agriculture news in marathi, Electricity supply of farmer Do not break says Dr. Bhamre | Agrowon

एकाही शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित करू नका ः डॉ. भामरे
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

सटाणा, जि. नाशिक : वीजबिल वसुलीच्या नावाने कुठलीही पूर्वकल्पना न देता थेट वीजपुरवठा खंडित करणे चुकीचे अाहे. याबाबत सोमवारी (ता. ३०) राज्याचे मुख्यमंत्री व वीजमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. मात्र तोपर्यंत एकाही शेतीपंपाची वीज खंडित करू नये, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.

शासनाविरोधात भावना निर्माण करणारी ही कार्यपद्धती चुकीची असून, एरवी वसुलीबाबत काहीही न करता थेट पुरवठा खंडित करणाऱ्यांनी ही लोकशाही असल्याचे भान राखावे, असेही डॉ. भामरे यांनी या वेळी सुनावले.

सटाणा, जि. नाशिक : वीजबिल वसुलीच्या नावाने कुठलीही पूर्वकल्पना न देता थेट वीजपुरवठा खंडित करणे चुकीचे अाहे. याबाबत सोमवारी (ता. ३०) राज्याचे मुख्यमंत्री व वीजमंत्र्यांशी चर्चा करण्यात येईल. मात्र तोपर्यंत एकाही शेतीपंपाची वीज खंडित करू नये, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिले.

शासनाविरोधात भावना निर्माण करणारी ही कार्यपद्धती चुकीची असून, एरवी वसुलीबाबत काहीही न करता थेट पुरवठा खंडित करणाऱ्यांनी ही लोकशाही असल्याचे भान राखावे, असेही डॉ. भामरे यांनी या वेळी सुनावले.

नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सटाणा तालुक्यातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा डॉ. भामरे यांच्या हस्ते रविवारी (ता. ३०) सत्कार करण्यात आला. त्यानंतर वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत डॉ. भामरे यांनी चर्चा केली.

सटाणा तालुक्यातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सिंचनाच्या कामांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून भरीव निधी आणून पिण्याच्या पाण्यासोबतच शेती सिंचनाची कामे मार्गी लागण्यात यश मिळाले आहे. त्यामुळेच ग्रामीण जनतेनेही शासनाच्या कार्याची पावती म्हणून थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपाला जोरदार समर्थन दिले आहे, असे उद‍्गार डॉ. भामरे यांनी काढले.

या वेळी भाजप नेते अण्णा सावंत, डॉ. शेषराव पाटील, बाजार समितीचे मुख्य प्रशासक रमेश देवरे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, साहेबराव सोनवणे, रत्नाकर पवार, पंचायत समिती सभापती विमल सोनवणे, उपसभापती शीतल कोर, उपनगराध्यक्षा पुष्पा सूर्यवंशी, गटनेता महेश देवरे, आरोग्य सभापती दीपक पाकळे, नीलेश पाकळे आदी उपस्थित होते.

 

इतर बातम्या
खानदेशात दूध आंदोलनास अल्प प्रतिसादजळगाव ः खानदेशात कुठेही दूध आंदोलनाला उग्र स्वरुप...
संत गजानन महाराज पालखीचे सोलापुरात...सोलापूर : पावसाच्या संततधार सरी झेलत ‘गण गण गणात...
रस्त्यावर दूध ओतून शासनाचा निषेधसांगली ः दूध दरवाढीच्या स्वाभिमानी शेतकरी...
नांदेड जिल्ह्यात दूध दरासाठी...नांदेड ः जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या...
दूध दरप्रश्नी तारसा फाटा येथे आंदोलननागपूर  ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
पुणे जिल्ह्यात दूध दरप्रश्नी आंदोलनपुणे  ः  दूध दरप्रश्‍नी स्वाभिमानी...
दूध दरप्रश्‍नी वऱ्हाडात आंदोलनअकोला   ः दूध उत्पादकांना प्रतिलिटर पाच...
मराठवाड्यात विविध ठिकाणी दूध संकलन बंदऔरंगाबाद : दूध दरावरून पुकारल्या आंदोलनाच्या...
नगर जिल्ह्यात दूध संकलन बंदनगर  : दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी...
केनियात आढळल्या पिवळ्या वटवाघळांच्या...केनियामध्ये पिवळ्या रंगाच्या वटवाघळांच्या जनुकीय...
सातारा जिल्ह्यात दूध दर आंदोलनास मोठा...सातारा   ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला...
झाडांच्या संवर्धनामध्ये हवामान बदलासोबत...तापमानवाढीमुळे अधिक उंचीकडे किंवा उत्तरेकडे...
नागपूर, गडचिरोलीत संततधारनागपूर  : हवामान विभागाने विदर्भात सोमवारी (...
मराठवाड्यातील २४५ मंडळांत पावसाची रिपरिपऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी जवळपास...
पुणे जिल्ह्यात दमदार पाऊसपुणे   : जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली...
अकोले तालुक्यात पावसाचा जोर कायमनगर   ः अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील २६...नांदेडः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २६...
सातारा जिल्ह्यातील पश्‍चिम भागात दमदार...सातारा : जिल्ह्याच्या पश्‍चिमेकडील महाबळेश्वर,...
कोल्हापुरात पंधरा लाख लिटर दुधाचे संकलन...कोल्हापूर ः गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये...
बीड जिल्ह्यात दुधाचे संकलन ठप्पबीड : दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...