कादवाच्या विस्तारीकरणावर भर देणार : शेटे

कादवाच्या विस्तारीकरणावर भर देणार : शेटे
कादवाच्या विस्तारीकरणावर भर देणार : शेटे

चिंचखेड, जि. नाशिक : ‘‘शासनाने इथेनॉल प्रकल्पाबाबत सकारात्मक धोरण अवलंबले असून, त्याचा फायदा करून घेणे आवश्यक आहे . वेळेत ऊसतोडणी व्हावी, यासाठी कमी दिवसांत जास्तीचे गाळप करणे गरजेचे असून, त्यासाठी विस्तारीकरण आवश्यक आहे. येत्या काळात त्यावर अधिक भर देण्यात येणार आहे,`` असे कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी सांगितले.

कादवा सहकारी साखर कारखान्याचा ४२ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. कारखान्याचे सभासद हरिभाऊ बर्डे, तानाजी कामाले यांच्या हस्ते सपत्नीक बॉयलरपूजन झाले. शेटे म्हणाले, ‘‘आपण गेल्या १० वर्षांत मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्रीत बदल, दुरुस्ती केल्यामुळे कारखान्याची गाळप क्षमता वाढली आहे. केवळ साखरेवर विसंबून न राहता दूरदृष्टीने विस्तारीकरण, इथेनॉल प्रकल्प उभारणीसाठी सकारात्मक निर्णय घ्यावा लागेल. बँक आपल्याला साखर पोत्यावर १७०० ते १८०० रुपये उचलदर देईल. त्यात थोडेफार पैसे टाकून पहिला हप्ता देन हजार व उर्वरित रक्कम ही हंगाम संपल्यानंतर ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल.`` 

आमदार नरहरी झिरवाळ, डॉ. भारती पवार, गणपतराव पाटील, दत्तात्रेय पाटील, बाळासाहेब देशमुख, आत्माराम पाटील, युनियनचे अध्यक्ष सुनील कावळे आदींनी या वेळी मनोगत व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com