agriculture news in marathi, exibition on millet processing,kolhapur, maharashtra | Agrowon

महिलांनी नाचणीपासून बनवले सत्तरहून अधिक पदार्थ
टीम अॅग्रोवन
शनिवार, 17 नोव्हेंबर 2018

नाचणीचे मूल्यवर्धन करून इतके पदार्थ तयार करण्यात येत असल्याचे ग्रामीण भागातील महिलांनी दाखवून दिले आहे. हा प्रतिसाद नक्कीच सुखावणारा आहे.
- पराग परीट, संयोजक.

कोल्हापूर   : नाचणीची आंबील, नाचणीच्या पुऱ्या, नाचणीची वडी, नाचणीचे शेंगूळ, मोदक, आंबोळी अशा एक नव्हे तर सत्तरहून अधिक पदार्थांची रेलचेल किसरुळ (ता. पन्हाळा) या छोट्या गावात पाहावयास मिळाली. दुर्गम भागातील शेकडो महिलांनी आपल्या पाककलेला मुक्त वाव देताना फक्त नाचणीपासून तयार केलेले पदार्थ थक्क करणारेच होते.
 

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी महाविद्यालय, आखिल भारतीय समन्वित नाचणी व तृणधान्य सुधार प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने नाचणी दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित नाचणीपासून तयार होणाऱ्या पदार्थांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या वेळी विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. जिल्ह्यात खरीप पिकांमध्ये नाचणी हे दुर्गम भागातील हक्काचे पीक आहे. परंतु या पिकाचे मार्केटिंग झाले नसल्याने ते दुर्लक्षित राहिले आहे. केवळ नाचणी विकण्यापेक्षा त्याचे मूल्यवर्धन करून विकल्यास ती फायदेशीर ठरू शकतात हे दर्शविण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या वेळी  किसरुळ गावातील महिलांकडूनच विविध पदार्थ बनवून घेण्यात आले. महाविद्यालयीन युवतीबरोबरच महिलांनींही आपल्या पाककौशल्याचे प्रात्यक्षिक दाखवत तज्ज्ञांना थक्क केले. यामध्ये विशेष करून नाचणीचे लाडू, चकली, आंबिल, उसळ, भाकरी, भजी, बाकरवडी, करंजी मोदक, धपाटे, शंकरपाळी, गुलाबजामून, शेव, चटणी. नाचण्याची पोळी, नाचणीची सुखडी, उकडलेले कानवले, वडी, पापडी मुटकी, कुरवड्या, हलवा, शिरा, आदि सत्तरहून पदार्थ महिलांनी तयार केले.

कृषी विभागाने या पदार्थांच्या मार्केटिंगसाठी प्रयत्न केल्यास नाचणी उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकेल,  असे महिला शेतकरी विमल पाटील यांनी सांगितले.

या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, कृषी उपसंचालक भाग्यश्री फरांदे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. जी. खोत, तालुका कृषी अधिकारी बंडा कुंभार, नाचणी प्रकल्पाचे श्री. निगडे, श्री कराड, सर्जेराव पाटील आदी उपस्थित होते.
 

 

इतर ताज्या घडामोडी
बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’ बियांद्वारे मिळवता येतील भाताचे ‘क्लोन’...
प्रथिनांद्वारे मिळवता येईल अधिक टिकाऊ...निसर्गातील कोळ्याच्या धाग्यापासून प्रेरणा घेत चीन...
ऊसतोडणी कामगारांच्या गावांत दुष्काळी...नगर ः जनावरे जगवण्यासाठी आणि रोजगाराच्या शोधात...
नामपूरात शेतमालाला दर, कर्जमाफीसाठी...नामपूर, जि. नाशिक : कांदा पिकासह शेतमालाचे...
वजनकाट्यात घोळ करणाऱ्यांनी लाज बाळगावीमाळेगाव, जि. पुणे ः ‘माळेगाव साखर कारखान्याचे...
कोल्हापूर जिल्ह्यास ३०० एकर तुती...कोल्हापूर : महारेशीम अभियानांतर्गत कोल्हापूर...
हमीभावाने साडेदहा हजार क्विंटल शेतीमाल...नांदेड ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांमध्ये...
पुणे बाजारात भाजीपाल्यांचे दर स्थिर;...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
केळी सल्लाकेळी पिकाची उत्तम वाढ व उत्पादनासाठी सरासरी किमान...
करडईवरील मावा किडीचे नियंत्रणकरडई हे रब्बी हंगामातील प्रमुख तेलबियापैकी...
रताळे उत्पादनवाढीसाठी ओडिशाचा...पेरू येथील आंतरराष्ट्रीय बटाटा केंद्राच्या...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गीर, साहिवाल...पुणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुग्ध आणि कुक्कुट...
औरंगाबाद जिल्ह्यात ४६९७ क्‍विंटल...औरंगाबाद : हमीभावाअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यात मका...
मराठवाड्यातील ५६९ गाव-वाड्यांना टॅंकरऔरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीटंचाईचा सामना...
तुरीला ५००० पर्यंत दर, देशी वाणांना...जळगाव : खानदेशात तुरीची मळणी अनेक भागात सुरू झाली...
टँकरऐवजी पाइपलाइनने पाणीपुरवठा करा :...नागपूर : अपुऱ्या व अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील...
दिल्लीतील व्यावसायिकांनी फळबागा...नगर : नगर जिल्ह्यामधील पाथर्डी तालुक्‍यातील तीव्र...
सातारा जिल्ह्यातील धरणांत अल्प साठासातारा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत गतवर्षीच्या...
नाशिक जिल्हा बँकेत खडखडाट तरी सचिवांना...नाशिक : एकीकडे सभासदांना पुरेशी रक्कम देण्यास...
कर्जमाफीची प्रक्रिया थंडावल्याने...सोलापूर : शेतमालाचे कोसळलेले दर, कर्जमाफी होऊनही...