अजरा तालुक्यात हत्ती, गव्यांकडून ४९ लाखांचे नुकसान

अजरा तालुक्यात हत्ती, गव्यांकडून ४९ लाखांचे नुकसान
अजरा तालुक्यात हत्ती, गव्यांकडून ४९ लाखांचे नुकसान

आजरा, जि. कोल्हापूर : आजरा तालुक्‍यात हत्ती व गव्यांकडून २०१७-१८ या वर्षात पिकाचे ४८ लाख ८७ हजार १४ रुपयांचे नुकसान झाले. वन विभागाकडून ९२५ शेतकऱ्यांना ४६ लाख ४४ हजार ६२३ रुपयांच्या नुकसानभरपाईचे वाटप करण्यात आले. उर्वरित नुकसानभरपाईची ८० टक्के प्रकरणे मंजूर झाली असून, या महिनाभरात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे वाटप केले जाईल, असे वन विभागाने सांगितले. गेल्या २० वर्षांपासून तालुक्‍यात वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान होत आहे. यामध्ये प्रामुख्याने गव्यांचे कळप व हत्ती यांच्याकडून पिकांची मोठी हानी होत आहे. गव्यांकडून भात, नागली, ऊस या पिकांचे नुकसान झाले. हत्तींकडून भात, ऊस, केळी, मेसकाठी, काजू, आंब्याची झाडे यासह शेतीउपयोगी साहित्याचे नुकसान झाले. तालुक्‍यात गव्यांचे कळप प्रत्येक गावात नुकसान करीत आहेत. हत्तीकडून मात्र २० गावांत उपद्रव सुरू आहे. हत्तीचा उपद्रव असलेली गावे, नुकसानीची प्रकरणे व नुकसान वाटप केलेली रक्कम कंसात , गवसे - १५ (८८३८०), मेढेवाडी - ३ (९३५०), सुळेरान - २ (१११०९), आजरा - ४ (३०६८०), कर्पेवाडी - ६ (३७४२८), खानापूर - ९ (४२०६८), इटे - २ (१८३८०), देऊळवाडी - ४ (५२७७०), मसोली - २१ (११२३२६), वेळवट्टी - १७ (१३९८३८), दर्डेवाडी - ४९ (२४७५०), देवर्डे - २१ (१४८०४३), मुंगुसवाडी - १ (६१८८), हाळोली - २४ (१३२४७५), शेळप - २ (२२००), पारपोली - ३ (९३५०), खेडगे - १ (४४००), माद्याळ - ७ (३६४१७), सुलगाव - १ (५३६३), वझरे - ३ (७९६८).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com