agriculture news in marathi, Ex Vice Chancellors creates a forum to guide Universities and Govt | Agrowon

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी माजी कुलगुरू आले एकत्र
विजय सुकळकर
सोमवार, 29 जानेवारी 2018

- केली स्वतंत्र व्यासपीठाची निर्मिती
- कृषी शिक्षण, शासनाला करणार मार्गदर्शन

पुणे : राज्यामध्ये कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्य खोळंबले आहे. त्याचा फटका शेतकरी तसेच कृषी विद्यार्थ्यांना बसतो आहे. हवामान बदलांची आव्हाने पेलण्यास शेतकरी असमर्थ ठरत असताना संशोधनातून उपायसुद्धा मिळत नाहीत. त्यामुळे राज्यातील शेती आणि शेतकरी संकटात आहे. संकटातील शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांच्या माजी कुलगुरूंनी नुकतेच एका माजी कुलगुरू व्यासपीठाची (फोरम) स्थापना केली आहे. 

- केली स्वतंत्र व्यासपीठाची निर्मिती
- कृषी शिक्षण, शासनाला करणार मार्गदर्शन

पुणे : राज्यामध्ये कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्य खोळंबले आहे. त्याचा फटका शेतकरी तसेच कृषी विद्यार्थ्यांना बसतो आहे. हवामान बदलांची आव्हाने पेलण्यास शेतकरी असमर्थ ठरत असताना संशोधनातून उपायसुद्धा मिळत नाहीत. त्यामुळे राज्यातील शेती आणि शेतकरी संकटात आहे. संकटातील शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांच्या माजी कुलगुरूंनी नुकतेच एका माजी कुलगुरू व्यासपीठाची (फोरम) स्थापना केली आहे. 

या माजी कुलगुररूंचे कृषी शिक्षण, संशोधन आणि विस्तार शिक्षण क्षेत्रात योगदान राहिले आहे. त्यांच्या ज्ञान आणि अनुभवाचा शेतकरी तसेच एकंदरीतच ग्रामीण समाजाला एक महत्त्वपूर्ण स्रोत म्हणून उपयोग व्हावा, हा या व्यासपीठ स्थापनेमागचा मुख्य हेतू आहे, असे समन्वयक डॉ. योगेंद्र नेरकर यांनी सांगितले. या व्यासपीठामुळे राज्यातील कृषी विद्यापीठे, शासनाचे कृषी व तत्सम विभाग, कृषी संबंधित सार्वजनिक व खासगी विभाग आणि शेतकरी यांच्या कार्यात निश्चित मदत होऊ शकेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

माजी कुलगुरू डॉ. आर. बी. देशमुख, डॉ. एस. एस. मगर, डॉ. टी. ए. मोरे, डॉ. व्ही. एम. मायंदे, डॉ. व्ही. एम. पवार, डॉ. के. ई. लवांडे आणि डॉ. एस. एस. कदम हे नुकतेच (ता. १६) या निमित्ताने फलोद्यानशास्त्र महाविद्यालय, कृषी महाविद्यालय पुणे येथे एकत्र आले होते. माजी कुलगुरू डॉ. सी. डी. मायी, डॉ. एस. एन. पुरी, डॉ. के. पी. गोरे, डॉ. जी. एम. भराड व डॉ. बी. व्ही. मेहता यांनीसुद्धा सदर फोरममध्ये सहभागी होण्याचे डॉ. नेरकर यांना कळविले आहे.

प्रतिक्रिया..
कृषी क्षेत्रातील समस्यांचा विशेषतः कृषी शिक्षण व संशोधन क्षेत्रातील विकासाच्या दृष्टीने ऊहापोह करून संबंधित संस्था तसेच शासनाला योग्य दिशेने मार्गदर्शन करून त्यातून शेतीचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांची भरभराट व्हावी, असा आमचा या व्यासपिठाच्या माध्यमातून प्रयत्न असेल.
- डॉ. योगेंद्र नेरकर,
माजी कुलगुरू,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

‘‘राज्यातील शेतकरी आणि कृषीचे विद्यार्थी समस्याग्रस्त असताना संगठनच्या माध्यमातून एका थिंक टॅंकद्वारे उपाय मिळू शकतात. एकट्या दुकट्याने आवाज उठविण्यापेक्षा एकत्रित आल्याने आम्ही मांडलेल्या भूमिकेस अधिष्ठानही लाभेल.’’
-डॉ. के. ई. लवांडे 
माजी कुलगुरू,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

 

इतर अॅग्रो विशेष
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
सीताफळाच्या योग्य जातींची करा लागवडमहाराष्ट्रात सीताफळाच्या झाडांचे काही नैसर्गिक...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
केसर आंबा पाडाला आलाय...औरंगाबाद : आपली चव, गंध आणि रूपाने ग्राहकांना...
बदल्या समुपदेशनानेच...पुणे : राज्याच्या कृषी विभागात समुपदेशनाने बदल्या...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
बारमाही भाजीपाला शेतीला नर्सरी...ब्राह्मणगाव (जि. नाशिक) येथील केवळ वाघ पूर्वी...
सुधारित तंत्राची मिळाली गुरुकिल्लीअकोला जिल्ह्याचे मुख्य उन्हाळी पीक कांद्याची...
भाराभर चिंध्या राज्यात १२७ वा पशुसंवर्धन दिन नुकताच साजरा...
मथुरेचं दूध का नासलं?राज्यात मे महिन्याचे तापमान यंदा नैसर्गिक आणि...
चिमुरड्याच्या कॅमेऱ्यात कैद आनंदी शेतकरीआपल्याकडील शेतकरी आनंदी असू शकतो का? उत्तर...
‘अ’तंत्र निकेतनपुरेसा अभ्यास आणि तयारीअभावी, यंत्रणेचा विरोध...