agriculture news in Marathi, excessive expenditure on Agriculture Minister cars, Maharashtra | Agrowon

कृषिमंत्र्यांवर गाड्यांची खैरात
सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

मुंबई ः शासकीय परिवहन सेवेतील वाहन ताफा रद्द करून मंत्री व राज्यमंत्र्यांच्या कामकाजाकरिता सरकारकडून प्रत्येकी एक वाहन उपलब्ध करून दिले जाते; मात्र राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर अतिरिक्त २, तर राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अतिरिक्त १ वाहन वापरत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली. 

मुंबई ः शासकीय परिवहन सेवेतील वाहन ताफा रद्द करून मंत्री व राज्यमंत्र्यांच्या कामकाजाकरिता सरकारकडून प्रत्येकी एक वाहन उपलब्ध करून दिले जाते; मात्र राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर अतिरिक्त २, तर राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी अतिरिक्त १ वाहन वापरत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली. 

गलगली यांना महाराष्ट्र कृषिउद्योग विकास महामंडळाने ही माहिती दिली. माजी कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत मंत्र्यांचे खासगी सचिव आणि कृषी खात्याचे प्रधान सचिव यांनीही वाहत्या गंगेत हात धुतल्याचा आरोप गलगली यांनी केला. महाराष्ट्र कृषिउद्योग विकास महामंडळातर्फे अनिल गलगली यांना दिलेल्या माहितीत फुंडकर यांना २ गाड्या व ३ चालक दिले असून, तिन्ही चालक कंत्राट पद्धतीवर आहेत. सदाभाऊ खोत यांना एक गाडी दिली असून, दोन्ही ड्रायव्हर कंत्राट पद्धतीवर आहेत.

कृषी खात्याचे प्रधान सचिव बिजयकुमार आणि कृषी मंत्र्यांचे खासगी सचिव धुरजड यांना प्रत्येकी एक गाडी दिली असून, चालक महामंडळाचा स्थायी कर्मचारी आहेत. माजी कृषिमंत्री आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी स्वतःची असून, चालक मात्र महामंडळाचा स्थायी कर्मचारी 
होता.

फुंडकर आणि खोत या दोघांसाठी प्रत्येकी १९ लाख ९९ हजार ९९९ इतक्‍या रक्कमेची नवीन गाडी पुरविण्यात आली आहे. २६ डिसेंबर २००५च्या शासन निर्णयान्वये शासकीय परिवहन सेवेतील मंत्री वाहन ताफा रद्द करून या वाहन ताफ्यातील मंत्र्यांना त्यांच्या कामकाजाकरिता प्रत्येकी एक प्रमाणे वाहन उपलब्ध करून देण्यात येते. शासननिर्णय स्पष्ट असून, फुंडकर आणि खोत एकापेक्षा अधिक वाहने वापरत आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत अनिल गलगली यांनी केला.

गाडीवरचा खर्च लाखांत
फुंडकर यांना दिलेल्या दोन गाड्यांचा इंधन, सर्व्हिस आणि दुरुस्ती खर्च यावर सात महिन्यांत  २५ लाख २५ हजार ८०९ रुपये, तर खोत यांच्यासाठी नवी गाडी विकत घेत महामंडळाने गाडीची किंमत, इंधन, दुरुस्ती खर्चावर २६ लाख ५० हजार २७८ इतकी रक्कम सात महिन्यांत खर्च केली आहे. प्रधान सचिव बिजयकुमार यांना दिलेल्या गाडीचे इंधन आणि सर्व्हिस शुल्कावर ६६ हजार ३५, तर कृषिमंत्र्यांचे खासगी सचिव धुरजड यांना दिलेल्या गाडीच्या इंधनावर ४७ हजार ५३४ इतकी रक्कम खर्च केली आहे.

इतर ताज्या घडामोडी
विधान परिषदेत शिवसेनेला 'लॉटरी'; कोकणात...मुंबई : विधान परिषदेच्या सहा जागांसाठी झालेल्या...
शेतमालाला भाव न देणारे उत्पन्न दुप्पट...भंडारा : शेतमालाला भाव नसल्याने अधिक...
भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष : रावतेनागपूर : भाजप हा उमेदवार आयात करणारा पक्ष...
कृषी सल्ला : भात, भुईमुग, आंबा,...भात ः सध्या रोपवाटिकेसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू...
द्राक्ष बागेत रोगांच्या प्रादुर्भावाची... सर्व द्राक्ष विभागांमध्ये...
कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्‍यासक्रम...मुंबई : राहुरी येथील महात्मा फुले कृषी...
सातारा जिल्ह्यात आले लागवडीस गतीसातारा  ः उष्णतेत वाढीमुळे रखडलेल्या आले...
शेतकऱ्यांना मिळणार पाच रुपयांत पोटभर...लातूर  : शंभर-दीडशे किलोमीटर अंतरावरून आपला...
रोहित्राच्या बाॅक्समधील फ्यूज तारांच्या...परभणी ः जिल्ह्यातील कृषी पंपाना वीजपुरवठा...
नष्ट होत असलेल्या देशी वाणांचे संवर्धन...पुणे ः हरितक्रांतीच्या नादात अधिक उत्पादनाच्या...
यवतमाळ जिल्ह्यात फळबागांनी टाकल्या मानायवतमाळ  : कडाक्‍याच्या उन्हामुळे...
कागदपत्रांची पूर्तता करूनही लिलाव बंद...मालेगाव, जि. नाशिक  : मालेगाव कृषी उत्पन्‍न...
शेतकऱ्यांना ‘करार शेती’च्या माध्यमातून...नवी दिल्ली : शेतमालाचा बाजार आणि किंमतीतील...
सोलापूर बाजार समितीत ३९ कोटींचा...सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
साताऱ्यात गवार २०० ते ३०० रुपये दहाकिलोसातारा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
देशात सर्वांत महाग पेट्रोल धर्माबादला,...नांदेड : नांदेड जिल्ह्याच्या तेलंगणा व...
पेरूबागेसाठी सघन लागवडीचे तंत्रपेरू बागेमध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी सघन...
जळगाव बाजार समितीकडून आवाराबाहेर...जळगाव : फळे-भाजीपाला नियमनमुक्तीनंतर बाजार समिती...
जीएम ई. कोलाय जैवइंधननिर्मितीसाठी...जैवइंधनाच्या निर्मितीसाठी जनुकीय तंत्रज्ञानाने...
पुणे विभागात पाणीटंचाई वाढतेयपुणे : वाढत्या उन्हाबरोबरच पुणे विभागातील...