agriculture news in marathi, Electricity supply of 68 thousand agricultural electricity connection is broken in Nanded region | Agrowon

नांदेडला ६८ हजार कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित
टीम अॅग्रोवन
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

नांदेड : महावितरणच्या नांदेड परिमंडलातील नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत दोन चालू त्रैमासिक वीज देयकांचा भरणा न केल्यामुळे रविवार (ता. २९) पर्यंत ६८ हजार १५५ कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत १,२ ६४ कृषिपंपधारकांकडून ९४ लाख रुपये थकीत वीज देयकांची वसुली करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नांदेड : महावितरणच्या नांदेड परिमंडलातील नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांत दोन चालू त्रैमासिक वीज देयकांचा भरणा न केल्यामुळे रविवार (ता. २९) पर्यंत ६८ हजार १५५ कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत १,२ ६४ कृषिपंपधारकांकडून ९४ लाख रुपये थकीत वीज देयकांची वसुली करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नांदेड परिमंडलाअंतर्गतच्या नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांत मंगळवार (ता. २४) पासून चालू वीज देयकांची (दोन त्रैमासिक देयके) वसुली मोहीम तसेच देयक भरणा न करणाऱ्या कृषिपंपधारकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. या तीन जिल्ह्यांतील एकूण २ लाख ८६ हजार ८०१ कृषिपंपधारकांकडे जून २०१७ अखेर वीज देयकांची २ हजार १६२ कोटी ९९ लाख रुपये थकबाकी आहे.

महावितरणला वीज देयकांच्या थकबाकीमुळे आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. त्याअनुषंगाने कृषिपंपधारकांकडील वीज देयक थकबाकी वसुली मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत एप्रिल २०१७ ते सप्टेंबर २०१७ अखेर आकारण्यात आलेले चालू देयक (दोन त्रैमासिक देयकं) न भरल्यास त्यांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे.

वीजपुरवठा खंडित करू नये म्हणून १,२६४ कृषिपंपधारकांनी ९४ लाख रुपये भरणा केला आहे. वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई टाळण्यासाठी कृषिपंपधारकांनी देयकांचा भरणा करावा असे आवाहन महवितरणतर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
शेळी-मेंढीपालनासाठी विविध योजनादुष्काळी भागांमध्ये शेळी-मेंढी पालन हा एक उत्तम...
`शेतकऱ्यांची थट्टा कशाला करता?`पुणे  : डॉ. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी...
सातारा जिल्ह्यात उन्हाळी भुईमुगाची... सातारा  ः जिल्ह्यात उन्हाळी हंगामातील...
मराठवाड्यातील प्रकल्पांमध्ये ३२ टक्के... औरंगाबाद  : मराठवाड्यातील पाणीसाठा...
तीन जिल्ह्यांत यंदा उन्हाळी पिकांचे... औरंगाबाद : यंदा मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना व...
सांगली जिल्ह्यातून १० हजार ६०० टन... सांगली ः दर्जेदार द्राक्षांच्या उत्पादनासाठी...
राज्यातील साडेसात हजारांपेक्षा अधिक...मुंबई : राज्यातील सात हजार ६५८ अंगणवाड्यांना...
जलयुक्तची कामे करा; अन्यथा नोकरी सोडासांगली  ः जिल्ह्यातील पाणीटंचाई...
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तुम्ही कधीही...अकोला : सध्या शेतकरी, तरुण हे सर्वच त्रस्त...
राळेगणसिद्धीत गावकऱ्यांचा ‘रास्ता रोको’नगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी...
नगर जिल्ह्यात ‘जलयुक्त’ची सव्वाआठ हजार... नगर : जलयुक्त शिवार अभियानातून गेल्या वर्षभरात...
नाशिक विभागात शेततळी योजनेच्या... नाशिक  : कृषी विभागाच्या संथ कारभारामुळे...
हवामान बदलावर संवर्धित शेती हेच उत्तगेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्रामध्येही...
कृषी सल्लाधान्य साठवण : मळणीनंतर धान्याची साठवण...
बोंडअळीग्रस्त, धान उत्पादकांना संयुक्त...मुंबई : राज्यात गुलाबी बोंडअळी आणि धान...
लाळ्या खुरकूत लस पुरवठा विलंबाच्‍या...पुणे  ः लाळ्या खुरकूत लसींच्या पुरवठ्याच्या...
कोरडे, उष्ण हवामान राहून तापमानाची...महाराष्ट्रासह दक्षिण, मध्य, उत्तर व ईशान्य...
नेदरलॅंडमध्ये साठवण, निर्यातीसाठी खास...वातावरणातील बदल लक्षात घेता कांदा पिकांच्या नव्या...
राळेगणसिद्धीत अण्णा हजारे यांच्या...नगर : शेतमालाला दर मिळण्यासह अन्य...
हमीभाव खरेदी केंद्रांवर हमालीच्या...अकोला : अाधारभूत किमतीने सुरू असलेल्या तूर...