agriculture news in marathi, Employment opportunities in the field of agriculture | Agrowon

शेतीक्षेत्रातही रोजगाराच्या संधी
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

मुंबई  : रोजगाराच्या संधी या केवळ उद्योग क्षेत्रातच आहेत असे नाही; सेवा, व्यवसाय, ब्रँडिंग, पुरवठा यासोबतच शेती क्षेत्रातसुद्धा रोजगाराच्या असंख्य संधी आहेत. कौशल्य प्राप्त मनुष्यबळाची सर्वच क्षेत्राला आवश्यकता आहे. देशात सध्या उद्योगाला पूरक वातावरण असून, इंडस्ट्री ४.० मुळे विविध क्षेत्रांत रोजगाराच्या मुबलक संधी निर्माण होतील, असा सूर मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हेर्जन्स २०१८ या गुंतवणूकदारांच्या परिषदेत इंडस्ट्री ४.० व भविष्यातील रोजगार या विषयावरील चर्चासत्रात निघाला.

मुंबई  : रोजगाराच्या संधी या केवळ उद्योग क्षेत्रातच आहेत असे नाही; सेवा, व्यवसाय, ब्रँडिंग, पुरवठा यासोबतच शेती क्षेत्रातसुद्धा रोजगाराच्या असंख्य संधी आहेत. कौशल्य प्राप्त मनुष्यबळाची सर्वच क्षेत्राला आवश्यकता आहे. देशात सध्या उद्योगाला पूरक वातावरण असून, इंडस्ट्री ४.० मुळे विविध क्षेत्रांत रोजगाराच्या मुबलक संधी निर्माण होतील, असा सूर मॅग्नेटिक महाराष्ट्र कॉन्व्हेर्जन्स २०१८ या गुंतवणूकदारांच्या परिषदेत इंडस्ट्री ४.० व भविष्यातील रोजगार या विषयावरील चर्चासत्रात निघाला.

या चर्चासत्रात शिशिर जोशपात्रा, उन्मेष पवार, ट्रोन्ड ब्रेडसेन, सुमित्रो घोष, माधव चंचाणी व पराग सातपुते प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. उद्योगाच्या विकासासाठी व वाढीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असून, सरकार कौशल्य प्रशिक्षणावर मोठ्या प्रमाणात भर देत आहे. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळ निर्माण होईल, असा आशावाद उपस्थितांनी व्यक्त केला. तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे; मात्र तंत्रज्ञानाचा अतिवापर हा रोजगाराच्या मार्गातील अडथळा ठरू शकतो, अशी भीती काही वक्त्यांनी व्यक्त केली.

अभियांत्रिकी शिक्षण पद्धतीत काही बदल करणे काळाची गरज आहे. उद्योग व्यवसायाला लागणारे कौशल्य अभ्यासक्रमात समाविष्ट केली जावीत. काही उद्योग समूहांनी त्यांना लागणारे स्किल मॅन पॉवर मिळावे म्हणून विद्यापीठात अभ्यासक्रम सुरू केल्याचे या चर्चासत्रात सांगण्यात आले. भारतात दरवर्षी तीन कोटी नवीन वाहने रस्त्यावर येत असतात.

या वाहनांसाठी असलेल्या सर्व्हिसिंग सेंटरसाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. युवकांनी ही कौशल्य आत्मसात केल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल. त्याचप्रमाणे शेतीक्षेत्रातसुद्धा रोजगाराच्या संधी आहेत. पारंपरिक शेतीपेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती व शेतीपूरक व्यवसाय या क्षेत्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा सूर या चर्चासत्रात निघाला.

इतर बातम्या
`दुष्काळाबाबत उपाययोजनांसाठी स्वतंत्र...पुणे  ः दुष्काळ आणि योजनांच्या माध्यमातून...
वऱ्हाडात काही ठिकाणी अवकाळी पाऊसअकोला : वऱ्हाडात मंगळवारी (ता.२०) सकाळ पर्यंतच्या...
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर...सातारा  ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख...
वर्धा जिल्ह्यातील प्रकल्पांत ४० टक्के...वर्धा : यंदा समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान...
धुळे जिल्ह्यात अवकाळी पाऊसधुळे : शहरासह धुळे तालुक्‍यातील पश्‍चिम पट्ट्यात...
अमरावती जिल्ह्यात रब्बीचे ५० टक्‍के...अमरावती : जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस...
मराठवाड्यात उपयुक्‍त पाणी उरले केवळ २५...औरंगाबाद : दुष्काळाच्या झळा तीव्र झालेल्या...
सांगलीत वादळी पावसाने द्राक्षबागांचे...सांगली ः द्राक्षाला दर चांगले मिळतील म्हणून लवकर...
नाशिक जिल्ह्यातील काही भागाला अवकाळी...नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अनेक भागात सोमवारी...
मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाची...औरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड,...
मालावी देशातील हापूस पुण्यात दाखलपुणे ः दक्षिण अफ्रिका खंडातील मालावी देशातील...
वनामकृवि आणि महाअॅग्रोमध्ये सामंजस्य...परभणी ः कृषी विस्तार कार्याअंतर्गत सार्वजनिक-...
सोलापुरात सलग दुसऱ्या दिवशी पाऊससोलापूर : सोलापूर जिल्ह्यात ठिकठिकाणी सोमवारी...
नव्या सहकारी संस्थांना भागभांडवल :...नाशिक : सहकार खात्याने नावीन्यपूर्ण सहकारी संस्था...
पुणे जिल्ह्यातील चार तालुक्यांत काही...पुणे ः पुणे जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ हवामान...
हिरज येथे रेशीम कोषाची बाजारपेठसोलापूर : राज्यातील रेशीम कोष उत्पादक शेतकरी व...
संगमनेरच्या पश्‍चिम भागाला पाऊस,...संगमनेर, जि. नगर ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात...
अॅग्रोवन सरपंच महापरिषद शनिवारपासून...पुणे  : कृषी, ग्रामविकास आणि जलसंधारण...
कोल्हापुरात ऐन हंगामातच गुऱ्हाळघरे शांतकोल्हापूर  : यंदा गूळ दरात काहीशी वाढ...
दुष्काळग्रस्तांना मदत, आरक्षणावरून...मुंबई   ः मराठा, मुस्लिम आणि धनगर आरक्षण...