मूग, उडीद खरेदी नोंदणीसाठीच्या सॉफ्टवेअरला एरर
गोपाल हागे
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

अकोला : शासनाने हमीभावाने मूग, उडदाची खरेदी करण्याची घोषणा केली असून, यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे अावाहन केले अाहे. मात्र अनेक ठिकाणी नोंदणीसाठी दिलेल्या सॉफ्टवेअरमध्ये डाटा एन्ट्री होत नसल्याच्या तक्रारी येत अाहेत. त्यामुळे दोन दिवसांत नाव नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या नगण्य असल्याचे सांगण्यात येत आहे.

अकोला : शासनाने हमीभावाने मूग, उडदाची खरेदी करण्याची घोषणा केली असून, यासाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे अावाहन केले अाहे. मात्र अनेक ठिकाणी नोंदणीसाठी दिलेल्या सॉफ्टवेअरमध्ये डाटा एन्ट्री होत नसल्याच्या तक्रारी येत अाहेत. त्यामुळे दोन दिवसांत नाव नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची संख्या नगण्य असल्याचे सांगण्यात येत आहे.

मूग, उडदाला सध्या खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळत अाहे. या दरामुळे शेतकरी चिंतातूर झाले अाहेत. या शेतमालाला किमान हमीभाव मिळावा, यासाठी शासनाने ‘नाफेड’च्या माध्यमातून खरेदी करण्याचे जाहीर केले. यासाठी केंद्राकडे विशेष परवानगीही मागण्यात अाली अाहे. ती प्राप्त होताच मुगाची बोनससह ५५७५ अाणि उडदाची ५४०० रुपये हमीभावाने खरेदी सुरू केली जाणार अाहे. पहिल्या टप्प्यात राज्यात ८३ ठिकाणी हे केंद्र कार्यान्वित होणार अाहे.

तूर खरेदीच्यावेळी ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रांवर प्रचंड प्रमाणात गोंधळ झाला होता. त्यामुळे अाता मूग, उडीद खरेदीच्या वेळी हीच वेळ येऊ नये यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी केली जात अाहे. शेतकऱ्याला किती माल विकायचा अाहे, त्याने किती लागवड केली होती याची माहिती दर्शविणारा सातबारा, पेरेपत्रक, अाधार क्रमांक, बँक खाते क्रमांक अशी सविस्तर माहिती सादर करावी लागणार अाहे. यासाठी एका साॅफ्टवेअरमध्ये माहिती नोंदविली जाणार अाहे. 

यासाठी एका कंपनीला सॉफ्टवेअरचे काम देण्यात अाले अाहे. मंगळवारी (ता.३) या नोंदणीचा शुभारंभ झाला; परंतु पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणी हे साॅफ्टवेअर पोचले नव्हते. त्यानंतर अाता बुधवारी (ता.चार) दुसऱ्या दिवशीसुद्धा प्रचंड अडचणी अाल्याचे समजते.

टॅग्स

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात सर्वाधिक शेतकऱ्यांना...नगर  : राज्यात कर्जमाफी मिळणारे सर्वाधिक...
राज्य सरकारचे धोरण शेतकरी हिताचे ः जानकरउस्मानाबाद  : राज्य सरकारचे धोरण...
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा सरकारचा...नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांना ऐन दिवाळीत...
सणाच्या दिवशी शेतकऱ्यांचे ठेचा भाकर...बुलडाणा : एेन सण काळात स्वाभिमानी शेतकरी...
शेतीपूरक व्यवसायाच्या आराखड्याचे काम...पुणे : शेतकऱ्यांना कर्जमाफी केली असली तरी,...
औरंगाबाद येथे कर्जमाफी प्रमाणपत्राचे... औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्हाधिकारी...
देशातील सर्वांत मोठी कर्जमाफी ः... सातारा  : शेती आणि शेतकऱ्यांना चांगले दिवस...
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफी... हिंगोली : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा...
कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड ः... नांदेड : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
शासन शेतीमाल प्रक्रिया उद्योगांवर भर... जळगाव  ः शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी...
असंतोष विभागण्यासाठीच कर्जमाफीचे...मुंबई : सरकारने कर्जमाफीसाठी ज्या अटी- शर्ती लागू...
संत गजानन महाराज संस्थान करतेय...शेगाव, जि. बुलडाणा : शिस्त, सेवा अाणि समाज...
परभणीतील शेतकऱ्यांना कर्जमाफी... परभणी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
राज्यातील बहुतांशी भागांत उकाडा वाढलापुणे : परतीचा पाऊस राज्यातून गेल्याने बहुतांशी...
कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक ः सदाभाऊ खोत कोल्हापूर : शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत...
कर्जमाफी शेतकऱ्यांना ताकद देणारी ः... बुलडाणा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज...
अपयश लपविण्यासाठी भाजपकडून खोटी...मुंबई: दुसऱ्या टप्प्यातील ३७०० ग्रामपंचायतींच्या...
औरंगाबादेत २९ ऑक्‍टोबरला 'मराठा महासभा' औरंगाबाद : मराठा समाजातर्फे राज्यभर 57 मोर्चे...
नागपुरात सोयाबीन प्रतिक्‍विंटल २७५०...नागपूर ः बाजारात सोयाबीनच्या दरात होणाऱ्या किरकोळ...
केवळ अमळनेरलाच कडधान्य खरेदी केंद्र सुरू जळगाव  ः जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. १७)...