agriculture news in marathi, Every MP should see the Developmental work done in Baramati : VP V Naidu | Agrowon

बारामतीतील विकासाचे काम देशातील प्रत्येक खासदाराने पहावे : नायडू
सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

बारामती : ग्रामीण विकासाच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनाला आकार देण्याचे काम बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. दिल्लीत गेल्यानंतर सर्व खासदारांनी एकदा तरी बारामतीला भेट देऊन येथे सुरु असलेले ग्रामीण विकासाचे काम पाहावे असे आपण सांगणार आहोत, असे कौतुकाचे उद्‌गार उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी काढले.

बारामती भेटीनंतर विद्या प्रतिष्ठान येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, पालकमंत्री गिरीश बापट, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यासमवेत उपस्थित होते. 

बारामती : ग्रामीण विकासाच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जीवनाला आकार देण्याचे काम बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले. दिल्लीत गेल्यानंतर सर्व खासदारांनी एकदा तरी बारामतीला भेट देऊन येथे सुरु असलेले ग्रामीण विकासाचे काम पाहावे असे आपण सांगणार आहोत, असे कौतुकाचे उद्‌गार उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी काढले.

बारामती भेटीनंतर विद्या प्रतिष्ठान येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, पालकमंत्री गिरीश बापट, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्यासमवेत उपस्थित होते. 

बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र रोल मॉडेल... 
बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र हे देशातील इतर कृषी विज्ञान केंद्रासाठी रोल मॉडेल आहे असे सांगत नायडू म्हणाले, बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतक-यांसाठी सुरु असलेले काम उल्लेखनीय असून देशातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांनी याचा आदर्श घ्यायला हवा. प्रयोगशाळेतून शेतक-यांच्या शिवारापर्यंत संशोधन पोहोचवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतक-यांचा सर्वांगिण विकास साधण्याचे हे काम पाहून आपण प्रभावित झालो आहोत. कृषी तसेच शिक्षणाच्या बाबतीत बारामतीचा जो विकास झाला तो पाहून मला समाधान वाटले. 

जग वेगाने बदलते आहे त्या मुळे कृषी क्षेत्रातही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे होणे गरजेचे आहे. संशोधनासोबतच सुरु असलेले पूरक कामही उपयुक्त असून त्याचा फायदा सर्वांना होतो आहे हे समाधानाचे आहे. मला स्वतःला शेतीची पार्श्वभूमी असून बारामती पाहून मी प्रभावित व समाधानी आहे हे त्यांनी आवर्जून नमूद केले. 

संशोधन पुरेसे नाही. 
कृषी क्षेत्रात देशाने मोठ्या प्रमाणावर संशोधन केले असले तरी जगाचा वेग पाहता ते पुरेसे नाही, ग्रामीण भागातील लोकांनाही विकासाची फळे चाखता यावीत असे नेहमी वाटत असते. नैसर्गिक संकट, मान्सूनचा लहरीपणा व बाजारपेठेचे संकट आणि वाढती स्पर्धा या मुळे अशा कृषी विज्ञान केंद्रांची अधिक गरज आहे, असे नायडू म्हणाले. स्व.अप्पासाहेब पवार व राजेंद्र पवार यांचाही या योगदानाबद्दल उल्लेख करुन त्यांनी या कामगिरीबद्दल त्यांचेही कौतुक केले. 

बारामती विमानतळावर उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते व बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी स्वागत केले. 

इतर ताज्या घडामोडी
सावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर ! कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...
परभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...
भातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...
कमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...
ढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...
माळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...
परभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली  ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...
धुळे, जळगाव जिल्ह्यांतील पैसेवारी चुकीचीजळगाव   ः धुळे व जळगाव जिल्ह्यांत हवा तसा...
नैसर्गिक आपत्तीत यवतमाळमधील ६२ हजार...यवतमाळ   ः जिल्ह्यात या वर्षी आलेल्या...
पुणे जिल्‍ह्यात पावसाच्या हलक्या ते...पुणे : पावसाच्या मोठ्या खंडानंतर जिल्ह्याच्या...
नगर जिल्ह्यावर दुष्काळाचे सावटनगर  ः जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी फक्त ६५.५५...
बुलडाणा येथे २ आॅक्टोबरला सोयाबीन-कापूस...बुलडाणा   : पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादक...
उसाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ‘आंदोलन...कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता मिळावा व १५ टक्के...
कोल्हापूर येथे १० ऑक्‍टोबरला ऊस परिषद...कोल्हापूर  : सरकारने एफआरपीचे तुकडे करून...
बंद अवस्थेतील कारखाने सहकारी तत्त्वावर...जळगाव : जिल्ह्यात काही साखर कारखाने एकेकाळी जोमात...
कांदा - लसूण पीक सल्लाबहुतांश शेतकऱ्यांच्या शेतामध्ये खरीप कांदा पिकाची...
नांदेड जिल्ह्यात ५१० कोटी रुपये पीक...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण...जळगाव : जळगाव आणि धुळे जिल्ह्यांतून जाणाऱ्या...
अंजनीसह पाच गावांची पाण्याविना आबाळसांगली ः तासगाव तालुक्‍याचा पूर्वभागात भीषण...