agriculture news in marathi, ENAM mandatory for Private APMCs | Agrowon

खासगी बाजार समित्यांना ‘ई-नाम’ बंधनकारक
टीम अॅग्रोवन
शनिवार, 24 फेब्रुवारी 2018

पुणे: आॅनलाइन नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट (ई-नाम) आता खासगी बाजार समित्यांनादेखील बंधनकारक करण्यात येणार अाहे. ई-नाममधील समाविष्ट बाजार समित्यांमधील आडत्यांचे परवाने नूतनीकरण करताना त्यांना ई-नाम व्यवहार सक्तीचे करण्यात येणार आहेत. याबाबचे निर्देश सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. तर समाधानकारक काम न करणाऱ्या समित्यांवर कारवाईचेदेखील संकेत दिले आहेत.

पुणे: आॅनलाइन नॅशनल ॲग्रिकल्चर मार्केट (ई-नाम) आता खासगी बाजार समित्यांनादेखील बंधनकारक करण्यात येणार अाहे. ई-नाममधील समाविष्ट बाजार समित्यांमधील आडत्यांचे परवाने नूतनीकरण करताना त्यांना ई-नाम व्यवहार सक्तीचे करण्यात येणार आहेत. याबाबचे निर्देश सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. तर समाधानकारक काम न करणाऱ्या समित्यांवर कारवाईचेदेखील संकेत दिले आहेत.

ई-नाममध्ये सहभागी झालेल्या राज्यातील ६० बाजार समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी संबंधित बाजार समित्यांचे पदाधिकारी आणि सचिवांची बैठक नुकतीच मंत्री देशमुख यांनी पुण्यात घेतली. या वेळी देशमुख म्हणाले, ‘‘ई-नाममध्ये सहभागी झालेल्या बाजार समित्यांनी काटेकाेर अंमलबजावणी करीत ई-नाममध्ये महाराष्ट्र देशात क्रमांक एकचे राज्य करण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्या बाजार समित्या चांगले काम करतील, अशा बाजार समित्यांना प्राेत्साहनपर बक्षीस देण्यात यावीत. तर ज्या बाजार समित्यांचे कामकाज समाधानकारक हाेणार नाही, अशा बाजार समित्यांवर कारवाईदेखील करण्यात यावी, असे आदेश पणन मंडळ आणि पणन संचालनालयाला देण्यात आले आहेत. 

तसेच संबधित ६० बाजार समित्यांमधील अडते आणि परवानाधारक खरेदीदारांनादेखील ई-नाम सक्तीचे करण्यात यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. तर जे अडते आणि खरेदीदार आॅनलाइन व्यवहार करतील त्यांना बाजार शुल्कात सवलत देण्यात यावी, अशीही सूचना मंत्री देशमुख यांनी पणन संचालनालय आणि पणन मंडळाला केली. 

दृष्टिक्षेपात ई-नाम 

  •  ६० बाजार समित्यांचा समावेश 
  •  ३० बाजार समित्यांमध्ये ई-लिलाव सुरू 
  •  १७ समित्यांमध्ये शेतीमालाची गुणवत्ता तपासणी सुरू 
  •  दाैंड, वर्धा बाजार समित्यांमध्ये आॅनलाइन पेमेंट सुरू
  •  जानेवारीअखेर ५६ टक्के आॅनलाइन लिलाव 
  •  २ लाख २४ हजार ४८७ शेतकऱ्यांची ई-नाममध्ये नाेंदणी 
  •  ७ हजार ५७० व्यापाऱ्यांची नाेंद 
  •  ६,९९२ अडत्यांची नाेंद
     

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...