agriculture news in marathi, except Mustrad Cabinet approves Export of all edible oils in bulk | Agrowon

खाद्यतेल निर्यात मर्यादा उठविली
वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

नवी दिल्ली : मोहरीवगळता खाद्यतेलावरील निर्यात मर्यादा पूर्णत: उठविण्याचा निर्णय बुधवारी (ता. २९) केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. देशातील शेतकरी आणि खाद्यतेल उद्योगाला या निर्णयाने प्रोत्साहन मिळेल, असे केंद्र सरकारने म्हटले अाहे.  या निर्णयाने विविध खाद्यतेल उत्पादनास चालना मिळून शेतकऱ्यांना सोयाबीन वगळता इतर पिकांचाही पर्याय समोर येण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान अध्यक्ष असलेल्या केंद्रीय अर्थविषयकमंत्री समिती(सीसीईए)च्या बैठकीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या मोहरी वगळता खाद्यतेलावरील निर्यातबंदी उठविण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. 

नवी दिल्ली : मोहरीवगळता खाद्यतेलावरील निर्यात मर्यादा पूर्णत: उठविण्याचा निर्णय बुधवारी (ता. २९) केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. देशातील शेतकरी आणि खाद्यतेल उद्योगाला या निर्णयाने प्रोत्साहन मिळेल, असे केंद्र सरकारने म्हटले अाहे.  या निर्णयाने विविध खाद्यतेल उत्पादनास चालना मिळून शेतकऱ्यांना सोयाबीन वगळता इतर पिकांचाही पर्याय समोर येण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान अध्यक्ष असलेल्या केंद्रीय अर्थविषयकमंत्री समिती(सीसीईए)च्या बैठकीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या मोहरी वगळता खाद्यतेलावरील निर्यातबंदी उठविण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. 

यापूर्वी खाद्यतेलास केवळ पाच किलोच्या ब्रॅन्डेड पॅकिंगमध्ये खाद्यतेल निर्यातीस परवानगी होती, मात्र नव्या निर्णयामुळे घाऊक पद्धतीने खाद्यतेल निर्यात होण्यास प्रारंभ होणार आहे. मोहरीकरिता मात्र, पूर्वीचाच पाच किलो पॅकिंगचा निर्णय कायम राहणार असून, याकरिता ९०० रुपये प्रतिटन किमान निर्यात मूल्य असणार आहे. या निर्णयाने मोहरी, सोयाबीन वगळता इतर शेंगदाणा, सूर्यफूल, करडई आदी तेलांना निर्यातील घाऊक संधी मिळणार आहे. तसेच या तेलबिया उत्पादनाकडे शेतकरी पूर्वीप्रमाणे वळण्याची शक्यता आहे. 

सीसीइएने या बैठकीत खाद्यतेलासंदर्भातील आयात-निर्याती आढावा समितीच्या बळकटीकरणासह मान्यता दिली आहे. या समितीकडे सर्व प्रकारच्या खाद्यतेलाच्या आयात-निर्यात धोरणांचा नियमित आढावा आणि आवश्‍यक कार्यवाही करण्यासंदर्भात शिफारसी करण्याची जबाबदारी आहे. यात परिणामकारक निर्बंध, आगाऊ नोंदणी, किमान आयात मूल्य (एमईपी)ची अंमलबजावणी, देशांतर्गत खाद्यतेलांची मागणी अाणि पुरवठ्यानुसार आयात शुल्कात बदल करणे, खाद्यतेलांच्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत दर, व्यापार अभ्यास करणे आदींचा आढावा ही समिती घेणार आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव असून, यात केंद्रीय वाणिज्य मंत्रालय, कृषी मंत्रालय, महसूल अाणि ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे सचिव, तसेच विदेश व्यापारचे महासंचालक हे सदस्य आहेत.  

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या दुसऱ्या सुधारित अंदाजानुसार यंदा देशात २०१७-१८ यावर्षा २९.८८ दशलक्ष टन तेलबियांचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षी हेच उथ्पादन ३१.२८ दशलक्ष टन होते.

निर्यातबंदी उठविण्याच्या निणर्याबाबत बोलताना राज्य कृषी मूल्य अायोगाचे अध्यक्ष पाशा पटेल म्हणाले, की तीळ, शेंगदाणा, करडई, सूर्यफूल तेलास निर्यातीची दारे पुन्हा खुली झाली आहे. परदेशातील भारतीयांसह विविध देशांत भारतातील विविध खाद्यतेलांची मागणी आहे. परदेशातील गुजराथी समुदयाकडून तिळाचे तेल, तर आखातात शेंगदाणा तेलाची मागणी आहे. गेल्या दशकापासूनच्या अधिक काळ या निर्बंधांमुळे निर्यातीवर मर्यादा आली होती, अखेर केंद्र सरकारने हा समाधानकारक निर्णय घेतला. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. आम्हीही पंतप्रधानांकडे यासंदर्भात मागणी नोंदविली होती. शेंगदाणा, करडई, सूर्यफूल, तीळ ही कधीकाळी प्रमुख तेलबिया पिके जवळपास संपुष्टात आली होती. या पिकांना निर्यात संधी मिळाल्यास शेतकऱ्यांकरिता सोयाबीन वगळता पर्यायी तेलबिया पिके मिळण्याची शक्यता आहे. अर्थात व्यापार आणि उद्योग जगत या संधीकडे कसे पाहते, हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल. 

इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात रब्बीची केवळ १९ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यात यंदा दुष्काळाची छाया किती...
केळीच्या आगारातून आखातात जाणार ४००...जळगाव ः केळीचे आगार असलेल्या जळगाव जिल्ह्यातून...
महाकॉट ब्रॅण्डची चमक पडली फिकीजळगाव ः पूर्व विदर्भ, उत्तर मराठवाडा व खानदेशातील...
शेतीला मिळाली पूरक उद्योगाची साथअंबाणी (जि. सातारा) येथील सौ. सुरेखा पांडुरंग...
दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात आज...पुणे : दक्षिण भारतामध्ये असलेल्या ‘गज’...
अभ्यास अन् नियोजनातून शेती देते समाधाननाशिक शहरातील प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध...
‘सीसीआय’ची कापूस खरेदी मंगळवारपासून...जळगाव : कापूस खरेदीसंबंधी जिनिंगमध्ये केंद्र...
दुष्काळ, मराठा आरक्षण अधिवेशनात गाजणारमुंबई : उद्यापासून (ता. १९) मुंबईत सुरू होत...
शेतकऱ्यांच्या विधवांचे २१ला मुंबईत...मुंबई : देशभरात विविध शेतकऱ्यांचे मोर्चे...
बा सरकार, प्रश्न जगण्याचा आहे!‘‘ज रा कुठे दुष्काळ पडला, गारपीट झाली,  पूर...
विना `सहकार` नाही उद्धारग्रामीण आणि शहरी भागांचा संतुलित विकास साधत...
राज्यातील धरणांमध्ये ५५ टक्के पाणीसाठापुणे   : राज्यात पाणीटंचाईची तीव्रता वाढू...
महाबळेश्र्वरमध्ये ३५०० एकरांवर...सातारा  ः महाबळेश्वरसह वाई, जावली, कोरेगाव...
दुष्काळात तीन श्रेणींत कामांचे नियोजन...पुणे : राज्यात आलेल्या दुष्काळात मदतीचा...
ओडिशात भाडोत्री ट्रॅक्टर योजनेस प्रारंभभुवनेश्‍वर ः राज्यातील शेतकऱ्यांना अद्ययावत...
सोयाबीन वधारण्याची चिन्हेपुणे: राज्यात सध्या सोयाबीनचे दर गडगडले असले...
राज्याच्या दक्षिण भागात पावसाची शक्यतापुणे : राज्यात थंडी वाढण्यास सुरुवात झाली आहे....
कापूस खरेदीला आजपासून प्रारंभनागपूर : पणन महासंघाव्दारे कापूस खरेदीला आजपासून...
चारा लागवडीसाठी शासकीय जमिनी देणारमुंबई : राज्यावरील दुष्काळाचे संकट लक्षात...
दुष्काळात २५ एकरांत शेवगा, रंगबिरंगी...मुंबई येथील ‘कोचिंग क्लास’चा व्यवसाय असलेले तपन...