरून प्रलंबित असणाऱ्या १८ हजार ५२४ शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी लवकरच ‘एचव्हीडीएस’ योजनेद्वारे वीज जोडणी मिळणार आहे. यासाठी महावितरणने जाहीर केलेल्या उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतील (एचव्हीडीएस) कामांची ऑनलाइन निविदा प्रक्रीया पूर्ण झाली असून सुमारे ३१९ कोटी ८१ लाख रुपयांच्या कामांचे कार्यादेश कंत्रांटदारांना सुपूर्द करण्यात अाल्याची माहिती मिळाली अाहे.

अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडलात ३१ मार्च २०१८ पर्यंत कोटेशन भरून प्रलंबित असणाऱ्या १८ हजार ५२४ शेतकऱ्यांना कृषिपंपासाठी लवकरच ‘एचव्हीडीएस’ योजनेद्वारे वीज जोडणी मिळणार आहे. यासाठी महावितरणने जाहीर केलेल्या उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतील (एचव्हीडीएस) कामांची ऑनलाइन निविदा प्रक्रीया पूर्ण झाली असून सुमारे ३१९ कोटी ८१ लाख रुपयांच्या कामांचे कार्यादेश कंत्रांटदारांना सुपूर्द करण्यात अाल्याची माहिती मिळाली अाहे. यामुळे अकोला परिमंडलातील अकोला, बुलडाणा व वाशीम जिल्ह्यांतील १८  हजार ५२४  कृषिपंपांना उच्चदाब वितरण प्रणालीच्या माध्यमातून वीज जोडणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

योजनेअंतर्गत यापुढे एका वितरण रोहित्रावर जास्तीत जास्त दोन ते तीन कृषिपंप राहणार आहेत. सततच्या विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या कटकटीपासून यामुळे शेतकऱ्यांची कायमची सुटका होणार आहे.

अकोला परिमंडलात ३१ मार्च २०१८ पर्यंत कोटेशन भरून प्रलंबित असणाऱ्या १८ हजार ५२४ जोडण्यांचाही समावेश करण्यात आला होता. याशिवाय शेतकऱ्यांसह नव्याने मागणी करणाऱ्या ग्राहकाला या योजनेतून जोडणी मिळेल. सध्या ६३ व १०० केव्हीए क्षमतेच्या एका रोहित्रावरून साधारणतः २० ते २५  कृषिपंपांसाठी विद्युत पुरवठा केला जातो. अनधिकृत वापरामुळे विजेचा दाब वाढून रोहीत्र जळण्याचे प्रमाण अधिक आहे. प्रचलित पद्धतीमुळे लघुदाब वाहिनीची लांबी वाढते, वीज हानी मोठ्या प्रमाणात होते. शिवाय कृषिपंपांना कमी दाबाने वीजपुरवठा होतो. वीजपुरवठ्यात वारंवार बिघाड होतो. यावर ‘एचव्हीडीएस’ योजनेद्वारे या सर्वांवर मात करता येणे शक्य होणार असल्याचा दावा केला जात अाहे.

या नव्या योजनेमध्ये कृषिपंपांचे ऊर्जीकरण करण्याचे उद्दीष्ट निर्धारित करण्यात आले असून यातील कामे जलदगतीने पूर्ण व्हावीत यासाठी अकोला परिमंडळाचे मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांच्या निर्देशानुसार उपविभागनिहाय कामांची आखणी करण्यात येऊन त्यानुसारच गतीने ऑनलाइन निविदा प्रक्रीया राबविण्यात आली. कामांचे कार्यादेश कंत्रांटदारांना सुपूर्द करण्यात आले आहेत.

इतर ताज्या घडामोडी
'टीम देवेंद्र'चा विस्तार; विखे पाटील,...मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आली...
ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा पाचपुतेंच्या...श्रीगोंदे : काष्टी येथील माजी मंत्री बबनराव...
खरेदीदारांच्या इच्छेवर पॅकेजिंगचा पडतो...एखादा खाद्यपदार्थ लोकांना आकर्षित ...
नगरमध्ये छावणीचालकांसाठी आणखी ६ कोटींचा...नगर : पशुधन जगविण्यासाठी छावणीचालकांचे अर्थचक्र...
सांगली जिल्ह्यात खरीप पेरा रखडलासांगली : जिल्ह्यात वळीव पावसाने दडी मारली,...
केंद्र आणि राज्याच्या मंत्र्यांना कांदे...नाशिक  : अगोदरच मागील कांदा विक्रीचे अनुदान...
सहलींच्या बचत निधीतून होणार आंबा फवारणी...रत्नागिरी : ग्रास कटर, आंबा फवारणी मशिनला...
मराठवाड्यात चार दिवसांत लाखभर लोक...औरंगाबाद : लांबलेला पाऊस, भूपृष्ठावरील जलसाठ्यांत...
पणन सुधारणा विधेयक पावसाळी अधिवेशनात...पुणे  ः शेतीमाल पणन सुधारणांमधील...
पुणे बाजार समिती पुनर्विकासाला गतीपुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
कारखान्यांना ‘सहवीज’मधून १०४१ कोटींचे...पुणे  : राज्यातील साखर कारखान्यांनी सहवीज...
खानदेशात उष्णतेचा कहर; पावसाची...जळगाव  ः खानदेशात वादळी पाऊस वगळता कुठेही...
शकूबाईंच्या लढ्याला आले यश;  वनजमीन...वणी, जि. नाशिक  : शेतकरी व आदिवासींच्या...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत चारा...औरंगाबाद  ः दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर...
उन्नत शेती अभियानात १५ दिवसांत १९ लाख...मुंबई : राज्यात उन्नत शेती - समृद्ध शेतकरी...
पाणी जिरविण्यासाठी नदीपात्र नांगरण्याचा...अमरावती  ः भूगर्भात पाणी मुरून पातळी वाढावी...
काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी...मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने...
राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार मुंबई : होणार होणार म्हणून गेले काही...
मोठ्या गटांसाठी व्यवस्थापन समितीची...शेती शाश्वत व किफायतशीर होण्यासाठी एकट्याने...
पीकविमा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत...मुंबई : राज्यातील अनेक शेतकऱ्यांना...