agriculture news in marathi, electricity supply problem in jat taluka, sangli, maharashtra | Agrowon

जतमधील शेतीपंपांना अवघा चार तासच वीजपुरवठा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 16 जानेवारी 2018

महावितरणने नियमाप्रमाणे कृषिपंपाना आठ तास वीजपुरवठा केला पाहिजे. मात्र, गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून आम्हाला केवळ चार तासच वीजपुरवठा होतोय. महावितरणने आठ तास वीजपुरवठा करावा. तरच शेतातील पिकांना वेळेत पाणी देता येईल.
- राजेंद्र शिंदे, उमदी, ता. जत.

सांगली  ः जत तालुक्‍यात परतीचा पाऊस समाधानकारक झाला. यामुळे विहिरी व कूपनिलकांसह लघू व मध्यम तलावांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र, शेतीपंपासाठी लागणाऱ्या विजेचा अवघा चार तासच पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. महावितरण कंपनीने शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा केला नाही, तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

जत तालुक्‍यात गेल्या दोन वर्षांपासून अपेक्षित पाऊस नव्हता. त्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. परिणामी रब्बी हंगामातील पिके वाया गेली होती. मात्र, यंदा तालुक्‍यात परतीचा पाऊस समाधानकारक झाला. या पावसामुळे भूजलपातळीत वाढ झाली आहे.

जत तालुक्‍यात २७ लघू व मध्यम प्रकल्पांत २१५३.९४ दशलक्ष घनफूट म्हणजे ७० टक्के पाणीसाठा आहे. पाणी असल्याने रब्बी हंगामासह द्राक्ष, डाळिंब पिकांना पुरेसे पाणी उपलब्ध आहे. शेतीला पाणी मुबलक आहे, पण महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे कृषिपंपाना केवळ चार तासच वीजपुरवठा होतो आहे.

यामुळे पाणी असून शेतीला वेळेत पाणी देता येत नाही. याचा फटका रब्बी हंगामातील पिकांसह द्राक्ष, डाळिंब पिकांना बसू लागला आहे. कृषी पंपाच्या विजेचे बिल घेण्यासाठी महावितरण कंपनी शेतकऱ्यांना धारेवर धरत आहे. आम्हाला पुरेशी विजच मिळत नाही, मग आम्ही बिल का भरायचे असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करत आहेत. अगोदर आम्हाला १२ तास वीज द्या मग आम्ही वीजबिल भरायचे की नाही याचा विचार करू, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे.
 

इतर ताज्या घडामोडी
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल ४२०० ते ५४००...अकोला ः स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत...
प्रतिष्ठेच्या माढ्यात मतदानासाठी चुरस सोलापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या व...
सांगली काही ठिकणी ‘ईव्हीएम’च्या...सांगली ः जिल्ह्यात लोकसभेसाठी झालेल्या मतदानावेळी...
कोल्हापूर, हातकणंगले मतदारसंघात चुरशीने...कोल्हापूर : लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले...
मोदी यांच्या सभेसाठी कांदा लिलाव बंदनाशिक : नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील...
परभणी ः दूध संकलनात सात लाख ८९ हजार...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गंत परभणी दुग्धशाळेत...
राज्यात तिसऱ्या टप्प्यात शांततेत मतदानमुंबई :  लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या...
लोकांचा कौल आघाडीलाच; पण ईव्हीएम...मुंबई : मी अनेक मतदारसंघांमध्ये फिरलो....
शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी वीस उमेदवार...नगर   : नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी...
सोलापूर जिल्ह्यातील ६६२...सोलापूर  : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू...
पुण्यात पाच वाजेपर्यंत ५३ टक्के मतदानपुणे  ः पुणे लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता....
बारामतीत शांततेत मतदानपुणे  : बारामती लोकसभा मतदारसंघासाठी...
पुणे जिल्ह्यातील १४ कारखान्यांचा गाळप...पुणे  ः जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा...
बुलडाण्यात खरिपात सात लाख ३८ हजार...बुलडाणा  ः येत्या खरीप हंगामात जिल्हयात...
तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव...
नगर लोकसभा मतदारसंघात उत्साहात मतदाननगर ः नगर लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. २३)...
उपयोगानुसार वनशेतीसाठी वृक्षांची निवडवनशेतीसाठी मुख्यतः कोरडवाहू अथवा पडीक जमिनीची...
आंतरमशागतीसाठी अवजारेमकृवि चाकाचे हात कोळपे ः या अवजाराने आपण खुरपणी,...
एकलहरे वीज केंद्रात उभारली रोपवाटिकानाशिक : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी...
जळगाव : निवडणुकीमुळे टॅँकरचे प्रस्ताव...जळगाव : खानदेशात दिवसागणिक पिण्याच्या...