अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनक

अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनक
अटलबिहारी वाजपेयींची प्रकृती चिंताजनक

नवी दिल्ली : गेल्या दोन महिन्यांपासून एम्स रुग्णालयात दाखल असलेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची बुधवारी (ता.१५) प्रकृती अधिकच खालावल्याने देशभर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील अन्य काही मंत्र्यांनीही 'एम्स'ला भेट दिली. आज (ता.१६) सकाळी १०.३० वा. 'एम्स'तर्फे अधिकृत स्पष्टीकरण करण्यात येणार आहे. वाजपेयी गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी आहेत. ११ जून २०१८ रोजी वाजपेयी यांना 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आले होते.  गेल्या दोन दिवसांपासून त्यांना 'लाईफ सपोर्ट'वर ठेवण्यात आले आहे. 'एम्स'तर्फे वाजपेयी यांच्या प्रकृतीबद्दल अधिकृत माहितीपत्रक बुधवारी रात्री प्रसिद्ध करण्यात आले. गेल्या २४ तासांत त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याचे त्यात म्हटले  होते. 

वाजपेयी यांच्या प्रकृतीची माहिती समजल्यानंतर सायंकाळी ७.१५ च्या सुमारास पंतप्रधान मोदी 'एम्स'मध्ये आले. जवळपास ५० मिनिटे मोदी 'एम्स'मध्ये होते. गेल्या दोन महिन्यांत मोदी यांनी चार वेळा 'एम्स'मध्ये वाजपेयी यांची भेट घेतली आहे.

तत्पूर्वी, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही वाजपेयी यांच्या प्रकृतीची चौकशी केली. 

किडनीला झालेल्या संसर्गामुळे ११ जून रोजी वाजयेपी यांना 'एम्स'मध्ये दाखल करण्यात आले होते. यापूर्वी २००९ मध्ये वाजपेयी यांना हृदयविकाराचा झटका आला होता. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com