उपोषणासाठी बाजार समित्यांच्या कर्मचाऱ्यांची रजा

शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समित्या आहेत. त्यांचे कामकाज पार पाडण्यासाठी कार्यालयीन कामकाज सुरू ठेवले. शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही. याची आम्ही काळजी घेणार आहोत. - माणिक निकम, उपसचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, देवळा. कांदा अनुदानासंबंधी कागदपत्रे जमा करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे कामकाज सुरू ठेवणार आहोत. त्यामुळे कार्यालयीन रजा घेऊन कर्मचारी सहभागी आहेत. उपोषण सुरू राहील, तोपर्यंत आलटून पालटून रजा घेऊन उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सहभागी होऊ. - नीलेश दिंडे, विभागीय उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघ, पुणे.
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या कर्मचाऱ्यांची रजा
उपोषणासाठी बाजार समित्यांच्या कर्मचाऱ्यांची रजा

नाशिक : नियमनमुक्तीमुळे बाजार समित्यांचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे आस्थापनेवर परिणाम होऊन वेळेत वेतन होत नाही. खासगी बाजार समित्यांमुळेही बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे समित्यांची आर्थिक स्थिती मोडकळीस आली आहे. वेळेत नसलेले पगार, कर्मचाऱ्यांची नोकरीची नसलेली हमी यांसारख्या विविध प्रश्नांवर उभारलेल्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांचे कर्मचारी कार्यालयीन रजा घेऊन प्रातिनिधिक स्वरूपात मुंबई येथे उपोषणात सहभागी झाले. 

 बाजार समित्यांतील कर्मचारी शेतकऱ्यांची सेवा करतात. मात्र अनेक बाजार समित्यांमध्ये दिल्या जाणाऱ्या वेतनात तफावत आहे. काही बाजार समित्यांची आर्थिक स्थिती योग्य नसल्याने कर्मचाऱ्यांचे पगार काही महिन्यांपासून बंद आहेत. परिणामी अनेक कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना शासन सेवेत सामावून घेण्यात यावे, वेतन वेळेवर मिळावे, अशा मागण्या मांडण्यासाठी जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कर्मचारी सहभागी झाले. 

काही कर्मचारी बाजार समित्यांचे कामकाज बंद पडू नये म्हणून दैनिंदिन कामकाज पार पाडणार आहेत. जिल्ह्यात अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा अनुदानासंदर्भात शेतकऱ्यांची कागदपत्रे जमा करण्याचे कामकाज सुरू आहे. कांदा उत्पादकाची गैरसोय होऊ नये म्हणून   बाजार समितीचे कामकाज सुरू राहणार आहे. अनेक कर्मचारी इच्छा असूनही सहभागी झाले नाहीत, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com