सातारा जिल्ह्यात रब्बीची अकरा टक्के पेरणी

सातारा जिल्ह्यात रब्बीची अकरा टक्के पेरणी
सातारा जिल्ह्यात रब्बीची अकरा टक्के पेरणी

सातारा : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरणीचा प्रारंभ झाला असून, बुधवार अखेर (ता. २४) ११.५७ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक सातारा तालुक्यात पेरणी झाली आहे. अपुऱ्या पावसामुळे दुष्काळी तालुक्यात संथगतीने पेरणी सुरू आहे.   

जिल्ह्यात रब्बी हंगामातील पिकांचे सर्वसाधारण पेरणी क्षेत्र दोन लाख १४ हजार ८२२ हेक्‍टर असून, त्यापैकी (ऊस वगळून) २४ हजार ८६१ हेक्‍टर क्षेत्रावर म्हणजेच ११.५७ टक्के पेरणी झाली आहे. माण, खटाव, कोरेगाव, फलटण व खंडाळा या दुष्काळी तालुक्याचा रब्बी हा प्रमुख हंगाम असतो. मात्र, या तालुक्यात कमी पाऊस झाला असल्याने हंगाम सुरू होऊनही पेरणी संथ गतीने सुरू आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक सातारा तालुक्‍यात पाच हजार ८६० हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीची यंदा सर्वाधिक पेरणी झाली आहे. रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ३९ हजार १११ हेक्‍टर असून, त्यापैकी २२ हजार ३४१ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र २८ हजार ८८३ हेक्‍टर असून, त्यापैकी एक हजार ४९ हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मक्‍याचे सर्वसाधारण क्षेत्र १० हजार ९४१ हेक्‍टर असून, एक हजार ३९७ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे.

पश्चिमेकडील सातारा, कराड, पाटण तालुक्यात अनेक ठिकाणी आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दमदार पाऊस झाला होता. या पावसाच्या ओलीवर पश्चिमेकीडल तालुक्यात रब्बीच्या पेरण्या करण्यात आल्या आहेत. पूर्वेकडील दुष्काळी तालुक्यात रब्बी हंगामाच्या सुरवातीपासून पाणीटंचाईचे संकट निर्माण होऊ लागले आहे. परिणामी, पेरण्याची कामे संथगतीने सुरू आहेत. परतीचा पाऊस दमदार झाला, तरच या दुष्काळी तालुक्यात पेरण्या होऊ शकतात अथवा पेरणीचे क्षेत्र घटणार आहे.

तालुकानिहाय पेरणीक्षेत्र (हेक्‍टर) सातारा- ५,८६०, पाटण- ३,३००, कऱ्हाड- १,३९१, माण- ३,१२७, फलटण-५,२२२, खंडाळा-७५५, वाई- ५,१८०, महाबळेश्वर-३५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com