agriculture news in marathi, English novel written by a farmer's son | Agrowon

शेतकऱ्याच्या पोराने लिहिली इंग्रजी कादंबरी..!
सुदर्शन सुतार
मंगळवार, 1 जानेवारी 2019

आईचे शिक्षण नाही, वडिलांची जेमतेम चौथी झालेली, स्वतःच्या शेतीत राबणारा, शेतातली नांगरणी, कुळपणी असो की खुरपणी अगदी वेळप्रसंगी दुसऱ्याच्या शेतावरही मजुरीसाठी जाणाऱ्या पानगाव (ता. बार्शी) येथील पांडुरंग तानाजी मोरे या तिशीतल्या तरुणाने इंग्रजी कांदबरी लिहून सीमोल्लंघन केले आहे. ‘किंगडम इन ड्रीम दी प्राइममिनिस्टर’ असे या कादंबरीचे नाव आहे. सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेवर अचूक बोट ठेवताना शेतकऱ्यांचे दुःख रोज भोगणाऱ्यां पांडुरंगने या कादंबरीत सामान्य शेतकरी कुटुंबाचं जगणं मांडलं आहे.

आईचे शिक्षण नाही, वडिलांची जेमतेम चौथी झालेली, स्वतःच्या शेतीत राबणारा, शेतातली नांगरणी, कुळपणी असो की खुरपणी अगदी वेळप्रसंगी दुसऱ्याच्या शेतावरही मजुरीसाठी जाणाऱ्या पानगाव (ता. बार्शी) येथील पांडुरंग तानाजी मोरे या तिशीतल्या तरुणाने इंग्रजी कांदबरी लिहून सीमोल्लंघन केले आहे. ‘किंगडम इन ड्रीम दी प्राइममिनिस्टर’ असे या कादंबरीचे नाव आहे. सामाजिक आणि राजकीय व्यवस्थेवर अचूक बोट ठेवताना शेतकऱ्यांचे दुःख रोज भोगणाऱ्यां पांडुरंगने या कादंबरीत सामान्य शेतकरी कुटुंबाचं जगणं मांडलं आहे. अमेरिकेतील न्युयॅार्कस्थित प्रसिद्ध अशा पारट्रि्ज पब्लिकेशनने ती प्रकाशित केली आहे. सध्या ही कादंबरी थेट ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ऑनलाईन पोर्टलवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

 पांडुरंगचे वडील तानाजी हे शेती करतात. त्यांची स्वतःची आठ एकर शेती आहे. पांडुरंग हा त्यांचा एकुलता एक मुलगा, मुलाने भरपूर शिकावं आणि नोकरी करावी, अशी त्यांची अपेक्षा. पण बारावीत केवळ ४५ टक्के गुण मिळाल्याने निराश झालेल्या पांडुरंगने त्यानंतर पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण इंग्रजीत पूर्ण करण्याचा निर्धार केला.

आपल्या कादंबरी विषयी बोलताना पांडुरंग मोरे... video पहा

जिद्दी आणि कष्टाळू पांडुरंगने पुढे इंग्रजी विषयातच २०१२ मध्ये एम.ए.बीडपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर बार्शीतील एका खासगी महाविद्यालयात सहायक प्राध्यापकाची नोकरीही पत्करली. पण मिळणारा पगार आणि प्रत्यक्षातलं वास्तव याचा हिशेब त्याच्या लेखी जुळेना, अवघ्या वर्षभरातच त्याने ही नोकरी सोडली आणि थेट स्वतःच्या शेतात राबण्याचा निर्णय घेतला, अर्थात लहानपणापासून आईवडलांबरोबर तोही शेतीत राबललेला, शेतीत जगलेला. शेतीचं भयाण वास्तव माहीत असूनही त्याने शेतीत उडी घेतली. मुलाच्या या निर्णयाने साहजिकच, आईवडिलांना काळजी वाटली, पण तो करेल काही तरी, केवळ या आशेवर त्यांनीही त्याला पाठिंबा दिला.

पण शेती करत लिखाण करण्याचा निर्णय पांडुरंगने घेतला. तोही इंग्रजी पुस्तकांचा. गावालगतच शेतातल्या वस्तीवर पत्र्याच्या शेडमध्ये तो आपल्यातील लेखकाला साद घालू लागला. विचाराचं काहूर मनात साठवू लागला. शेतातील नांगरणी, पेरणी, कुळपणी असो की खुरपणी तसेच जनावरांचा व्याप सांभाळत पांडुरंग लिहित राहिला. आजही पांडुंरग शेतात आई-वडिलांबरोबर शेतातल्या कामात व्यस्त असतो, कामे झाल्यानंतर किंवा फावल्या वेळेत तो आपलं लिखाण करतो. त्यातूनच दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर ‘किंगडम इन ड्रीम दी प्राइम मिनिस्टर’ ही कादंबरी त्याने लिहिली. शेती आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबांचं वास्तव त्यात मांडण्याचा त्याने प्रयत्न केला आहे. त्याची प्रत्यक्ष भेट घेतली, तेव्हा शेतातल्या कामात तो व्यस्त होता, सध्या कांद्याची काढणी त्याच्याकडे सुरू आहे. विशेष म्हणजे बटईने केलेल्या शेतीतला कांदा ते काढत होते. सध्या कांद्याला भाव नाही, या प्रश्नावर चिंता व्यक्त करताना व्यवस्थेचे आपण गुलाम आहोत, करणार काय, असा प्रतिप्रश्न त्याने केला. कादंबरीबाबत मी स्वतः शेती जगलो, अनुभवलो, त्याच्या जवळपास जाणारी ही कादंबरी आहे, स्वप्नातील स्वप्नंही आपली होऊ शकत नाहीत, याची जाण आणि भान देणारी ही कादंबरी आहे, असे पांडुरंग सांगतो.

 ॲमेझॉन, फ्लिपकार्टवर उपलब्ध

अमेरिकेच्या न्युयॅार्कस्थित पारट्रीज पब्लिकेशनने ही कादंबरी प्रकाशित केली आहे. ४०० पानांच्या या कादंबरीची किंमत ४९९ रुपये आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांना ही समर्पित केली आहे. साडेतीन महिन्यांपूर्वी २० ऑगस्टला ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. सध्या  ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि बार्न्स ॲड नोबेल यांसारख्या ऑनलाईन पोर्टलवर ही कादंबरी विक्रीस उपलब्ध आहे.

...आता ‘व्हाइटमनी’ही लवकरच

‘किंगडम इन ड्रीम’नंतर शेतकरी आत्महत्या आणि एकूणच देशातील राजकीय, सामाजिक परिस्थितीवर प्रहार करणारे ‘व्हाइट मनी’ हे पुस्तक पांडुरंगने लिहून तयार केले आहे. लवकरच ते प्रकाशित होईल. त्याशिवाय ‘द डार्क वे’ आणि ‘द बर्थडे गिफ्ट’, ‘हजबंड टेक्स हजबंड’ ही तीन नाटके आणि ‘लिडरशीप अॅाफ अ सो’ आणि ‘आय आस्क फ्रिडम’ ही दोन कवितासंग्रहही तयार आहेत.

  • पानगावचा अवघा तिशीतला पांडुरंग मोरे लेखक
  • अमेरिकेच्या पारट्रीज पब्लिकेशनकडून प्रकाशित
  • किंगडम इन ड्रीम दी प्राइममिनिस्टर मध्ये शेतकरी कुटुंबाच्या जगण्याची मांडणी

फोटो गॅलरी

इतर यशोगाथा
आर्थिक, सामाजिक, कृषिसंपन्न राजुरीचा...आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत व...
संत्रा बागेत काटेकोर पाणी व्यवस्थापन संत्रा पिकात पाणी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवावे...
शून्यातून राऊत दांपत्याने उभारली...लातूर जिल्ह्यात नागरसोगा (ता. औसा) येथील राऊत...
पेरू, अॅपलबेरमधून पीक बदल, कष्टातून...पारंपरिक शेती पद्धतीत बदल करून व सेंद्रिय...
उत्कृष्ठ कारली पिकवण्यात पाटील यांचा...लोणी (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील भरत, गणेश व...
पाणी व्यवस्थापनातून नळावणे गावाची...अनेक वर्षांच्या पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी...
पाणी व्यवस्थापनातून वाढविली कापसाची...आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील अंबोडा (ता....
पाणी व्यवस्थापनातून ग्रामविकासपाण्यासाठी कायम संघर्ष करीत असलेल्या कान्होळ (जि...
‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’कडे आयटी...‘आर्टिफिशियल इंटिलिजन्स’ हेच येत्या काळातील...
डेरे यांनी उभारली अत्याधुनिक सिंचन...सातारा जिल्ह्यातील कवठे येथील अतुल डेरे यांनी...
अल्पभूधारकांच्या आयुष्यात जलश्रीमंती बुलडाणा जिल्ह्यात जानेफळ परिसरात शासनाच्या...
सर्वाधिक ६५० शेततळ्यांचं अजनाळेसोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका दरवर्षीच...
अवघी कारभारवाडी झाली ठिबकमयकोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी (ता. करवीर) येथे...
कम पानी, मोअर पानी देणारे डाॅ. वने...नगर जिल्ह्यातील मानोरी येथील कृषिभूषण डॉ....
वाघाड पाणीवापर संस्थांनी शेतीतून उभारले...नाशिक जिल्ह्यात वाघाड प्रकल्पस्तरीय पाणीवापर...
सत्तावीस गटांच्या बळातून घडली किमयासंगमनेर (जि. नगर) तालुक्यातील सावरगाव तळ...
होय, कमी पाण्यात विक्रमी ऊस !सांगली जिल्ह्यातील गोटखिंडी येथील प्रयोगशील ऊस...
मराठवाड्यात सिंचनातले सर्वोच्च...परभणी जिल्ह्यात वरपूड येथील चंद्रकांत अंबादासराव...
विकासाची गंगा आली रे अंगणी...खानदेशात जळगाव, जामनेर व भुसावळ या तालुक्‍यांच्या...
आसूद : पाणी वितरणाचे अनोखे मॉडेलरत्नागिरी जिल्ह्यात दापोली-हर्णे रस्त्यावर दोन...