agriculture news in marathi, Ex state minister on fast in well | Agrowon

माजी राज्यमंत्र्यांचे विहिरीत आंदोलन
सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 जानेवारी 2018

अकोला : बुलडाणा जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांमधील भ्रष्टाचारप्रकरणी सातत्याने पाठपुरावा करणारे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी गुरुवारी (ता. १८) विहिरीत अांदोलन सुरू केले. बुलडाणा येथे बुधवारी (ता. १७) घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या अांदोलनाची घोषणा केली होती.     

अकोला : बुलडाणा जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांमधील भ्रष्टाचारप्रकरणी सातत्याने पाठपुरावा करणारे माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी गुरुवारी (ता. १८) विहिरीत अांदोलन सुरू केले. बुलडाणा येथे बुधवारी (ता. १७) घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी या अांदोलनाची घोषणा केली होती.     

जिल्ह्यातील सर्वच गावांतील शासकीय पाणीपुरवठा योजनांच्या कामात भ्रष्टाचार, अनियमितता झाल्याचा सावजी यांचा अारोप आहे. कामांमध्ये अनियमितता झाल्याने बहुतांश गावांमध्ये नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते अाहे. प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींच्या संगनमतामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाई तयार झाली असल्याचे सावजी यांचे म्हणणे अाहे. सुबोध सावजी हे प्रत्येक गावात जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधून पाणीपुरवठा नळ योजना, रस्ते, एसटी बस, दिवाबत्तीची माहिती घेऊन शासकीय नळ योजनेत झालेल्या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा करीत अाहेत. 

याप्रकरणी सावजी यांनी अाक्रमक अांदोलनाची घोषणा करीत मेहकर तालुक्यातील बोरी गावात शासकीय विहिरीत उतरून उपोषण सुरू केले. सावजी यांनी अांदोलन जाहीर केल्यानंतर प्रशासकीय यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली. जिल्हा प्रशासनाकडून या अांदोलनाबाबत दखल घेत सावजी यांची मनधरणी करण्यात अाली. मात्र सावजी अापल्या निर्णयावर ठाम राहिले. सायंकाळी ते बोरी गावातील विहिरीत उतरले. यावेळी शेकडोंचा जमाव जमा झाला होता. या अांदोलनामुळे प्रशासन हादरले अाहे.

इतर ताज्या घडामोडी
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कृषी सल्ला : भात, भुईमुग, आंबा,...भात ः सध्या रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू...
द्राक्ष बागेत रोगांच्या प्रादुर्भावाची... सर्व द्राक्ष विभागांमध्ये...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...
जळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाई होतेय भीषणजळगाव  ः जिल्ह्यातील पश्‍चिम पट्ट्यात...