agriculture news in marathi, establish committees for lender loanwaiver says court | Agrowon

सावकारी कर्जमाफीचे अर्ज पडताळीसाठी समित्यांचे गठण करा
टीम अॅग्रोवन
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

नागपूर : सावकारी कर्जमाफीची अंमलबजावणी कोणत्याही धोरणाविना करण्यात आली. अशाप्रकारची कर्जमाफी लोकशाहीला घातक असल्याचे सांगत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारवर ताशेरे ओढले. सावकारी कर्जमाफीचे अर्ज पडताळणीकरिता जिल्हास्तरावर समित्यांचे गठण करीत त्या समितीमध्ये निवृत्त न्यायाधीशांचा समावेश करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. 

नागपूर : सावकारी कर्जमाफीची अंमलबजावणी कोणत्याही धोरणाविना करण्यात आली. अशाप्रकारची कर्जमाफी लोकशाहीला घातक असल्याचे सांगत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सरकारवर ताशेरे ओढले. सावकारी कर्जमाफीचे अर्ज पडताळणीकरिता जिल्हास्तरावर समित्यांचे गठण करीत त्या समितीमध्ये निवृत्त न्यायाधीशांचा समावेश करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. 

बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी कैलास पाचपोर, अरुण इंगळे व अन्य नऊ जणांनी नागपूर खंडपीठात सावकारी कर्जमाफीची अंमलबजावणी पारदर्शी झाली नसल्या संदर्भाने याचिका दाखल केली होती. जिल्हा समितीने १५ पैकी ११ जणांना कर्जमाफीसाठी अपात्र ठरविले तर केवळ ४ जणांना याचा लाभ देण्यात आला. कर्जमाफी योजनेत काही सावकारांना एक कोटी ९७ लाख रुपयांपर्यंत पैसे देण्यात आले. कोणत्याही निकष, नियम व अटींविना ही कर्जमाफीची प्रक्रिया राबविण्यात आली, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. २००५ मध्ये सावकारी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी तालुका व जिल्हास्तरावर समित्या गठीत करण्यात आल्या.

याप्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सरकारच्या कामाप्रती तीव्र शब्दात नाराजी व्यक्‍त केली. विना पडताळणी कोट्यावधी रुपये रोख देण्याचा प्रकार गंभीर असल्याचे न्यायालयाने म्हटले. सावकारी कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात यावी या समितीने कर्जमाफी अर्जाची पडताळणी करावी. ही प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी या समितीमध्ये एका निवृत्त न्यायाधीशांचा समावेश असावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. 

खंडपीठाने कोणत्याही धोरणाविना राबविण्यात आलेल्या सावकारी कर्जमाफीवर प्रश्‍नचिन्ह लावले आहेत. कर्जमाफीचे धोरण ठरविण्यासाठी जिल्हास्तरीय समितीचे गठण करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. त्यामध्ये सेवानिवृत्त न्यायाधीशांचा समावेश करावा असे म्हटले आहे.
- ॲड. विपूल भिसे

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...