agriculture news in marathi, encroachment in agrani river, sangli, maharashtra | Agrowon

अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 22 मे 2018

सांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी नदीचे पात्र अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. अनेक गावांच्या हद्दीतील जवळपास निम्मे नदीपात्रच गायब झाले आहे. ग्रामपंचायत व तालुका प्रशासनाचे मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष आहे. अतिक्रमण करणाऱ्यांना कोणत्याही कारवाईचा धाक राहिलेला नाही. परिस्थिती अशीच राहिली तर एक दिवस तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी नदीपात्र शोधण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.

सांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी नदीचे पात्र अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. अनेक गावांच्या हद्दीतील जवळपास निम्मे नदीपात्रच गायब झाले आहे. ग्रामपंचायत व तालुका प्रशासनाचे मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष आहे. अतिक्रमण करणाऱ्यांना कोणत्याही कारवाईचा धाक राहिलेला नाही. परिस्थिती अशीच राहिली तर एक दिवस तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी नदीपात्र शोधण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.

खानापूर तालुक्‍यातील तामखडीजवळ अडसरवाडी येथे अग्रणी नदीचा उगम झाला आहे. डोंगरात उगम पावलेली ही नदी खानापूर, तासगाव आणि कवठेमहांकाळ या तीन तालुक्‍यांतून ५५ किलोमीटर प्रवास करीत कर्नाटकातील अथणी तालुक्‍यात कृष्णा नदीला मिळते.

गेल्या चार वर्षांपूर्वी अग्रणी नदी पात्र खोलीकरण आणि अतिक्रमण लोकसहभाग आणि शासनानाच्या मदतीने काढले आहे. यामुळे नदीच्या उगमापासून २० किलोमीटर अंतरापर्यंत खोलीकरण आणि रुंदीकरणातून भव्य पात्र निर्माण झाले आहे. खानापूर तालुक्‍यातील २० किलोमीटर पात्रात अतिक्रमण होऊ नये यासाठी ग्रामस्थांनी उपाययोजना केल्या आहेत.

मात्र, तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्‍याच्या हद्दीतील पात्र अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. तासगाव तालुक्‍यातील वायफळे, यमगरवाडी, सावळज, अंजनी, वज्रचौंडे, गव्हाण आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यातील मळणगाव, बोरगाव, शिरढोण, मोरगाव, हिंगणगाव, देशिंग, विठुरायाचीवाडी, अग्रण धुळगाव, रांजणी, लोणारवाडी या गावांच्या हद्दीतील नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे.

पाण्याचा उपसा करण्यासाठी पात्रालगत विहीरखोदाई करण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. विशेषतः तासगाव तालुक्‍यातील गव्हाण आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यातील मळणगाव येथील शेतकऱ्यांनी अग्रणी पात्रालगत मोठ्या प्रमाणावर विहिरी खोदल्या आहेत. स्थानिक शेतकऱ्यांबरोबर तासगाव तालुक्‍यातील अंजनी, वडगाव, लोकरेवाडी, नागेवाडी, सावळज, परिसरातील ग्रामस्थांनी अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे.

अग्रणी नदीच्या उगमापासून ते २० किलोमीटर परिसरात एकाही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केलेले नाही. मग तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील ग्रामस्थ आणि तालुका प्रशासन अतिक्रमण दूर करण्यासाठी का पुढे येत नाहीत असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

इतर ताज्या घडामोडी
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...
जैविक शेती मिशन राबविण्यास प्रारंभअकोला ः शासनाने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या डॉ....
जळगावसह रावेर मतदारसंघ भाजपकडेच?जळगाव ः आगामी लोकसभा निवडणुकीसंबंधी शिवसेना व...
किसान लाँग मार्चला जाणाऱ्या शेतकऱ्यांना...धुळे  : किसान लाँग मार्चमध्ये सहभागी...
जळगावात दादरला ३१०० रुपयांपर्यंत दरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दादरची (...
भारतीयांच्या पचनसंस्थेतील...भारतीय लोकांच्या पचनसंस्थेमध्ये कार्यरत...
अमरावती विभागाला पाणीटंचाईच्या झळाबुलडाणा : कमी पावसामुळे अमरावती विभागातील...
तूर विक्रीच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांची...अकोला  : या हंगामात शेतकऱ्यांनी पिकविलेल्या...
शेतकरी, जवान अडचणीत : भुजबळनाशिक : सध्याच्या सरकारच्या काळात देशातील...
दुष्काळात खचू नका, शासन पाठीशी :...सोलापूर : दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी,...