सातारा जिल्ह्यात केवळ ११.४४ टक्के दूध संकलन

दूध दरप्रश्नी आंदोलन
दूध दरप्रश्नी आंदोलन

सातारा  ः दूध दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून (ता. १६) आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी (मंगळवारी) देखील अनेक गावांतील शेतकऱ्यांनी डेअरीमध्ये दूध घातले नाही. दहीवडी येथे संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतले, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी श्री महादेवास दुग्धाभिषेक घातला. जिल्ह्यात प्रतिदिन एका वेळ १५ लाख ४९ हजार लिटर दूध संकलन होते. यापैकी मंगळवारी सकाळी एक लाख ७७ हजार ४०० लिटर म्हणजे ११.४४ टक्केच दूध संकलन झाले आहे.

कराड तालुक्‍यातील अनेक गावांचे संकलन बंद राहिले. दरम्यान मंगळवारी कोयना दूध संघाचे संकलन सुरू होते. त्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष सचिन नलवडे यांना कऱ्हाड शहर पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले.

दरम्यान त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांनी बंदोबस्तात मोठी वाढ केली आहे. गावोगावी पोलिसांनी गस्त घालण्यास सुरवात केली आहे. दरम्यान माण तालुक्‍यातील दहीवडी येथे संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतले. तसेच, येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यानी श्री महादेवास दुग्धाभिषेक केला.

सोमवारी जिल्ह्यात २५ लाख लिटर दूध संकलनापैकी तीन लाख ९६ हजार लिटर दूध संकलन झाले होते. या आंदोलनाला जिल्ह्यातील बहुतांशी संस्थांकडून प्रतिसाद मिळत असल्याने दूध संकलन कमी होत आहे.शेतकऱ्यांनी स्वंयस्फूर्तीने डेअरीला दूध घातले नाहीत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com