agriculture news in marathi, Ex MLa Kundalikrao Nagare passes away | Agrowon

माजी आमदार कुंडलिकराव नागरे यांचे निधन
टीम अॅग्रोवन
रविवार, 4 मार्च 2018

जिंतूर, जि.परभणी : जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार तथा परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष कुंडलिकराव भगवानराव नागरे (वय ६६) यांचे रविवारी (ता.४) दुपारी दीडच्या सुमारास मुंबई येथे निधन झाले.

जिंतूर, जि.परभणी : जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार तथा परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान अध्यक्ष कुंडलिकराव भगवानराव नागरे (वय ६६) यांचे रविवारी (ता.४) दुपारी दीडच्या सुमारास मुंबई येथे निधन झाले.

सावळी बु. (ता.जिंतूर) येथील मूळ रहिवाशी असलेल्या नागरे यांनी १९९९ ते २००४ या कालावधीत जिंतूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. आमदार असतांना औरंगाबाद विभागीय म्हाडाचे सभापती होते. त्यांनी म्हाडाची घरकुल योजना ग्रामीण भागात राबविली. त्यांच्या प्रयत्नातून जिंतूर येते दूध शीतकरण केंद्र सुरु करण्यात आले. २१ मे २०१५ पासून आजपर्यंत परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे ते अध्यक्ष होते.

पंधरा दिवसापूर्वी त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने मुंबई येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तीन दिवसापूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. रविवारी (ता.४) दुपारी त्यांची प्रणज्योत मालवली. यावेळी त्यांच्या पत्नी शोभाताई, सुरेश, बालाजी ही दोन मुले, बहिण मुक्ताबाई आंधळे, अन्य नातेवाईक उपस्थित होते. सोमवारी (ता.५) दुपारी १.३० वाजता येलदरी (ता.जिंतूर) येथील फार्म हाऊसच्या प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

इतर ताज्या घडामोडी
अकोल्याला रब्बीसाठी हरभऱ्याचे वाढीव...अकोला  ः जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी...
दुष्काळाची व्यथा मांडताना महिला...निल्लोड, जि. औरंगाबाद : विहिरींनी तळ गाठला, मक्‍...
कोल्हापूर जिल्ह्यात खरीप पिकांच्या...कोल्हापूर  : खरीप पिकांची काढणी वेगात...
सोलापुरातील अडचणीतील शेतकऱ्यांसाठी आश्‍...सोलापूर  ः सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची...
नगरमधील ४३३८ शेतकऱ्यांची शेतीमाल...नगर  ः आधारभूत किमतीने मूग, उडीद, सोयाबीनची...
जळगाव जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणीला...जळगाव : जिल्ह्यात रब्बीतील ज्वारी पेरणीकडे...
ढगाळ वातावरणामध्ये द्राक्ष पिकात...सांगली, मिरज व सोलापूर येथील काही भागांमध्ये हलके...
हुमणी अळीचे एकात्मिक व्यवस्थापनगेल्या काही वर्षांपासून राज्याच्या विविध...
पुणे जिल्ह्यात रब्बीसाठी १९ हजार...पुणे : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामाची तयारी सुरू...
सोलापूर जिल्हा बॅंकेकडून ७० हजार...सोलापूर  : सोलापूर जिल्हा बॅंकेच्या सव्वा...
सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू होईनातसातारा : जिल्ह्यात खरिप पिकांची काढणी अंतिम...
भाजीपाला सल्लासध्याच्या काळात बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन...
कृषी सल्ला : ऊस, कापूस, तूर, गहू, हरभरा...ज्या ठिकाणी पाण्याचा ताण बसत आहे, त्या ठिकाणी...
हाताचा नाकाशी होणाऱ्या संपर्कातूनही...न्यूमोनियाकारक जिवाणू हा नाकाला हात लावणे,...
खानदेशात खरिपातील ज्वारीची आवक सुरुजळगाव : खानदेशात अनेक भागांत ज्वारीची मळणी जवळपास...
परभणी जिल्ह्यात मुगाची उत्पादकता एकरी १...परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मुगाची सरासरी...
पुणे जिल्ह्यात चाराटंचाईपुणे   ः पुणे जिल्ह्यातील पूर्व पट्ट्यात...
नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची...नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा...
‘महसूल’च्या जागेवर चाऱ्याच्या...यवतमाळ  ः पांढरकवडा व राळेगाव तालुक्‍यांतील...
सातारा जिल्ह्यात ७७३ एकरांवर तुती लागवडसातारा  ः जिल्ह्यात रेशीम शेती करण्याकडे...