agriculture news in marathi, 'Ethanol' can be used to give higher rates: Shinde | Agrowon

‘इथेनॉल'मुळे जादा दर देणे शक्‍य : शिंदे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

सोलापूर : ‘‘केंद्र सरकारने साखरेच्या दराबरोबरच इथेनॉलच्या दरासंदर्भात चांगला निर्णय घेतला आहे. उसाची रिकव्हरी कमी झाली, तरी इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना चांगला दर देणे शक्‍य होणार आहे,'' असे मत माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी व्यक्त केले.

कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या ४६ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ आमदार शिंदे यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी माजी आमदार राजन पाटील होते. राज्य बॅंकेचे प्रशासकीय संचालक अविनाश महागावकर या वेळी उपस्थित होते.

सोलापूर : ‘‘केंद्र सरकारने साखरेच्या दराबरोबरच इथेनॉलच्या दरासंदर्भात चांगला निर्णय घेतला आहे. उसाची रिकव्हरी कमी झाली, तरी इथेनॉलमुळे शेतकऱ्यांना चांगला दर देणे शक्‍य होणार आहे,'' असे मत माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी व्यक्त केले.

कुमठे येथील श्री सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याच्या ४६ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ आमदार शिंदे यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी माजी आमदार राजन पाटील होते. राज्य बॅंकेचे प्रशासकीय संचालक अविनाश महागावकर या वेळी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, ‘‘सरकारची काही धोरणे चुकीची किंवा त्रासदायक असली, तरी काही धोरणे ही निश्‍चितच शेतकऱ्यांना आणि साखर कारखानदारांना फायद्याची आहेत. त्याचा उपयोग कसा केला जातो, यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत.''

राजन पाटील म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांनी साखरेचा दर ३१०० रुपये करावा, अशी मागणी केंद्राकडे केली आहे. हा दर ३५०० रुपये करावा. दिल्लीत सध्या गडकरी यांचे मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त चालते आणि गडकरींकडे सुभाषबापूंचे चालते. त्यामुळे त्यांनी मध्यस्थी करून हा दर निश्‍चित करायला भाग पाडावे.''

‘‘पाण्याची कमतरता, हुमणी, डिझेलचे वाढते दर, उसाला अवाजवी दराची मागणी, विजेचे दर, तांत्रिक कर्मचारी व ऊसतोड कामगारांची कमतरता या सर्व आव्हानांना तोंड देत या हंगामाची सुरवात होत आहे. तेव्हा एफआरपी हंगाम सुरू झाल्यानंतर १५ दिवसांत पहिला हप्ता, हंगाम संपल्यानंतर दुसरा हप्ता आणि दिवाळीला तिसरा हप्ता देण्याचा निर्णय व्हावा``, अशी अपेक्षा कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांनी व्यक्त केली.

कारखान्याचे उपाध्यक्ष ॲड. दीपक आलुरे यांनी स्वागत केले. महागावकर यांनीही मनोगत व्यक्त केले. अशोक बिराजदार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकारी संचालक संतोष कुंभार यांनी आभार मानले.

इतर ताज्या घडामोडी
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटीनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीचा अग्रीम...परभणी ः परभणी जिल्ह्यात उद्भवलेल्या दुष्काळी...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १२...नांदेड ः चालू कापूस खरेदी हंगामामध्ये नांदेड,...
बेदाणानिर्मिती शेडवर बसू लागली यंत्रेसांगली ः जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज...
उन्हाळी भुईमुगावरील कीड नियंत्रणउन्हाळी भुईमुगावर खालील विविध अळ्यांचा...
जातपडताळणीचा ‘ऑफलाइन’ छळ पुणे  : शासनानेच वाटलेल्या जातप्रमाणपत्रांची...
लागवड उन्हाळी तिळाची...उन्हाळी हंगामात लागवडीसाठी एकेटी १०१, पीकेव्ही एन...
सांगलीत शनिवारपासून सेंद्रिय परिषद,...सांगली ः रेसीड्यू फ्री ऑरगॅनिक मिशन इंडिया...
उन्हाळी भुईमुगावरील पानेे खाणारी अळी या अळीला तंबाूखूवरील पाने खाणारी अळी म्हणूनही...
लोहाच्या कमतरतेवरील वनस्पतींची...हेन्रिच हेईन विद्यापीठ डस्सेलडॉर्प आणि...
नेरच्या नदी पात्रातील भराव काढादेऊर, ता.धुळे : पांझरा नदी पात्रातील नव्या...
सौर कृषिपंप योजनेसाठी पुणे जिल्ह्यातून...पुणे : शेतकऱ्यांना दिवसा व सौरऊर्जेद्वारे शाश्वत...
अपारंपरिक ऊर्जा काळाची गरज : बावनकुळेभंडारा : पारंपरिक ऊर्जेची मर्यादा लक्षात घेऊन...
नांदेड जिल्ह्यामध्ये १८ टॅंकरद्वारे...नांदेड ः जिल्ह्यातील तीव्र पाणीटंचाई उद्भवलेली ११...
परभणी, नांदेड जिल्ह्यात २ लाख खात्यांवर...परभणी ः परभणी आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळामुळे...
टेंभूच्या नेवरी वितरिकेची कामे २२...सांगली ः टेंभू उपसा सिंचन योजनेच्या नेवरी वितरिका...
पाणीटंचाईमुळे कांदा लागवडीच्या...पुणे ः वाढत असलेल्या पाणीटंचाईमुळे शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यामध्ये तुरीचे उत्पादन...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा दुष्काळी परिस्थिती...
अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत १२ कोटी...कोल्हापूर : शासनाने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास...
कचारगडला `अ’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा...गोंदिया ः कचारगड हे देशभरातील भाविकांचे...