Agriculture news in Marathi, Electricity of Takaari, Mhaysal, Tembhu schemes electricity bill exhausted | Agrowon

ताकारी, म्हैसाळ, टेंभू योजनांचे वीजबिल थकले
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 13 जून 2019

सांगली ः म्हैसाळ, ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजनांचे ४२ कोटी ५१ लाखांचे वीजबिल थकले आहे. यामध्ये एप्रिलच्या दहा कोटी ६० लाखांच्या वीजबिलाचा समावेश असल्यामुळे ते भरण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगली पाटबंधारे विभागाकडे नोटीस बजावली आहे. पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे टंचाई निधीतून पैशाची मागणी केली आहे. पण, त्यांच्याकडून प्रतिसाद नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.

सांगली ः म्हैसाळ, ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजनांचे ४२ कोटी ५१ लाखांचे वीजबिल थकले आहे. यामध्ये एप्रिलच्या दहा कोटी ६० लाखांच्या वीजबिलाचा समावेश असल्यामुळे ते भरण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगली पाटबंधारे विभागाकडे नोटीस बजावली आहे. पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे टंचाई निधीतून पैशाची मागणी केली आहे. पण, त्यांच्याकडून प्रतिसाद नसल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.

यंदा जिल्ह्यातील पाच तालुके दुष्काळात होरपळत असल्यामुळे शासनाच्या आदेशानुसार टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना सुरू आहेत. दुष्काळात योजना चालू राहिल्यामुळे जत, आटपाडी, खानापूर, कडेगाव, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज अशा सात तालुक्यांतील १२० गावांमध्ये टंचाईची तीव्रता कमी झाली आहे. शासनाचा टंचाई निवारणावर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचला आहे. मात्र, शासनाकडून टंचाईतून वीजबिल भरण्यासाठी पाटबंधारे विभागाला सहकार्य नसल्यामुळे शासकीय यंत्रणांच्या वादात ऐन दुष्काळात योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

म्हैसाळ योजनेची ३१ मार्च २०१९ पूर्वीची २३ कोटी सहा लाख रुपये वीजबिलाची थकबाकी होती. यामध्ये एप्रिलच्या बिलाची पाच कोटी ८६ लाखांची भर पडून तो आकडा २८ कोटी ९२ लाखांपर्यंत गेला आहे. ताकारी आणि टेंभू उपसा सिंचन योजनांच्या वीज बिलाचा प्रश्न काही प्रमाणात कमी आहे. कारण, तेथील साखर कारखाने व शेतकरीही नियमित पाणीपट्टीचे पैसे भरत असल्यामुळे या योजनांची थकबाकी कमी आहे. हे जरी खरे असले तरी, काही कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून वसूल केलेले पैसेही वेळेवर पाटबंधारे विभागाकडे भरले नाहीत. परिणामी थकबाकीचा प्रश्न निर्माण होत आहे.

सावळ्या गोंधळामुळेही पाणीपट्टी थकीत 
पाटबंधारे विभागाकडे पाणीपट्टी वसुलीची यंत्रणाच नसल्यामुळे थकबाकी दिसत आहे. या सावळ्या गोंधळामुळेही पाणीपट्टी थकीत राहिली आहे. काही गावांमध्ये तर पाणीपट्टी १०० टक्के वसूल झाल्यानंतर ती पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात ५० टक्केच पोचते, अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत.

उपसा सिंचन योजना व थकीत रक्कम
टेंभू  ३ कोटी ९१ लाख
ताकारी  ९ कोटी ६७ लाख
म्हैसाळ २८ कोटी ९२ लाख
एकूण ४२ कोटी ५१ लाख

 

इतर बातम्या
सिंधुदुर्ग जिल्हयात मुसळधार पाऊस (video...सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील काही भागात बुधवारी (ता....
नाशिक तालुक्यात गारपिटीने द्राक्ष...नाशिक  : मागील आठवड्यात झालेल्या गारपिटीचा...
नत्र कमतरतेत मुळांच्या वाढीसाठी कार्यरत...जमिनीमध्ये नत्राची कमतरता असताना नत्राची पूर्तता...
जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबादेत पाऊस...औरंगाबाद  : मराठवाड्यातील चार जिल्ह्यांतील...
दीड टक्‍क्‍यावर मराठवाड्यातील पाणीऔरंगाबाद : मराठवाड्यातील ८७२ प्रकल्प व...
‘संत्रा उत्पादकांना द्या भरीव मदत’नागपूर ः उन्हामुळे संत्रा उत्पादकांचे झालेल्या...
कोल्हापुरात कर्नाटकी बेंदूर उत्साहातकोल्हापूर : शहर व जिल्ह्यात मंगळवारी कर्नाटकी...
नाशिक जिल्ह्यात गोवर्धन गोवंश सेवा...नाशिक  : नाशिक जिल्ह्यातील आठ महसुली...
नांदेड, परभणी, हिंगोली : सहा लाखांवर...नांदेड : पंतप्रधान किसान सन्मान योजनेची व्याप्ती...
वाशीम जिल्ह्यात पंतप्रधानांच्या पत्राचे...वाशीम : आगामी पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचे...
जलसंवर्धन कामांची राजू शेट्टींनी केली...बुलडाणा ः दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंवर्धनाची...
सोलापुरात साडेबारा कोटी रुपयांची ६६...सोलापूर : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नागरी...
कर्ज नाकारणाऱ्या बॅंकांवर गुन्हे नोंदवू...सोलापूर : खरीप हंगामात किती शेतकऱ्यांना...
पीकविमा, दुष्काळी मदतीसाठी शेतकऱ्यांचा...माळाकोळी,जि.नांदेड : गतवर्षीच्या खरीप पिकांच्या...
विधिमंडळ प्रतोदपदी आमदार आकाश फुंडकर बुलडाणा ः जिल्ह्यातील खामगाव विधानसभा मतदारसंघाचे...
बचत गट चळवळ बनली गावासाठी आधारनागठाणे, जि. सातारा : ‘गाव करील ते राव काय करील’...
नगरमध्ये चांगला पाऊस पडेपर्यंत छावण्या...नगर : नगर जिल्ह्यामध्ये ४९८ छावण्या सुरू आहेत....
पुणे : पावसाअभावी खरीप पेरण्या खोळंबल्यापुणे ः जूनचा अर्धा महिना ओलांडला तरी अजूनही...
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी...मुंबई  शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा झालाच...
राज्य अर्थसंकल्प : सर्वसमावेशक ‘निवडणूक...मुंबई : राज्यात मोसमी पाऊस लांबला असला तरी आगामी...