agriculture news in marathi, ethanol supply will increase by 71 percent | Agrowon

देशात इथेनॉल पुरवठा ७१ टक्क्यांनी वाढणार
वृत्तसेवा
शनिवार, 9 डिसेंबर 2017

नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये केल्या जाणाऱ्या इथेनॉल मिश्रणाच्या पुरवठ्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ७१ टक्क्यांनी वाढ होणार अाहे. तेल कंपन्यांनाकडून यासाठी तब्बल ११३ कोटी लिटर इथेनाॅलची मागणी राहील. यामुळे साखर कारखान्यांना २०१७-१८ मध्ये चार हजार ५०० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. परिणामी कारखान्यांचे अार्थिक उत्पन्न वाढणार असून, थकबाकीसह इतर बिले देण्यास मदत होणार अाहे, अशी माहिती भारतीय साखर कारखानदार संघटनेने (इस्मा) गुरुवारी (ता. ७) दिली.

नवी दिल्ली : पेट्रोलमध्ये केल्या जाणाऱ्या इथेनॉल मिश्रणाच्या पुरवठ्यात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ७१ टक्क्यांनी वाढ होणार अाहे. तेल कंपन्यांनाकडून यासाठी तब्बल ११३ कोटी लिटर इथेनाॅलची मागणी राहील. यामुळे साखर कारखान्यांना २०१७-१८ मध्ये चार हजार ५०० कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. परिणामी कारखान्यांचे अार्थिक उत्पन्न वाढणार असून, थकबाकीसह इतर बिले देण्यास मदत होणार अाहे, अशी माहिती भारतीय साखर कारखानदार संघटनेने (इस्मा) गुरुवारी (ता. ७) दिली.

इथेनॉलच्या दरात ५ टक्क्यांनी सुधारणा झाली अाहे. त्यात यंदा उसाची उपलब्धतता अधिक राहिल्याने मोलॅसिस उत्पादनात वाढ होणार अाहे. परिणामी, मोलॅसिसपासून तयार होणाऱ्या इथेनॉलच्या निर्मितीला चालना मिळाली अाहे. यंदाच्या वर्षात इथेनॉल खरेदीसाठी तेल कंपन्यांनी निविदा मागविल्या होत्या. त्यानंतर साखर कारखान्यांनी १५५ कोटी लिटर इथेनॉल विक्रीसाठी निविदा सादर केल्या होत्या. त्यात ११३ कोटी लिटर इथेनॉलपुरवठा करण्यावर शिक्कामोर्तब झाले, असे ‘इस्मा’ने नमूद केले अाहे.

पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्यासाठी तेल कंपन्यांकडून त्याची खरेदी केली जाते. गेल्या वर्षी २०१६-१७ मध्ये (डिसेंबर ते नोव्हेंबर) तेल कंपन्यांनी ६६ कोटी लिटर इथेनॉलची खरेदी केली होती. त्याअाधीच्या वर्षी (२०१५-१६) १११ कोटी लिटर इथेनाॅल खरेदी करण्यात अाली होती. अाता यंदा त्यात अाणखी वाढ होणार अाहे.

११३ कोटी लिटर इथेनॉलच्या खरेदीचा दर प्रतिलिटर सरासरी ४०.८५ रुपये निश्चित केला अाहे. यामुळे कारखान्यांना ४,५०० कोटी रुपये मिळणार अाहे. पहिल्या टप्प्यात अधिक इथेनॉलपुरवठा होणार अाहे. अाता दुसऱ्या टप्प्यातील निविदा प्रक्रियेत अाणखी इथेनॉल पुरवण्याची संधी कारखान्यांना मिळेल, अशी अपेक्षा ‘इस्मा’ने व्यक्त केली अाहे.

महाराष्ट्राला संधी
उत्तर प्रदेशातील कारखान्यांकडून सर्वाधिक ४४.३ कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा होणार अाहे. त्यापाठोपाठ ४०.३ कोटी लिटर इथेनॉल महाराष्ट्रातील कारखाने पुरविणार अाहेत. यंदाच्या हंगामात उत्तर प्रदेशात पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करण्याचे प्रमाण ९.६ टक्के, महाराष्ट्रात ८.६ टक्के अाणि बिहारमध्ये ७ टक्के एवढे अाहे. यंदा ऊस उत्पादन चांगले राहण्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील कारखान्यांना चांगली संधी राहील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

अशी आहेत कारणे

  •  गेल्या वर्षाच्या तुलनेत इथेनॉल खरेदी दरात ५ टक्क्यांनी वाढ
  •  प्रमुख राज्यांमध्ये यंदा ऊस उपलब्धतेचे प्रमाण चांगले

इतर अॅग्रो विशेष
आरोग्यदायी आहार हेच हवे लक्ष्य!पहिले आणि दुसरे महायुद्ध संपले, यामध्ये...
तापलेलं ‘दूध’अनिश्‍चित अशा शेतीला शाश्वत मिळकतीची जोड म्हणून...
खडकवासला, कलमोडी धरण भरलेपुणे  : जिल्ह्याच्या बहुतांशी भागात पावसाने...
दुधाचा भडका; सरकारची कोंडी पुणे  : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या...
दुधाचे टँकर बंदोबस्तात मुंबईकडे रवानानाशिक : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या...
कोकण, मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भात...पुणे: कोकण, मध्य महाराष्ट्राला सोमवारी (ता. १६)...
दूध आंदोलनाचे विधिमंडळातही पडसादनागपूर: दुधाला लिटरमागे प्रतिलिटर पाच रुपये...
बाजारपेठ ओळखून केळी बागेचे आदर्श नियोजनकठोरा (ता. जि. जळगाव) येथील पांडुरंग मोहन पाटील व...
एकात्मीक शेतीतून खुल्या झाल्या...आत्महत्याग्रस्त अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिह्यातील...
दूधदर प्रश्नी विधिमंडळ दणाणले; सभेत...नागपूर : राज्यात सुरु असलेल्या दूध दर आंदोलनाचे...
दूध आंदोलन तापले, बहुतांश जिल्ह्यात...पुणे : शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट पाच रुपये...
कोल्हापूरात दूध संकलन १०० टक्के बंद ! कोल्हापूर- गायीच्या दूधाला प्रतिलिटर पाच...
आंतरराष्ट्रीय सुबाभूळ परिषदेच्या...पोषण हा पशुपालनातील सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे....
चिंब झाली रान माती...कमी पाऊसमानानंतर उद्भवणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी...
आंदोलन होणारचकोल्हापूर/ पुणे : अनेक दूध संघ अगोदरच गायीच्या...
काेकण, विदर्भात तुरळक ठिकाणी...पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र...
साखर कारखान्यांकडे १२ हजार कोटींची...लखनौ ः उत्तर प्रदेशात २०१७-१८ च्या हंगामात...
संघांकडून दूध दरात तीन रुपयांची वाढपुणे ः दूध दरावर ताेडगा काढण्यासाठी राज्य सरकारने...
पीककर्ज वितरण केवळ ३० टक्केचपुणे : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपात दिरंगाई...
सेंद्रिय भातशेतीसोबतच राबविली थेट...पुणे जिल्ह्यातील भोयरे (ता. मावळ) येथील रोहिदास...