agriculture news in Marathi, expand date for registration of pomegranete export, Maharasahtra | Agrowon

निर्यातक्षम डाळिंब बागा नोंदणीस मुदतवाढ
टीम अॅग्रोवन
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

पुणे ः युरोपियन देशांना डाळिंब निर्यात करू इच्छिणाऱ्या डाळिंब बागायतदारांना त्यांच्या बागेची नोंदणी कृषी विभागाकडे अनारनेटद्वारे करणे बंधनकाकारक केले आहे. यापूर्वी नोंदणी करण्यासाठी ३० जानेवारी ही अंतिम मुदत होती. मात्र, शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून, आता २८ फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. 

पुणे ः युरोपियन देशांना डाळिंब निर्यात करू इच्छिणाऱ्या डाळिंब बागायतदारांना त्यांच्या बागेची नोंदणी कृषी विभागाकडे अनारनेटद्वारे करणे बंधनकाकारक केले आहे. यापूर्वी नोंदणी करण्यासाठी ३० जानेवारी ही अंतिम मुदत होती. मात्र, शेतकऱ्यांनी मागणी केल्यानंतर या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून, आता २८ फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. 

राज्यात डाळिंबाची लागवड प्रामुख्याने नाशिक, सोलापूर, नगर, सांगली, पुणे, सातारा, उस्मानाबाद या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच बुलडाणा, जालना, बीड, औरंगाबाद, जळगाव व धुळे जिल्ह्यांतही क्षेत्र वाढत आहे. भारतातून डाळिंब निर्यात ही प्रामुख्याने संयुक्त अरब देश, बहरीन, ओमान, सौदी अरेबिया, श्रीलंका, बांगलादेश या देशांना केली जाते. परंतु मागील दोन वर्षांपासून युरोपियन युनियनमधील इंग्लड, जर्मनी, युनायटेड किंगडम, फ्रान्स, नेदरलँड, बेल्जिअम या देशांनाही निर्यात होत आहे. 

राज्यातून ३१ जानेवारीअखेर हजार ते बाराशे शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, निर्यातीसाठी अजूनही अनेक शेतकरी इच्छुक असल्याने त्यांनी मुदतवाढीची मागणी केली होती. त्यानुसार ही मुदतवाढ दिली आहे. निर्यात करणाऱ्या इच्छुक शेतकऱ्यांनी संबधित माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन निर्यात विभागाचे तंत्र अधिकारी गोंविद हांडे यांनी केले. 

इतर बातम्या
शेतकऱ्याने तयार केली डिझेलवरची बाईकसांगली : वाढत्या पेट्रोलच्या सुटकेसाठी...
शेतकऱ्यांना फसविणारे विक्रेते,...सोलापूर : शेतकरी केंद्रबिंदू मानून...
धुळे जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस...धुळे : जिल्ह्यात पूर्वहंगामी कापूस लागवडीची...
जळगाव जिल्ह्यात खरिपासाठी मुबलक खतेजळगाव : जिल्ह्यात आगामी खरिपासाठी शेतकऱ्यांची...
कारखान्यांनी थकीत `एफआरपी' त्वरीत...सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी थकवलेले...
उत्पादकांसाठी बेदाणा गोडसांगली ः यंदाच्या बेदाणा हंगामात बेदाण्याच्या...
दक्षिण महाराष्ट्रातील कारखान्यांत ८०...सांगली/कोल्हापूर ः साखरेला दर नसल्याने निराश...
अकोला जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना देणार...अकोला ः देशात राबवल्या जात असलेल्या प्रधानमंत्री...
केळी दरात किंचित सुधारणाजळगाव ः रावेर, यावलमध्ये केळीची आवक वाढलेली...
ग्रामस्वच्छता अभियानात प्रभाग, गटातून...नगर ः ग्रामीण भागात स्वच्छतेची व्यापी...
​​राज्य सरकार राबविणार मधुमक्षिका मित्र...पुणे : शहरी भागात मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते...
कामाच्या अतिरिक्त ताणामुळे पणन संचालक...पुणे ः पणन संचालकपदी पूर्णवेळ नियुक्ती असताना...
मका चार वर्षांतील नीचांकी पातळीवरनवी दिल्ली ः बजारात मका आवक वाढल्यांतर मागणी कमी...
कासवाच्या लिंगनिर्धारणामागील जनुकीय...गेल्या ५० वर्षांपासून अंडी उबण्याच्या...
सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई वाढलीसातारा  : जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा वाढू...
ब्राझील, थायलंडचा यंदा इथेनॉलकडे वाढता...कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात सर्वत्रच...
अग्रणी नदी पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यातसांगली : तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्‍यांतील अग्रणी...
पाणलोट, मृदसंधारण घोटाळ्याचा पर्दाफाशपुणे : कृषी खात्यातील पाणलोट व मृदसंधारण...
अरबी समुद्रात चक्रीवादळाचे संकेतपुणे : ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात...
पुण्यातील डाळिंब, पेरू, चिकू बागांना...पुणे  : जिल्ह्यातील मृग बहारातील डाळिंब,...